Skip to content

Edomites बद्दल बायबलमधील वचने

154 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दिशोन, एसर व दीशान.

  2. इस्राएली लोकांवर कोणत्याही राजाने राज्य करण्यापूर्वी एदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते:

  3. बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.

  4. बेला मृत्यू पावल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब हा त्याच्या जागी राजा झाला.

  5. योबाब मरण पावल्यावर तेमानी देशातील हुशाम त्याच्या जागी राजा झाला.

  6. हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.

  7. हदाद मेल्यावर मास्रेका येथील सामलाह त्याच्या जागी राजा झाला.

  8. सामलाह मेल्यावर फरात नदीच्या तीरावरील रेहोबोथ नावाच्या शहरातील शौल त्याच्या जागी राजा झाला.

  9. शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.

  10. अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.

  11. एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,

  12. ओहोलीबामाह, एलाह, पीनोन,

  13. केनाज, तेमान, मिब्सार,

  14. मग्दीएल व ईराम.

  15. पण एदोम म्हणाला: “तुम्ही इथून पार जाऊ शकत नाही; जर तुम्ही प्रयत्न केला, तर आम्ही चाल करून तुमच्यावर तलवारीने हल्ला करू.”

  16. इस्राएली लोकांनी उत्तर दिले: “आम्ही महामार्गानेच जाऊ आणि जर आम्ही किंवा आमचे कळप तुमचे पाणी प्यालो, तर आम्ही त्याची किंमत भरू. आम्हाला केवळ पायी जायचे आहे; दुसरे काही नाही.”

  17. त्यांनी पुन्हा उत्तर दिले: “तुम्ही जाऊ शकत नाही.” तेव्हा एदोम मोठे व सामर्थ्यवान सैन्य घेऊन त्यांच्याविरुद्ध बाहेर आला.

  18. एदोमाने त्यांना हद्दीतून पार जाण्यास मनाई केली त्यामुळे इस्राएली त्यांच्यापासून वळून माघारी गेले.

  19. लोकांना आदेश दे: ‘सेईर येथे राहणार्‍या एसावाच्या वंशजाच्या, म्हणजे त्यांच्या एदोमी भाऊबंदांच्या देशातून ते पुढे जाणार आहेत. तुमची त्यांना भीती वाटेल, म्हणून तुम्ही खबरदारी घ्या.

  20. त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.

  21. यहोरामाच्या काळात, एदोमाने यहूदीयाविरुद्ध बंड पुकारले आणि त्यांनी स्वतःसाठी एक राजा निवडला.

  22. मग यहोराम आपले रथ घेऊन साईर येथे गेला. ज्या एदोमी लोकांनी त्याला आणि त्याच्या रथाच्या नायकांना घेरले होते, रात्रीच्या वेळी उठून त्याने वेढा मोडून टाकला. आणि लोक आपल्या डेर्‍यांत पळून गेले.

  23. तेव्हापासून आजपर्यंत एदोम यहूदीयाहविरुद्ध बंड करीत आहे. त्याचवेळेस लिब्नाहनेही बंड केले.

  24. राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला.

  25. परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.”