Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने

314 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”

  2. अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.

  3. परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले;

  4. मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला.

  5. त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला.

  6. “मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.”

  7. अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला.

  8. म्हणून अब्राहामाने त्या जागेचे नाव “याहवेह यिरेह” आजपर्यंत “याहवेहच्या डोंगरावर पुरवठा केला जाईल,” असे बोलले जाते.

  9. नंतर याहवेहच्या दूताने अब्राहामाला स्वर्गातून दुसर्‍यांदा हाक मारली.

  10. ते म्हणाले, “मी याहवेह, स्वतःचीच शपथ घेऊन तुला सांगतो की, कारण तू हे केलेस आणि स्वतःच्या पुत्राला, एकुलत्या एक पुत्राला अर्पण करण्यास तू नाकारले नाहीस,

  11. म्हणून मी तुला निश्चितच आशीर्वादित करेन आणि वृद्धिंगत करून तुझी संतती आकाशातील तार्‍यांइतकी आणि समुद्रतीरावरील वाळू इतकी करेन. तुझी संतती आपल्या सर्व शत्रूंची शहरे हस्तगत करेल,

  12. आणि तू माझ्या आज्ञा पाळल्या आहेस, म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या वंशजापासून आशीर्वादित होतील.”

  13. यानंतर अब्राहाम आपल्या सेवकांकडे परत आला आणि ते सर्वजण बेअर-शेबा येथे आपल्या घरी परतले आणि अब्राहाम बेअर-शेबा येथे राहिला.

  14. साराह एकशे सत्तावीस वर्षे जगली.

  15. साराह ही कनान देशातील किर्याथ-अर्बा (म्हणजे हेब्रोन) येथे मरण पावली. अब्राहाम तिच्यासाठी शोक व विलाप करण्यास गेला.

  16. आणि साराहच्या मृतदेहाजवळ उभे राहून अब्राहाम हेथीच्या लोकांना म्हणाला,

  17. “या देशात मी एक परकीय व अनोळखी आहे. कृपया मला माझ्या मृतास पुरण्याकरिता जमिनीचा एक भाग विकत द्या.”

  18. हेथी लोकांनी अब्राहामाला उत्तर दिले,

  19. “महाराज, आमचे ऐका. आमच्यामध्ये आपण एक पराक्रमी राजपुत्र आहात. तुम्ही आपल्या मृतांसाठी स्वतःच कबर निवडून त्यांना मूठमाती द्या. आपली खाजगी कबर तुम्हाला देण्यास आमच्यातील कोणीही नकार देणार नाही.”

  20. हे ऐकून अब्राहामाने त्या हेथी लोकांसमोर लवून मुजरा केला आणि तो म्हणाला,

  21. “मी आपल्या मयतास पुरावे अशी तुमची इच्छा असेल तर माझे ऐका, जोहराचा पुत्र एफ्रोन,

  22. याला त्याच्या शेताच्या टोकाला असलेली मकपेला नावाची गुहा मला विकत देण्यास माझ्यावतीने विनंती करा. तिची पूर्ण किंमत मी देईन आणि ती माझ्या कुटुंबीयांसाठी स्मशानभूमी होईल.”

  23. एफ्रोन हेथी हा हेथी लोकांसह बसलेला होता, त्या नगरचौकात असलेल्या सर्व हेथी लोकांसमक्ष तो अब्राहामाला म्हणाला,

  24. “नाही, महाराज, माझे ऐका; ती गुहा आणि ते शेत मी तुम्हाला देईन, माझ्या लोकांच्या देखत मी तुम्हाला ती देत आहे. तिथे तुम्ही तुमच्या मृतास मूठमाती द्या.”

  25. अब्राहामाने त्या देशातील लोकांना पुन्हा लवून मुजरा केला