मुख्य मजकुरावर जा

Edomites बद्दल बायबलमधील वचने: Amaziah, king of Judah, invades the territory of

5 वचने · 14 पैलू

Amaziah, king of Judah, invades the territory of बद्दल वचने

  1. राज्य त्याच्या पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर त्याने त्याचा पिता राजाचा वध करणाऱ्या अधिकाऱ्यांना मृत्युदंड दिला.

  2. परंतु त्याने त्यांच्या मुलांना जिवे मारले नाही, कारण नियमशास्त्रात, मोशेच्या पुस्तकात याहवेहने आज्ञा दिली होती: “आईवडिलांना त्यांच्या मुलांच्या कारणामुळे जिवे मारू नये, तसेच आईवडिलांच्या कारणामुळे त्यांच्या मुलांना जिवे मारू नये. प्रत्येकजण स्वतःच्या पापासाठी मरतील.”

  3. त्याने क्षार खोर्‍यात दहा हजार एदोमी लोकांना ठार केले. त्याने सेला नगरावर हल्ला करून ते जिंकले व त्याचे नाव योकथएल असे ठेवले, आजही ते याच नावाने ओळखले जाते.

  4. अमस्याहने नंतर त्याचे सामर्थ्य वाढविले आणि त्याचे सैन्य क्षार खोर्‍यात नेले आणि तिथे त्याने सेईरच्या दहा हजार लोकांना ठार केले.

  5. यहूदीयाच्या सैन्याने दहा हजार माणसांनासुद्धा जिवंत पकडले, त्यांना एका कड्याच्या टोकावर नेले आणि तिथून खाली फेकले, त्या सर्वांचे तुकडे झाले.