मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी विचार केला, “हे फार गरीब आहेत; ते निर्बुद्ध आहेत, त्यांना त्यांच्या याहवेहचे मार्ग काय आहे हे ठाऊक नाही त्यांना त्यांच्या परमेश्वराच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत नाही.

  2. मी त्यांच्या पुढार्‍यांकडे जाईन व त्यांच्याशी बोलेन; कारण त्यांना निश्चितच याहवेहचे मार्ग ठाऊक आहेत. त्यांना त्यांच्या परमेश्वराची अपेक्षा काय आहे हे ठाऊक आहे.” पण त्या सर्वांनी एकमताने माझे जू झिडकारून टाकले आहे. आणि माझी बंधने तोडून टाकली आहेत.

  3. म्हणून जंगलातील सिंह त्यांच्यावर हल्ला करेल, वाळवंटातील लांडगा त्यांना फस्त करेल, त्यांच्या नगरांभोवती चित्ता दबा धरून बसेल, आणि बाहेर पडणार्‍या प्रत्येकाला तो फाडून टाकील; कारण त्यांची बंडखोरी फार मोठी आहे त्यांची घसरण फार मोठी आहे.

  4. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  5. हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्‍याच्या पत्नीची लालसा धरतो.

  6. हे सर्व पाहून मी त्यांना शिक्षा करू नये काय? ही याहवेहची जाहीर वाणी आहे. अशा दुष्ट राष्ट्राचा मी स्वतः प्रतिकार करू नये काय?

  7. “त्यांच्या द्राक्षमळ्यातून फिरा आणि त्यांचा नाश करा. पण त्यांचा पूर्णपणे नाश करू नका. वेलीच्या फांद्या तोडून टाका, कारण हे लोक याहवेहचे नाहीत.

  8. इस्राएलच्या लोकांनी आणि यहूदीयाच्या लोकांनी माझा घोर विश्वासघात केला आहे,” असे याहवेह म्हणतात.

  9. ते याहवेहबद्दल खोटे बोलतात; ते म्हणतात, “ते काहीही करणार नाहीत! आमच्यावर अरिष्ट कोसळणारच नाही; आम्ही दुष्काळ आणि लढाई बघणारही नाही.

  10. संदेष्टे निव्वळ वारा आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वराचे वचन नाही. म्हणून ते जे काही बोलतात ते सर्व त्यांच्यावरच कोसळू दे.”

  11. म्हणून सर्वसमर्थ याहवेह परमेश्वर असे म्हणतात: “कारण या लोकांनी हे शब्द उच्चारले आहेत, मी तुमच्या मुखात माझे शब्द भडकत्या अग्नीसारखे करेन आणि जो या लोकांना सरपणाच्या लाकडांप्रमाणे जाळून भस्म करेल.”

  12. याहवेह म्हणतात, “हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुमच्याविरुद्ध एका दूरच्या बलाढ्य व प्राचीन राष्ट्रास उभे करेन— त्यांची भाषा तू जाणत नाही, त्यांची वाणी तुला समजत नाही.

  13. त्यांचा भाता उघड्या कबरेप्रमाणे आहे; त्यांचे सर्व योद्धे प्रतापी आहेत.

  14. ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.

  15. “ ‘याहवेह असे म्हणतात, यहूदीयाच्या राजांची आणि अधिपतींची हाडे, याजकांची हाडे व संदेष्ट्यांची हाडे व यरुशलेमच्या लोकांची हाडे त्यांच्या कबरांतून बाहेर काढली जातील.

  16. आणि ती हाडे चंद्र, सूर्य व तारे यांच्यापुढे पसरील. हीच माझ्या लोकांची दैवते आहेत. यांच्यावरच त्यांचे प्रेम होते, यांना ते अनुसरत होते, यांचा ते सल्ला घेत, यांचीच ते उपासना करीत असत. ही हाडे पुन्हा कोणी गोळा करणार नाहीत वा पुरणार नाहीत. जमिनीवर पडलेल्या शेणाप्रमाणे ती विखुरली जातील.

  17. कारण लोकांच्या प्रथा व्यर्थ आहेत; ते जंगलातील एक लाकूड कापून आणतात, आणि एक कारागीर हातातील छेनीने त्यास आकार देतो.

  18. ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; ती एका जागी स्थिर रहावी, पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात.

  19. ते जणू काही काकडीच्या मळ्यातील बुजगावणेच, या मूर्तीला बोलता येत नाही; तिला तर उचलून न्यावे लागते कारण तिला चालता येत नाही. त्यांना घाबरू नकोस; त्या काहीही इजा करू शकत नाही तुमचे काही भले सुद्धा करत नाही.”

  20. हे याहवेह, तुमच्यासारखे कोणीही नाही. कारण तुम्ही महान आहात, आणि तुमचे नाव अति सामर्थ्यशाली आहे.

  21. हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे भय नाही असा कोण आहे? अशा श्रद्धेच्या योग्य केवळ तुम्हीच आहात, सर्व राष्ट्रातील सुज्ञ पुढाऱ्यांमध्ये आणि जगातील सर्व राज्यांमध्ये तुमच्यासारखे दुसरे कोणीच नाही.

  22. लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;

  23. ते तार्शीशहून चांदीचे पत्रे आणि उफाजहून सोन्याचे पत्रे आणून कुशल कारागीर व सोनारांकडून मूर्ती घडवून घेतात. मग त्यावर ते निळी व जांभळी वस्त्रे चढवितात— हे सर्व निष्णात कारागिरांनी तयार केलेले असते.

  24. परंतु याहवेह हेच खरे परमेश्वर आहेत; ते जिवंत परमेश्वर आहेत, ते सनातन राजा आहेत. जेव्हा ते क्रोधित होतात, सर्व पृथ्वी कंपायमान होते; त्याच्या प्रकोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही.

  25. “त्यांना हे सांग: ‘ही दैवते, ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली नाही, ती या पृथ्वीवरून आणि आकाशाच्या खालून नष्ट होतील.’ ”