- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Idolatry बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
तेव्हा तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, उत्तरेकडे पाहा.” म्हणून मी पाहिले आणि वेदीच्या उत्तरेकडील द्वाराच्या प्रवेश स्थानात मला ती ईर्षेची मूर्ती दिसली.
आणि तो मला म्हणाला, “हे मानवपुत्रा, ते जे काही करीत आहेत ते तू पाहतोस काय; इस्राएली लोक या ठिकाणी अमंगळ गोष्टी करीत आहेत, ज्यामुळे माझ्या पवित्रस्थानातून मी दूर केला जाईन? परंतु यापेक्षाही अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
मग त्याने मला अंगणाच्या प्रवेशाजवळ आणले. मी पाहिले आणि भिंतीमध्ये एक छिद्र असल्याचे मला दिसले.
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, आता भिंत खोद.” म्हणून मी भिंत खोदली आणि त्यात मला एक दरवाजा दिसला.
आणि तो मला म्हणाला, “आत जा आणि ते इथे करीत असलेले दुष्ट व अमंगळ कृत्ये पाहा.”
म्हणून मी आत गेलो आणि पाहिले की भिंतीवर सर्वत्र सर्वप्रकारचे सरपटणारे प्राणी आणि अशुद्ध जनावरे व इस्राएलच्या मूर्तींची चित्रे बनविलेली मला दिसली.
त्याच्यासमोर इस्राएलचे सत्तर वडील उभे होते आणि शाफानचा पुत्र याजन्याह त्यांच्यामध्ये उभा होता, प्रत्येकाच्या हातात धुपाटणे होते आणि सुगंधी धूपाचा ढग वर चढत होता.
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे वडीलजन आपआपल्या मूर्तिघराच्या अंधारात काय करीत आहेत ते तू पाहिलेस काय? ते म्हणतात, ‘याहवेह आम्हाला पाहत नाही; याहवेहने आम्हाला टाकले आहे.’ ”
तो पुन्हा म्हणाला, “यापेक्षाही अधिक अमंगळ कृत्ये करताना तू त्यांना पाहशील.”
मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराकडे आणले, तिथे मी स्त्रिया पाहिल्या ज्या बसून तम्मुत्स दैवतासाठी शोक करीत होत्या.
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहतोस काय? यापेक्षा अधिक अमंगळ गोष्टी तू पाहशील.”
मग त्याने मला याहवेहच्या मंदिराच्या आतील अंगणात आणले आणि तिथे मंदिराच्या प्रवेशद्वारात, देवडीच्या व वेदीच्या दरम्यान, सुमारे पंचवीस पुरुष होते. याहवेहच्या मंदिराकडे त्यांची पाठ असून त्यांचे तोंड पूर्वेकडे करीत ते पूर्वेकडे सूर्यापूढे वाकून त्याची उपासना करीत होते.
तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिलेस काय? या ज्या अमंगळ गोष्टी ते करतात ते यहूदाहसाठी क्षुल्लक आहेत काय? त्यांनी आतंकाने देश भरून सातत्याने माझा राग भडकवावा काय? त्यांच्याकडे पाहा, ते कशी आपल्या नाकाला फांदी लावत आहेत!
म्हणून मी त्यांच्याशी क्रोधाने वागेन; मी त्यांच्याकडे दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही. जरी ते माझ्या कानात रडतील, तरी मी त्यांचे ऐकणार नाही.”
नंतर मी त्याला उंच आवाजात बोलताना ऐकले, “शहरावर न्यायनिवाडा आणण्यासाठी ज्यांना नेमले आहे त्यांना बोलवा, प्रत्येकाच्या हाती शस्त्र असावे.”
आणि वरील दरवाजा, ज्याचे मुख उत्तरेकडे होते त्या दिशेकडून सहा पुरुष येत असलेले मी पाहिले, प्रत्येकाच्या हाती घातक शस्त्रे होती. त्यांच्याबरोबर एक पुरुष होता ज्याने तागाची वस्त्रे घातली होती व त्याच्याकडे लेखन सामुग्री होती. ते येऊन कास्य वेदीजवळ उभे राहिले.
आता करुबांवर असलेले इस्राएलच्या परमेश्वराचे वैभव तिथून वर जाऊन, मंदिराच्या उंबरठ्यावर आले. तेव्हा ज्या पुरुषाने तागाची वस्त्रे घातली होती व ज्याच्याकडे लेखन सामुग्री होती, त्याला याहवेहने बोलाविले
आणि याहवेहने त्याला म्हटले, “संपूर्ण यरुशलेम शहरातून जा आणि त्यात अमंगळ कृत्ये केल्याबद्दल जे दुःख व विलाप करतात त्यांच्या कपाळावर एक चिन्ह कर.”
मी हे ऐकत असताना, याहवेहने बाकीच्यांना म्हटले, “त्याच्यामागे शहरात जा आणि दया किंवा सहानुभूती न दाखविता त्यांना मारून टाका.
वयस्कर पुरुष, तरुण पुरुष व स्त्रिया, आई व लेकरे सर्वांची कत्तल करा, परंतु ज्यांच्या कपाळावर चिन्ह केलेले आहे त्यांना स्पर्श करू नका. माझ्या पवित्रस्थानापासून सुरुवात करा.” तेव्हा त्यांनी त्या वयस्क पुरुषांपासून सुरुवात केली जे मंदिराच्या समोर होते.
मग तो म्हणाला, “मंदिर भ्रष्ट करा आणि वधलेल्यांनी अंगणे भरून टाका. जा!” तेव्हा ते बाहेर गेले आणि शहरात सर्वत्र लोकांना मारू लागले.
ते लोकांना मारीत असताना मी एकटाच होतो, मी उपडा पडून मोठ्याने रडलो, “हाय हाय, सार्वभौम याहवेह! यरुशलेमवर आपण आपला कोप ओतून उरलेल्या सर्वच इस्राएली लोकांचा नाश करणार आहात काय?”
याहवेहने मला म्हटले, “इस्राएल व यहूदीयाच्या लोकांचे अपराध फारच घोर आहेत; देश रक्तपाताने व शहर अन्यायाने भरले आहे. ते म्हणतात, ‘याहवेहने देशाला सोडून टाकले आहे; आणि याहवेह पाहत नाही.’
म्हणून मी त्यांना दयेने पाहणार नाही किंवा त्यांची गय करणार नाही, आणि त्यांनी जे काही केले आहे ते मी त्यांच्याच डोक्यावर आणणार आहे.”
तेव्हा लेखन सामुग्री जवळ असलेला, तागाची वस्त्रे घातलेल्या पुरुषाने येऊन सांगितले, “आपण आज्ञापिल्याप्रमाणे मी केले आहे.”