Skip to content

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. सुतार लाकडाचा एक ओंडका घेऊन त्याचे मोजपट्टीने माप घेतो आणि त्यावर लेखणीने खुणा करतो; पटाशीने ते तासून गुळगुळीत करतो. कंपासने त्यावर निशाणी करतो. त्याला मानवाच्या शरीराचा आकार देतो, सर्व मानवी गौरवाने अलंकृत करतो, जेणेकरून त्याची मंदिरात स्थापना होऊ शकेल.

  2. तो गंधसरू तोडतो किंवा बहुतेक सुरू वा एला ही झाडे निवडतो, तो त्या झाडाला रानातील इतर झाडांसह वाढवितो, किंवा देवदारू लावतो व पावसाच्या पाण्यावर त्याला वाढू देतो.

  3. मनुष्य त्याचा उपयोग जळणासाठी करतो; काही लाकूड जाळून स्वतःला ऊब मिळण्यासाठी, आणि आग पेटवून भाकर भाजण्यासाठी. परंतु तो त्या लाकडातून स्वतःसाठी एक देवही निर्माण करतो व त्याची आराधना करतो; तो एक मूर्ती तयार करतो व त्यास नमन करतो.

  4. अर्धे लाकूड तो जळण म्हणून वापरतो; त्यावर आपले अन्न शिजवितो, तो त्यावर मांस भाजतो व खाऊन तृप्त होतो. आपल्याला ऊबही आणतो व म्हणतो, “अहा! मी किती उबदार झालो आहे; मला अग्नी दिसत आहे.”

  5. आणि उरलेल्या लाकडापासून तो आपले दैवत म्हणजे मूर्ती तयार करतो; त्या मूर्तीस नमन करून तिची पूजा करतो, तो त्याची प्रार्थना करतो आणि म्हणतो “माझी सुटका कर! तू माझ्या देव आहेस!”

  6. ते अज्ञानी आहेत, त्यांना काहीही कळत नाही; त्यांनी बघू नये म्हणून त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्यांना समज येऊ नये म्हणून त्यांची अंतःकरणे बधिर केली आहेत.

  7. कोणीही थांबून विचार करीत नाही, कोणालाही समज नाही व ते जाणून असे म्हणत नाहीत, “अरे! हा तर लाकडाचा ठोकळा आहे; यातील काही भाग मी सरपण म्हणून वापरला, याच्या कोळशावर मी भाकरही भाजली व मांस शिजवून ते खाल्ले. मग यातील अवशिष्ट भागाची मी तिरस्करणीय वस्तू बनवावी काय? मी लाकडाच्या ठोकळ्याला नमन करावे काय?”

  8. असा मनुष्य राख भक्षण करतो; संभ्रमात पडलेले अंतःकरण त्याला चुकीचे मार्गदर्शन करते; तो स्वतःला वाचवू शकत नाही किंवा म्हणू शकत नाही “ही माझ्या उजव्या हातातील वस्तू निव्वळ खोटेपणा नाही का?”

  9. बेल नतमस्तक होतो, नबो वाकून जातो; ओझे वाहणारे पशू त्यांच्या मूर्ती वाहून नेतात. या प्रतिमांची नेआण तापदायक, व थकेलेल्यांना अधिकच ओझे देणारे आहे.

  10. ते एकत्र मिळून लवतात व नतमस्तक होतात; हे ओझे सोडविणे अशक्य झाल्यामुळे, ते स्वतःच बंदिवासात जातात.

  11. काहीजण त्यांच्या पिशवीतून सोने काढून ते ओततात व चांदी तराजूत तोलतात; ते एखाद्या सोनाराला दैवत घडविण्यासाठी मजुरीने कामाला लावतात, आणि मग ते त्याच्यापुढे नमन करून त्याची पूजा करतात.

  12. ते त्याला आपल्या खांद्यावर घेतात व वाहून नेतात; नंतर ते त्याला त्याच्या स्थानी ठेवतात, तेव्हा ते दैवत तिथेच राहते. त्या ठिकाणाहून त्याला हालता येत नाही. कोणी त्याचा धावा केला, तरी ते उत्तर देऊ शकत नाही; ते कोणालाही त्यांच्या संकटातून सोडवू शकत नाही.

  13. “मग तुझा जादूटोणा व मंत्रतंत्र, ज्याचा अनेक वर्षापासून परिश्रम करून तू अभ्यास केला, ते चालू दे. कदाचित तुला यश मिळेल, कदाचित दहशत निर्माण करशील.

  14. तुला मिळालेल्या सर्व सल्ल्यांनी तू थकली आहेस! तुझे ज्योतिषी पुढे येवोत, नक्षत्र पाहून महिन्याच्या महिने भविष्यकथन करणारे, तुझ्यावर पुढे येणाऱ्या संकटापासून तुझे रक्षण करो.

  15. ते निश्चितच भुसकटासारखे आहेत; अग्नी त्यांना भस्म करेल. ते अग्नीच्या सामर्थ्यापासून स्वतःचेही संरक्षण करू शकत नाहीत. हे ऊब देणारे निखारे नाहीत; ही जवळ बसविणारी शेकोटी नव्हे.

  16. ते तुझ्यासाठी एवढेच करतील की— ज्यांच्याशी तू आयुष्यभर व्यवहार केलास, आणि बालपणापासून ज्यांच्यासह कष्ट केलेस, ते सर्व त्यांच्या चुका कायम करीतच राहतील; आणि तुझा बचाव करण्यासाठी कोणीही राहणार नाही.

  17. “पण तुम्ही—अहो चेटकिणीच्या पुत्रांनो, जारकर्मींच्या व वेश्यांच्या संतानांनो, तुम्ही इकडे या!

  18. तुम्ही कोणाची चेष्टा करता? कोणाकडे पाहून नाके मुरडता व आपल्या जिभा दाखविता? तुम्ही बंडखोरांची पिल्ले व लबाडांची संतती नाही काय?

  19. एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.

  20. खडकांच्या कड्याखालील गुळगुळीत दगडाच्या मूर्ती ही तुझी दैवते आहेत; खरोखर, हाच तुझा भाग आहे. होय, त्यांनाच तू पेयार्पणे करते आणि अन्नार्पणे करते. हे सर्व बघून, मला पाझर फुटेल का?

  21. डोंगरमाथ्यांवर व अत्यंत उच्चस्थानी तू आपला बिछाना बनविला आहेस; तिथे वर जाऊन तू तुझी अर्पणे वाहिली.

  22. बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते.

  23. मोलखाला तू जैतुनाचे तेल वाहिले व तुझी सुगंधी अत्तरे वाढवून अर्पण केलीस. तू तुझ्या दूतांना दूरवर पाठविले; अगदी प्रत्यक्ष मृतलोकांच्या राज्यापर्यंत गेलीस.

  24. हे सर्व करून तू स्वतःला थकवून टाकले, पण तू असे म्हटले नाही, ‘हे किती निराशाजनक आहे.’ स्वतःला नव्या बलाने संचारित केले, म्हणून तू मूर्छित झाली नाही.

  25. “इतकी दहशत व भीती तुला कोणाची वाटते कि तू माझ्याशी असत्याने वागते, तू माझे स्मरण केले नाही कि हे मनावरही घेतले नाही? मी बराच काळ निःशब्द राहिलो आहे म्हणून का तुला माझा धाक वाटत नाही?