Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने

314 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता.

  2. तेव्हा ती अब्राहामाला म्हणाली, “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या; कारण त्या स्त्रीचा पुत्र कधीही माझा पुत्र इसहाक याच्याबरोबर वारसा वाटून घेणार नाही.”

  3. ही बाब अब्राहामाला खूप त्रास देत होती कारण ती त्याच्या मुलाची होती.

  4. तरी परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “तुझी स्त्री गुलाम आणि तिचा पुत्र यांच्यामुळे तू मनस्ताप करून घेऊ नकोस. साराहच्या म्हणण्याप्रमाणे कर, कारण इसहाकाद्वारेच तुझी संतती वाढेल.

  5. त्या दासीपुत्रापासूनही मी एक राष्ट्र निर्माण करेन, कारण तोही तुझा पुत्र आहे.”

  6. दुसर्‍या दिवशी अब्राहाम सकाळीच उठला, त्याने प्रवासासाठी भोजन आणि पाण्याची कातडी पिशवी हागारेला दिली. ती तिच्या खांद्यावर अडकवून मुलासह तिची रवानगी केली. ती तिथून निघाली व बेअर-शेबाच्या अरण्यात भटकू लागली.

  7. याच सुमारास अबीमेलेख राजा व त्याचा सेनापती पीकोल. हे अब्राहामाकडे आले, ते त्याला म्हणाले, “तू जे काही करतोस त्यात परमेश्वर तुला साहाय्य करतात.

  8. तर परमेश्वराच्या नावाने तू मला असे वचन दे की, तू माझ्याशी, माझ्या मुलांशी किंवा वंशजांशी कपटनीतीने वागणार नाहीस. ज्याप्रमाणे मी तुझ्याशी मित्रत्वाने वागलो आहे, त्याप्रमाणेच तूही माझ्या देशाशी मित्रत्वानेच वागशील.”

  9. अब्राहाम म्हणाला, “ठीक आहे, मी तुला शपथ देतो.”

  10. “पण तुझ्या सेवकांनी माझ्या नोकरांपासून जबरदस्तीने एक विहीर हिरावून घेतली आहे त्याचे काय?” अब्राहामाने अबीमेलेखकडे तक्रार केली.

  11. “हे तर मी पहिल्यांदाच ऐकत आहे,” अबीमेलेख राजाने उद्गार काढले, “आणि याला कोण जबाबदार आहे याची मला काहीच कल्पना नाही. हे तू मला आधी का सांगितले नाहीस?”

  12. मग अब्राहामाने मेंढरे आणि बैल घेतले आणि अबीमेलेखाला दिले आणि त्या दोघांनी करार केला.

  13. पण अब्राहामाने सात मेंढ्या बाजूला काढून ठेवल्या,

  14. तेव्हा अबीमेलेखाने अब्राहामाला विचारले, “तू असे का करीत आहेस? त्या मेंढ्या बाजूला का काढीत आहेस?”

  15. यावर अब्राहामाने उत्तर दिले, “ही विहीर मीच खोदली आहे, याचे जाहीर प्रमाण म्हणून या मेंढ्या मी तुला देणगीदाखल देत आहे.”

  16. म्हणून त्या वेळेपासून त्या विहिरीचे नाव बेअर-शेबा पडले. कारण दोघांनी त्याच ठिकाणी शपथ घेऊन करार केला होता.

  17. बेअर-शेबा येथे करार केल्यानंतर अबीमेलेख आणि त्याचा सेनापती पीकोल पलिष्ट्यांच्या देशात परतले.

  18. अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली.

  19. आणि अब्राहाम पलिष्ट्यांच्या देशात दीर्घकाल राहिला.

  20. काही वेळेनंतर परमेश्वराने अब्राहामाची परीक्षा घेतली. परमेश्वराने त्यास म्हटले, “अब्राहामा!” “हा, मी इथे आहे,” तो उत्तरला.

  21. मग परमेश्वर म्हणाले, “तुझा पुत्र, ज्याच्यावर तू प्रीती करतोस तो तुझा एकुलता एक पुत्र इसहाकाला बरोबर घे आणि मोरिया प्रदेशात जा आणि त्या ठिकाणी मी तुला जो डोंगर दाखवेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर.”

  22. अब्राहामाने दुसर्‍या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.

  23. तिसर्‍या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले.

  24. तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”

  25. अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले,