मुख्य मजकुरावर जा

The Law of Moses बद्दल बायबलमधील वचने

65 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. तिसर्‍या दिवसाच्या सकाळी ढगांचा गडगडाट होऊन विजा चमकू लागल्या व पर्वतावर दाट ढग जमा झाले आणि तुतारीचा फार मोठा नाद झाला. छावणीतील सर्वजण भीतीने कापू लागले.

  2. मग मोशेने लोकांना परमेश्वराला भेटण्यासाठी छावणीच्या बाहेर आणले आणि ते पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले.

  3. सीनाय पर्वत धुराने झाकून गेला होता, कारण याहवेह अग्निरुपात पर्वतावर उतरले होते. भट्टीतून निघावा तसा धूर उठला होता आणि सगळा पर्वत जोरात थरथरत होता.

  4. कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.

  5. आणि याहवेह मोशेला म्हणाले. “खाली जा व लोकांना सांग की याहवेहला पाहण्यासाठी त्यांनी सीमा ओलांडू नये आणि पुष्कळांचा नाश होऊ नये.

  6. याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”

  7. तेव्हा मोशे याहवेहला म्हणाला, “लोक सीनाय पर्वताजवळ येऊ शकत नाहीत, कारण तुम्ही स्वतःच आम्हाला ताकीद दिली आहे, ‘पर्वताभोवती सीमा आखून आम्ही त्याला पवित्र ठेवावे.’ ”

  8. याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”

  9. जेव्हा लोकांनी विजा पाहिल्या आणि गडगडाट व तुतारीचा आवाज ऐकला आणि धुराने भरलेला पर्वत पाहिला, ते भीतीने कंपित झाले व दूर उभे राहिले

  10. आणि ते मोशेला म्हणाले, “तुम्ही स्वतः आमच्याशी बोला आणि आम्ही ऐकू. पण परमेश्वराला मात्र आमच्याशी बोलू देऊ नका, नाहीतर आम्ही मरून जाऊ.”

  11. मोशे लोकांना म्हणाला, “घाबरू नका. तुमची परीक्षा पाहावी म्हणून परमेश्वर आले आहेत, अशासाठी की परमेश्वराचे भय तुम्हाला पापापासून दूर ठेवण्याकरिता तुमच्याबरोबर असावे.”

  12. इस्राएली लोक यार्देन नदीच्या पूर्वेस असणार्‍या रानातील अराबा नावाच्या दरीमध्ये तळ देऊन राहिले होते, त्यावेळी मोशे जे बोलला त्या सर्व गोष्टीची नोंद या पुस्तकात केलेली आहे. या प्रदेशात सूफ, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दीजाहाब इत्यादी शहरांचा समावेश होतो.

  13. (सेईर डोंगरमार्गे होरेब ते कादेश-बरनेआपर्यंतचा प्रवास अकरा दिवसाचा होता.)

  14. चाळिसाव्या वर्षाच्या, अकराव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, याहवेहने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने इस्राएली लोकांना हे सर्व सांगितले.

  15. पण ज्यावेळी तुम्ही अंधारातून येणारा आवाज ऐकला आणि डोंगर माथ्यावरील त्या भयानक ज्वाला पाहिल्या, तेव्हा तुमचे सर्व गोत्रप्रमुख व वडील माझ्याकडे आले.

  16. आणि मला म्हणाले, “याहवेह आमच्या परमेश्वराने आज आम्हाला त्यांचे गौरव व थोरवी दाखविली आहे आणि अग्नीमधून येणारा त्यांचा आवाजसुद्धा आम्ही ऐकला. आम्ही आज पाहिले आहे की, परमेश्वर मानवाशी बोलले तरी मानव जिवंत राहणे शक्य आहे.

  17. परंतु आम्ही का मरावे? त्या भयानक ज्वाला आम्हाला भस्म करून टाकतील आणि याहवेह आमच्या परमेश्वराची वाणी आम्ही ऐकत राहू, तर खात्रीने मरून जाऊ.

  18. त्याकाळी जे लेवी याजक किंवा न्यायाधीश आपल्या पदावर असतील, त्यांच्याशी तुम्ही मसलत करावी आणि ते त्या वादाचा निर्णय तुम्हाला देतील.

  19. ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.

  20. ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.

  21. मग मोशेने त्यांना आज्ञा दिली: “प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी, कर्ज माफीच्या वर्षी, मंडपांच्या उत्सवात,

  22. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे.

  23. लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.

  24. त्यांची बालके, ज्यांना हे नियमशास्त्र ठाऊक नाही, त्यांनीही यार्देन नदी ओलांडून, त्या वचनदत्त देशात, जी भूमी ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तिथे जोपर्यंत राहाल, तोपर्यंत हे ऐकावे आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकावे.”

  25. मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.