मुख्य मजकुरावर जा

The Law of Moses बद्दल बायबलमधील वचने

65 वचने · 73 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आपले आई आणि वडील यांच्याबद्दल त्याने म्हटले, ‘ते माझे कोणीही नाहीत.’ त्याने आपल्या बांधवांना ओळखले नाही, किंवा आपल्या संततीस ओळखले नाही, परंतु त्याने तुमच्या आज्ञांचे पालन केले, आणि तुमच्या कराराशी ते प्रामाणिक राहिले.

  2. ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.

  3. जेव्हा राजाने नियमशास्त्राचे शब्द ऐकले तेव्हा त्याने त्याची वस्त्रे फाडली.

  4. त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:

  5. “जा आणि माझ्यासाठी आणि इस्राएल आणि यहूदीयामध्ये जे लोक राहत आहेत, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर आला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”

  6. महिन्याच्या दुसर्‍या दिवशी सर्व कुलप्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्राचे अधिक काळजीपूर्वकरित्या वाचन ऐकण्यासाठी एज्रा शिक्षकाकडे एकत्र आले.

  7. नियम ऐकत असताना, त्यांच्या निदर्शनास आले ते हे, याहवेहने मोशेला सांगितले होते की सातव्या महिन्यात येणार्‍या मंडपांच्या सणाच्या काळात इस्राएली लोकांनी तात्पुरत्या मांडवात राहावे.

  8. देशातील सर्व शहरांमध्ये आणि विशेषतः यरुशलेममध्ये हे वचन जाहीर करावेः “लोकांनी डोंगरावर जाऊन जैतून, रानजैतून, मेंदी, खजुरी व दाट पालवीच्या वृक्षांच्या फांद्या व डाहळ्या आणून त्याचे शास्त्रात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते मांडव तयार करावे व सणाच्या काळामध्ये या मांडवांमध्येच राहावे.”

  9. तेव्हा लोक बाहेर पडले आणि डाहळ्या तोडून आपल्या घरांच्या धाब्यांवर, आपल्या अंगणात, परमेश्वराच्या भवनाच्या अंगणात, जल वेशीच्या जवळील चौकात आणि एफ्राईम वेशींच्या चौकात त्यांनी तात्पुरते मांडव घातले.

  10. या मांडवामध्ये बंदिवासातून परत आलेले सर्वजण सणाचे सात दिवस राहिले. नूनाचा पुत्र येशूआ याच्या काळापासून हा सण इस्राएली लोकांनी अशा प्रकारे साजरा केलेला नव्हता. प्रत्येकाचा आनंद खूप मोठा होता.

  11. सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली.

  12. मग त्यांनी गुप्तपणे काही माणसांना फूस लावली व बोलण्यास भाग पाडले, “स्तेफनाला मोशे आणि परमेश्वर यांची निंदा करताना आम्ही ऐकले आहे.”

  13. अशा रीतीने त्यांनी लोकांना व तसेच वडिलांना आणि नियमशास्त्र शिक्षकांना चिथविले. त्यांनी स्तेफनाला जबरदस्तीने धरले व न्यायसभेपुढे आणले.

  14. त्यांनी खोट्या साक्षीदारांना प्रस्तुत केले व त्यांनी अशी साक्ष दिली, “तो सतत पवित्र ठिकाणाविरुद्ध व नियमांविरुद्ध बोलतो.

  15. ते आणखी म्हणाले, आम्ही याला असे म्हणताना ऐकले आहे की नासरेथकर येशू हे ठिकाण उद्ध्वस्त करतील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले नियमशास्त्र बदलून टाकतील.”

  16. पण नियमशास्त्राद्वारे नीतिमत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणारे इस्राएल लोक मात्र ते प्राप्त करू शकले नाहीत.

  17. का नाही? कारण विश्वासाने नव्हे तर कर्माने मिळेल म्हणून ते त्याच्यामागे लागले. ते अडखळविणार्‍या धोंड्याला अडखळले.

  18. असे लिहिले आहे: “पाहा, सीयोनात मी लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो ज्यामुळे ते पडतील, पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कधीही लज्जित होणार नाही.”

  19. पहिल्या करारात उपासनेविषयी आणि पृथ्वीवरील मंदिराविषयी नियम होते.

  20. एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.

  21. दुसर्‍या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत.

  22. त्यात सोन्याची धूपवेदी सोन्याने आच्छादलेला कराराचा कोश होता. या कोशात मान्ना असलेले एक सुवर्णपात्र, अंकुर फुटलेली अहरोनाची काठी व कराराच्या दगडी पाट्या होत्या.

  23. आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.

  24. या गोष्टींची अशी व्यवस्था लावल्यानंतर, आपले सेवाकार्य करण्यासाठी याजक नियमितपणे या बाहेरील खोलीत प्रवेश करीत,

  25. पण आतील खोलीत फक्त महायाजकच प्रवेश करीत असे आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अजाणतेने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही.