Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने: Isaac born to

11 वचने · 39 पैलू

Isaac born to बद्दल वचने

  1. साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला.

  2. अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले.

  3. असे लिहिले आहे की अब्राहामाला दोन पुत्र होते एक दासीपासून झालेला, तर दुसरा स्वतंत्र स्त्रीपासून झालेला.

  4. त्या दासीपासून झालेला पुत्र दैहिकरितीने जन्मला, परंतु स्वतंत्र स्त्रीपासून झालेला पुत्र दैवी अभिवचनाचा परिणाम म्हणून जन्मला.

  5. अलंकारिक रूपात या गोष्टी घेतल्या आहेत पाहा: या स्त्रिया दोन करार आहेत. त्यापैकी एक करार आहे सीनाय पर्वतावर केलेला करार ज्यामुळे दास्यत्वाच्या संतानाचा जन्म होतो: ही हागार आहे.

  6. आता हागार ही अरबस्थानातील सीनाय पर्वत असा आहे आणि आता अस्तित्वात असलेल्या यरुशलेम शहराचे प्रतीक आहे, कारण ती तिच्या संतानाबरोबर दास्यात आहे.

  7. परंतु यरुशलेम जी वर आहे ती स्वतंत्र आहे आणि ती आपली मातृनगरी आहे.

  8. जसे यशायाहने लिहिले आहे: “हे वांझ स्त्रिये, तू जी कधीही प्रसवली नाही; उचंबळून गीत गा, मोठ्याने जयघोष कर, कारण विवाहित स्त्रीपेक्षा, तू, जिला प्रसूती वेदना झाल्या नाही, त्या परित्यक्ता स्त्रीला अधिक लेकरे आहेत,”

  9. आता बंधू व भगिनींनो, आपण इसहाकासारखे अभिवचनाची मुले आहोत.

  10. त्यावेळेस दैहिकरित्या जन्मलेल्या पुत्राने आत्म्याच्या शक्तीने जन्मलेल्या पुत्राचा छळ केला तसेच आताही होत आहे.

  11. पण शास्त्रलेखात काय लिहिले आहे? “दासी व तिचा पुत्र यांना घालवून द्या, कारण दासीचा पुत्र स्वतंत्र स्त्रीच्या पुत्राबरोबर कधीही वारस होणार नाही.”