Skip to content

Idolatry बद्दल बायबलमधील वचने

447 वचने · 205 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि हे तुमच्या कानी आले, तर ही गोष्ट खरी आहे की नाही याची तुम्ही प्रथम काळजीपूर्वक खात्री करून घ्यावी. इस्राएलात ही घृणास्पद गोष्ट घडली आहे व हे सत्य आहे असे निश्चित झाल्यावर,

  2. ही घृणास्पद गोष्ट करणार्‍या त्या पुरुषाला अथवा स्त्रीला नगराच्या वेशीजवळ घेऊन जावे आणि त्या व्यक्तीला मरेपर्यंत धोंडमार करावा.

  3. मग ते विचारतील: “आता त्यांची दैवते कुठे आहेत, त्यांचे आश्रयाचे खडक कुठे आहेत?

  4. ज्या दैवतांनी त्यांच्या यज्ञातील चरबीचे सेवन केले आणि त्यांच्या द्राक्षारसाचे रसपान केले, ती दैवते आता कुठे आहेत? त्या दैवतांनी तुमच्या मदतीसाठी आता जागे व्हावे! त्यांनी त्यांचे आश्रयस्थान व्हावे!

  5. तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले आणि बआल देवतांची सेवा केली.

  6. त्यांच्या पूर्वजांच्या ज्या याहवेह परमेश्वराने त्यांना इजिप्तमधून बाहेर आणले होते, त्यांनी त्यांचा त्याग केला. त्यांच्या सभोवतालच्या लोकांच्या अन्य दैवतांचे अनुसरण केले आणि त्यांची उपासना केली. त्यांनी याहवेहचा क्रोध भडकाविला

  7. कारण त्यांनी याहवेहला सोडून बआल आणि अष्टारोथची उपासना केली.

  8. परमेश्वराचा कोश पलिष्टी सैन्याने हस्तगत केल्यानंतर त्यांनी तो एबेन-एजर येथून अश्दोदकडे नेला.

  9. नंतर पलिष्ट्यांनी परमेश्वराचा कोश दागोनच्या मंदिरात नेला आणि दागोनच्या मूर्तीच्या बाजूला ठेवला.

  10. जेव्हा अश्दोदचे लोक दुसर्‍या दिवशी पहाटे उठले, तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्यांनी दागोनला उचलले आणि पुन्हा त्याच्या जागेवर ठेवले.

  11. परंतु दुसर्‍या दिवशी पहाटे जेव्हा ते उठले तेव्हा याहवेहच्या कोशासमोर दागोन जमिनीवर पालथा पडलेला होता! त्याचे डोके आणि हात तुटून ते दाराच्या उंबरठ्यावर पडलेले होते; फक्त त्याचे शरीर तसेच होते.

  12. शलोमोन सीदोन लोकांची देवी अष्टारोथ आणि अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलेख याची उपासना करू लागला.

  13. याप्रमाणे याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते शलोमोनने केले; त्याचा पिता दावीदाने केले त्याप्रमाणे शलोमोन याहवेहला पूर्णपणे अनुसरला नाही.

  14. शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील डोंगरावर मोआबाचे अमंगळ दैवत कमोश व अम्मोनी लोकांचे अमंगळ दैवत मोलख यांच्यासाठी पूजास्थाने बांधली.

  15. आपल्या परदेशीय स्त्रिया, ज्या धूप जाळून आपआपल्या दैवतांना यज्ञ अर्पण करीत होत्या, त्यांच्यासाठी सुद्धा त्याने तसेच केले.

  16. होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन ताब्यात घेतले आणि इस्राएली लोकांना बंदिवान करून अश्शूरला नेले आणि तिथे हलह आणि हाबोर नदीच्या काठावर वसलेल्या गोजान भागात तसेच मेदिया प्रदेशातील नगरांमध्ये वसविले.

  17. हे सर्व यासाठी घडले की इस्राएलने याहवेह त्यांच्या परमेश्वराविरुद्ध पाप केले, ज्यांनी त्यांना इजिप्तचा राजा फारोहच्या हातून इजिप्तच्या गुलामगिरीतून सोडवून बाहेर आणले होते, त्यांनी इतर दैवतांची उपासना केली

  18. आणि जी राष्ट्रे याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिली होती, त्यांच्या चालीरीतींचे, त्याचप्रमाणे इस्राएली राजांनी घातलेल्या चालीरीतींचे अनुसरण केले.

  19. इस्राएली लोकांनी त्यांचे याहवेह परमेश्वराविरुद्ध गुप्तपणे, जे अयोग्य होते ते केले. त्यांनी स्वतःसाठी सर्व नगरामध्ये पहारेकऱ्यांच्या बुरुजापासून तर तटबंदीच्या सर्वठिकाणी उच्च स्थाने बांधली.

  20. त्यांनी प्रत्येक डोंगरावर आणि प्रत्येक घनदाट वृक्षाखाली मूर्ति स्थापिल्या आणि अशेरा मूर्तीचे स्तंभ उभारले.

  21. ज्या राष्ट्रांना याहवेहने त्यांच्यापुढून घालवून दिले होते, त्यांच्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक उंचस्थानी धूप जाळले. याहवेहला क्रोध येईल अशी वाईट कृत्ये केली.

  22. याहवेहने त्यांना सांगितले होते, “तुम्ही असे करू नये” तरी त्यांनी मूर्तींची उपासना केली.

  23. याहवेहने इस्राएल आणि यहूदीयाला सर्व संदेष्टे आणि द्रष्टे यांच्याद्वारे चेतावणी दिली होती: “तुमच्या दुष्ट मार्गापासून परावृत्त व्हा. मी तुमच्या पूर्वजांना आज्ञा दिलेल्या आणि माझ्या सेवक संदेष्ट्यांद्वारे तुमच्यापर्यंत पाठविलेल्या संपूर्ण नियमानुसार माझ्या आज्ञा व विधीचे पालन करा.”

  24. परंतु त्यांनी याहवेहचे ऐकले नाही आणि ज्यांनी याहवेह आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवला नाही, अशा आपल्या पूर्वजांप्रमाणे ते ताठ मानेचे राहिले,

  25. त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.