Skip to content

Seir

10 verses

30.7300, 35.6000 गूगल नकाशावर पाहा

Seir चा उल्लेख असलेली वचने

  1. (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)

  2. नंतर आम्ही मागे वळून अरण्यामधून तांबड्या समुद्राकडे निघालो, कारण याहवेहनी मला तशी आज्ञा दिली होती आणि अनेक वर्षे आम्ही सेईर पर्वताच्या सभोवतालच्या प्रदेशात भ्रमण करीत राहिलो.

  3. त्यांना लढाईला प्रवृत्त करू नका, कारण त्यांची भूमी मी तुम्हाला देणार नाही, मी तुम्हाला तिथे पाऊल ठेवण्यासही जागा देणार नाही. मी सेईर पर्वताचा मुलूख एसावाला दिला आहे.

  4. त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.

  5. “परंतु आता येथे अम्मोन, मोआब आणि सेईर पर्वताकडील लोक आहेत, जेव्हा ते इजिप्तकडून आले तेव्हा तुम्ही इस्राएली लोकांना त्यांच्या प्रदेशावर आक्रमण करू देत नव्हता; म्हणून ते त्यांच्यापासून दूर गेले आणि त्यांचा नाश केला नाही.

  6. जेव्हा त्यांनी गाणे गाण्यास आणि स्तुती करण्यास सुरुवात केली लागले, तेव्हा याहवेहनी यहूदीयावर आक्रमण करणारे अम्मोनी, मोआब आणि सेईर पर्वताच्या लोकांवर दबा धरून हल्ला केला आणि शत्रूचा पराभव झाला.

  7. “मानवपुत्रा, सेईर पर्वताकडे मुख करून त्याच्याविरुद्ध भविष्यवाणी कर

  8. आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: हे सेईर पर्वता, मी तुझ्याविरुद्ध आहे आणि मी तुझ्याविरुद्ध माझा हात उगारेन आणि तुला ओसाड करेन.

  9. मी सेईर पर्वताला ओसाड करेन आणि जे त्यावरून येणे जाणे करतात त्यांचा मी नाश करेन.

  10. कारण जेव्हा इस्राएलचे वतन उजाड पडत होते तेव्हा तू हर्ष केला, त्याचप्रमाणे मी तुला वागवेन. हे सेईर पर्वता तू व संपूर्ण एदोम उजाड पडेल. तेव्हा तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.’ ”