Hilkiah
Hilkiah चा उल्लेख असलेली वचने
“मुख्य याजक हिल्कियाहकडे जा व याहवेहच्या मंदिरात आलेले पैसे, जे द्वारपालांनी गोळा केले होते ते याजकांनी तयार ठेवावे.
मुख्य याजक हिल्कियाहने शाफान चिटणीसाला म्हटले, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” त्याने तो शाफानकडे दिला, ज्याने ते वाचले.
मग शाफान चिटणीसाने राजाला माहिती दिली, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने राजाच्या उपस्थितीत त्यामधून वाचवून दाखविले.
त्याने याजक हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मिखायाहचा पुत्र अकबोर आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:
याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.
राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.
योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले.
शल्लूमास हिल्कियाह, हिल्कियाहास अजर्याह,
अजर्याह जो हिल्कियाहचा पुत्र, जो मशुल्लामाचा पुत्र, जो सादोकाचा पुत्र, जो मरायोथाचा पुत्र व जो अहीतूबचा पुत्र, हा परमेश्वराच्या मंदिराचा प्रमुख अधिकारी होता;
ते मुख्य याजक हिल्कियाहकडे गेले व परमेश्वराच्या मंदिरात आलेले पैसे, जे लेव्यांनी व द्वारपालांनी मनश्शेह, एफ्राईम आणि इस्राएलच्या अवशिष्ट लोकांकडून आणि यहूदाह व बिन्यामीनच्या लोकांकडून, तसेच यरुशलेमच्या रहिवाशांकडून गोळा केले होते ते राजाला दिले.
जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला.
नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले.
त्याने हिल्कियाह, शाफानाचा पुत्र अहीकाम आणि मीखाहचा पुत्र अब्दोन आणि शाफान चिटणीस आणि राजाचा सेवक असायाह यांना हा आदेश दिला:
हिल्कियाह आणि त्याच्याबरोबर राजाने ज्यांना पाठवले होते, ते संदेष्टी हुल्दाह हिच्याशी बोलण्यास गेले, ती पोशाख भांडाराचा अधिकारी हसराहचा पुत्र तोखाथ चा पुत्र शल्लूमची पत्नी होती. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.
त्याच्या अधिकार्यांनीसुद्धा स्वेच्छेने लोकांना आणि याजकांना आणि लेवीय यांना मदत केली. हिल्कियाह, जखर्याह आणि यहीएल हे परमेश्वराच्या मंदिराच्या कारभाराचे अधिकारी होते, त्यांनी याजकांना वल्हांडणाची दोन हजार सहाशे अर्पणे आणि तीनशे गुरे दिली.
या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्याहाचा पुत्र होता. अजर्याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.
सेरायाह, हा हिल्कियाहचा पुत्र, तो मशुल्लामाचा पुत्र, तो सादोकाचा पुत्र, तो मरायोथाचा पुत्र, जो अहीतूबाचा पुत्र होता. अहीतूब हा परमेश्वराच्या भवनाचा अधिकृत अधिकारी होता.
तेव्हा हिल्कियाहचा पुत्र एल्याकीम त्याच्या राजवाड्याचा कारभारी, चिटणीस शेबना व इतिहासलेखक योवाह जो आसाफाचा पुत्र, त्याच्याकडे गेले.
यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा: