मुख्य मजकुरावर जा

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी बआल दैवतासाठी होमार्पण म्हणून वेद्या बांधल्या आहेत आणि त्यावर ते आपल्या मुलांचा होम करतात—असे करण्याची मी त्यांना कधी आज्ञा दिली नव्हती किंवा कधी उल्लेखही केला नव्हता, अथवा विचारही केला नव्हता.

  2. याहवेह म्हणाले, पाहा, असे दिवस येत आहेत, तेव्हा या खोर्‍याला ‘तोफेत’ किंवा ‘बेन-हिन्नोमचे खोरे’ असे म्हणणार नाहीत, तर ‘कत्तलीचे खोरे’ असे म्हणतील.

  3. “ ‘या ठिकाणी यहूदीया व यरुशलेम यांच्या योजना मी उधळून लावेन. मी त्यांच्या शत्रूच्या समक्ष तलवारीने त्यांचा वध करेन, जे त्यांचा प्राण घेऊ पाहतात, आणि मी त्यांची प्रेते पक्ष्यांना आणि हिंस्र पशूंना खावयास देईन.

  4. मी या नगराचा नाश करेन आणि ते दहशतीचे व आणि घृणेचे ठिकाण बनवीन; त्याच्या जवळून जाणारा कोणीही त्याच्या सर्व जखमांमुळे भयचकित होतील आणि त्यांचा उपहास करतील.

  5. मी त्यांना त्यांच्या पुत्र आणि कन्यांचे मांस खाण्यास लावेन, आणि त्यांचे शत्रू त्यांच्या सभोवतीच्या वेढ्याने त्यांच्यावर एवढा दबाव आणतील की ते एक दुसऱ्याचे मांस खातील.’

  6. “यिर्मयाह, आता हे लोक पाहत असताना तू आणलेले ते मडके फोडून टाक,

  7. आणि त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ याहवेहचा तुम्हाला हा संदेश आहे: ज्याप्रमाणे या मडक्याच्या ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या आहेत व हे मडके जसे पुन्हा नीट करता येणार नाही, त्याप्रमाणेच मी या नगरीच्या लोकांचा चुराडा करेन. तोफेतमध्ये इतक्या प्रेतांना मूठमाती देण्यात येईल की कुठे जागा उरणार नाही.

  8. या ठिकाणी मी हेच करणार व इथे राहणाऱ्या लोकांनाही करेन, ही याहवेहची घोषणा आहे. मी या नगराला तोफेतासारखे करेन.

  9. यरुशलेममधील घरे व यहूदीयांच्या राजांचे राजवाडे तोफेतासारखे भ्रष्ट करेन—ज्या घरांच्या धाब्यांवर त्यांनी आकाशातील शक्तींना धूप जाळला व इतर दैवतांस पेयार्पणे वाहिली.’ ”

  10. नंतर यिर्मयाह तोफेत येथे हा संदेश देऊन परतला, जिथे याहवेहने यिर्मयाहला भविष्यवाणी करण्यासाठी पाठविले होते, तिथे तो मंदिरापुढे थांबला व सर्व लोकांना उद्देशून म्हणाला,

  11. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, काय म्हणतात: ‘ऐका! मी या नगरावर आणि सभोवतालच्या गावावर मी शपथपूर्वक म्हटल्याप्रमाणे सर्व अरिष्टे आणणार आहे, कारण ते हट्टी होते व माझी वचने ऐकत नव्हते.’ ”

  12. याहवेहचे वचन माझ्याकडे आले:

  13. “हे मानवपुत्रा, इस्राएलच्या पर्वतांकडे आपले मुख कर; आणि त्यांच्याविरुद्ध भविष्य सांग

  14. आणि सांग: ‘अहो इस्राएलच्या पर्वतांनो, तुम्ही सार्वभौम याहवेहचे वचन ऐका. सार्वभौम याहवेह पर्वतांना व डोंगरांना, झर्‍यांना व दर्‍यांना असे म्हणतात: मी तुमच्याविरुद्ध तलवार आणेन, आणि मी तुमची उंचावरील पूजास्थाने नष्ट करेन.

  15. तुमच्या वेद्या फोडल्या जातील आणि तुमच्या धुपांच्या वेद्यांचा चुराडा करण्यात येईल; आणि तुमच्या मूर्तींपुढे तुमच्या लोकांना मी जिवे मारीन.

  16. इस्राएली लोकांची प्रेते मी त्यांच्या मूर्तींपुढे टाकीन आणि तुमची हाडे मी तुमच्या वेद्यांपुढे पसरवून टाकीन.

  17. तुम्ही जिथे वस्ती कराल, ती नगरे ओसाड होतील आणि तेथील उच्च स्थाने उद्ध्वस्त होतील, यासाठी की तुमच्या वेद्या ओसाड होऊन नष्ट होतील, तुमच्या मूर्तींचा चुराडा होऊन भुगा होतील, तुमच्या धुपांच्या वेद्या पाडल्या जातील आणि तुम्ही जे काही बनविले ते सर्व पुसून टाकल्या जातील.

  18. तुमचे लोक तुमच्यामध्ये मारून पाडले जाईल आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.

  19. “ ‘परंतु मी काहींना वाचवेन, कारण जेव्हा तुम्ही देशात व राष्ट्रात पांगविले जाल तेव्हा तुमच्यातील काही तलवारीपासून वाचतील.

  20. मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील.

  21. आणि ते जाणतील की मीच याहवेह आहे; त्यांच्यावर हे अरिष्ट आणेन अशी धमकी मी निरर्थकच दिली नाही.

  22. “ ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: इस्राएली लोकांच्या सर्व दुष्ट व अमंगळ कृत्यांसाठी तुमचे हात एकमेकांवर मारा आणि “अरेरे!” असे म्हणत तुमचे पाय आपटून रडा, कारण ते तलवार, दुष्काळ व पीडा यांनी पडतील.

  23. जो दूर असेल तो पीडेने मरेल आणि जो जवळ आहे तो तलवारीने मरेल आणि जो त्यातून वाचेल तो दुष्काळाने मरेल. याप्रकारे मी त्यांच्यावर माझा क्रोध ओतेन.

  24. त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  25. मी आपला हात त्यांच्याविरुद्ध उगारेन आणि दिबलाहच्या वाळवंटापासून ते जिथे कुठे राहतील मी त्यांचा देश ओसाड करेन; तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.’ ”