Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने: Circumcision of

10 वचने · 39 पैलू

Circumcision of बद्दल वचने

  1. तू आणि तुझ्या वंशजांशी हा माझा करार म्हणजे: तुमच्यातील प्रत्येक पुरुषाची तुम्ही सुंता केली पाहिजे.

  2. ही सुंता, तुझ्या आणि माझ्यामध्ये केलेल्या कराराचे चिन्ह होईल.

  3. पुत्र जन्मल्यानंतर आठव्या दिवशी त्याची सुंता केली पाहिजे. सुंतेची ही अट तू पैसे देऊन विकत घेतलेल्या परदेशीय गुलामांना आणि तुझ्या घराण्यात जन्मलेल्या प्रत्येकाला, जी तुझी संतती नाही त्यांनाही लागू आहे.

  4. तुझ्या घराण्यात जन्मलेल्या किंवा तू पैसे देऊन विकत घेतलेल्या प्रत्येक पुरुषाची सुंता केली जावो. तुझ्या शरीराशी केलेला हा करार सदासर्वकाळचा आहे.

  5. सुंता न केलेल्या प्रत्येक पुरुषाला त्या समाजातून बेदखल करण्यात येईल कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

  6. त्याच दिवशी अब्राहामाने आपला पुत्र इश्माएल आणि आपल्या घरात जन्मलेले किंवा पैसे देऊन विकत घेतलेले सर्व पुरुष यांची परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे सुंता केली.

  7. अब्राहामाची सुंता झाली त्यावेळी तो नव्याण्णव वर्षांचा होता,

  8. आणि त्याचा पुत्र इश्माएल तेरा वर्षांचा होता जेव्हा त्याची सुंता झाली.

  9. अब्राहाम व त्याचा पुत्र इश्माएल या दोघांचीही सुंता एकाच दिवशी झाली.

  10. अब्राहामाच्या घरातील सर्व पुरुष, त्याच्या घरात जन्मलेले व पैसे देऊन परदेशी व्यक्तीकडून खरेदी केली गुलाम यांचीही त्याच्याबरोबर सुंता झाली.