The Law of Moses बद्दल बायबलमधील वचने: Priests and Levites to teach
Priests and Levites to teach बद्दल वचने
मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.
आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.
ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.