मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.”

  2. कारण ज्यांना या भूमीवर पुत्र आणि कन्या झाले आहेत आणि ज्या स्त्रिया त्यांच्या आई आणि जे पुरुष त्यांचे वडील झाले त्यांच्याबद्दल याहवेह असे म्हणतात:

  3. “ते भयानक रोगांना बळी पळून मरतील. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, की त्यांना मूठमाती देणार नाही, तर त्यांची प्रेते जमिनीवर शेणासारखे पडून राहतील. तलवार व दुष्काळ यांनी त्यांचा अंत होईल आणि त्यांची प्रेते पक्षी आणि हिंस्र श्वापदे यांचे खाद्य होतील.”

  4. कारण याहवेह असे म्हणतात: “ज्या घरात मयतीचे भोजन होत आहे तिथे प्रवेश करू नको; शोक करू नको किंवा सांत्वना देऊ नको, कारण मी माझे आशीर्वाद, माझे प्रेम आणि माझी दया या लोकांपासून काढून घेतली आहेत.” याहवेहची ही घोषणा आहे,

  5. “या राष्ट्रातील थोर आणि लहान सर्व मरतील. त्यांना मूठमाती मिळणार नाही, कोणी त्यांच्यासाठी शोक करणार नाही. प्रथेप्रमाणे दुःखाचे चिन्ह म्हणून ते स्वतःच्या शरीरास दुखापत करणार नाहीत किंवा डोक्याचे मुंडण करणार नाहीत.

  6. शोक करणार्‍यांना अन्न देऊन कोणी त्यांचे—त्यांच्या आई वा वडिलांच्या मृत्यूबद्दल—समाधान करणार नाही. सांत्वन करण्यासाठी कोणी त्यांना प्यालाभर द्राक्षारसही देणार नाही.

  7. “ज्या घरात मेजवानी होत आहे, त्या घरात तू प्रवेश करू नकोस व त्यांच्याबरोबर खाण्यापिण्या करिता बसू नकोस.

  8. कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘त्या दिवसामध्ये तुमच्या डोळ्यादेखत या ठिकाणी मी त्यांच्या हर्ष व आनंद गीतांचा, वर आणि वधूंच्या आवाजाचा शेवट करेन.’

  9. “हे सर्व तू लोकांना सांगशील, तेव्हा ते विचारतील, ‘याहवेहने ही भयानक संकटे आमच्यावर पाठविण्याचा हुकूम का दिला आहे? आम्ही कोणती चूक केली आहे? आमच्या याहवेह परमेश्वराच्या विरुद्ध आम्ही असे कोणते पाप केले आहे?’

  10. तेव्हा त्यांना सांग, याहवेह असे म्हणाले, ‘कारण तुमच्या पूर्वजांनी मला सोडले. त्यांनी इतर दैवतांची उपासना केली, त्यांची सेवा केली आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत,

  11. याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.

  12. लोक स्वतःसाठी दैवते निर्माण करतात काय? होय, परंतु ते देव नाहीत!”

  13. “त्यांच्या हृदय पटलावर आणि त्यांच्या वेद्यांच्या शिंगावर यहूदीयाचे पाप जणू काही लोखंडी कलमाने एखाद्या हिरकटोकाने कोरलेल्या आहेत,

  14. घनदाट वृक्षाजवळ आणि उंच डोंगरावरील, प्रत्येक वेदी व अशेरास्तंभाची त्यांची लेकरे सुद्धा आठवण करतात.

  15. या भूमीवर माझे उंच पर्वत आणि तुमची संपत्ती व सर्व भांडारे तुमच्या उच्च स्थळासहित, लूट म्हणून मी देईन, कारण संपूर्ण देशभर तुम्ही पाप केले आहे.

  16. तुमच्याच चुकीमुळे मी तुम्हास दिलेले वतन तुम्ही घालवाल. तुमच्या शत्रूंकडे, तुम्हाला माहीत नसलेल्या राष्ट्रांत मी तुम्हाला गुलाम म्हणून पाठवेन. कारण तुम्ही माझा क्रोधाग्नी पेटविला आहे आणि तो सतत जळत राहील.”

  17. याहवेह असे म्हणतात: “जो मनुष्यावर विश्वास ठेवतो, जो मर्त्य मनुष्यापासून सामर्थ्य मिळवितो आणि ज्याचे अंतःकरण याहवेहपासून दूर गेले आहे, तो शापित असो.

  18. तो मनुष्य वैराण वाळवंटातील खुरट्या झुडूपासारखा आहे; उन्नतीचे चांगले दिवस त्यांना कधीच दिसणार नाहीत. ते वाळवंटातील उजाड भूमीमध्ये, ज्या क्षारभूमीत जीवन नसेल, तिथे राहतील.

  19. म्हणून याहवेह असे म्हणतात: “आता राष्ट्रांमध्ये जाऊन चौकशी करा: असा प्रकार कोणी कधी ऐकला आहे काय? इस्राएलाच्या कुमारिकेने एवढे भयंकर कर्म केले आहे.

  20. लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय?

  21. तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, ते त्यांना अडखळत चालावयास लावतात ते पूर्वजांचे मार्ग आहेत. जे मार्ग नीट बांधलेले नाही, म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.

  22. याहवेह मला असे म्हणतात: “जा व एक मातीचे मडके विकत घे आणि जाताना लोकांमधील काही वडीलजन आणि काही याजक यांना आपल्याबरोबर घे.

  23. आणि बेन-हिन्नोमच्या खोर्‍यातून जा, तुटलेल्या मडक्याच्या व्दारा जवळ जा. तिथे जाऊन मी सांगेन त्या वचनाची घोषणा कर,

  24. आणि म्हण, अहो यहूदीयाच्या राजांनो, आणि यरुशलेमच्या लोकांनो, याहवेहचे वचन ऐका! सर्वसमर्थ याहवेह इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: या स्थानावर मी असे भयंकर अरिष्ट आणेन की त्याविषयी जे ऐकतील त्यांचे कान भणभणतील.

  25. कारण त्यांनी मला सोडले आहे आणि हे स्थान त्यांनी परक्या दैवताचे केले आहे; हे लोक अन्य दैवतांपुढे धूप जाळतात, जे त्यांच्या पूर्वजांना किंवा यहूदीयाच्या राजांना कधीही माहीत नव्हते, आणि त्यांनी ही जागा निर्दोष रक्ताने भरून टाकली आहे.