Abraham बद्दल बायबलमधील वचने: Piety of
Piety of बद्दल वचने
मग याहवेहने अब्रामाला दर्शन देऊन म्हटले, “हा देश मी तुझ्या संतानाला देणार आहे.” तेव्हा जे अब्रामाला प्रकट झाले त्या याहवेहसाठी त्याने एक वेदी बांधली.
तिथून तो बेथेलाच्या पूर्वेकडे डोंगराकडे गेला आणि जिथे पश्चिमेकडे बेथेल व पूर्वेकडे आय हे शहर होते, तिथे त्याने आपला तळ दिला. तिथेच त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि याहवेहच्या नावाने उपासना केली.
व वेदी बांधली होती, तिथे पोहोचल्यावर अब्रामाने पुन्हा एकदा याहवेहची उपासना केली.
मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.
कारण मी त्याला निवडले आहे अशासाठी की त्याने त्याच्यानंतर त्याच्या लेकरांना व त्याच्या घराण्याला याहवेहच्या मार्गात जे योग्य व न्यायी आहे, त्यात चालवावे, त्यामुळे अब्राहामाला दिलेले अभिवचन याहवेह पूर्ण करतील.”
आता तू तिला आपल्या पतीकडे परत पाठवून दे. तिचा पती माझा संदेष्टा आहे. तो तुझ्यासाठी प्रार्थना करेल, म्हणजे तू जिवंत राहशील; पण जर तू तिला परत पाठविले नाहीस, तर तू आणि तुझे सर्व लोक खात्रीने मरतील.”
अब्राहामाने बेअर-शेबा येथे टमरिस्क म्हणजे एशेल नावाचे झाड लावले आणि सनातन परमेश्वर याहवेहची आराधना केली.
अब्राहामाने दुसर्या दिवशी पहाटेस उठून गाढवावर खोगीर लादले आणि आपला पुत्र इसहाक व दोन सेवकांना व होमार्पणासाठी पुरेशी लाकडे बरोबर घेऊन तो परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणी जावयास निघाला.
तिसर्या दिवशी अब्राहामाने आपली दृष्टी वर करून ते ठिकाण दुरून पाहिले.
तेव्हा अब्राहाम सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवाजवळ थांबा, मी आणि माझा पुत्र पलीकडे जातो. परमेश्वराची उपासना करून तुमच्याकडे परत येतो.”
अब्राहामाने होमार्पणासाठी घेतलेले लाकूड इसहाकाच्या खांद्यावर ठेवले आणि स्वतः सुरा व विस्तव घेतला. जसे ते चालत पुढे गेले,
इसहाकाने अब्राहामाला विचारले, “बाबा?” “काय माझ्या मुला?” अब्राहामाने उत्तर दिले. “आपण लाकडे व विस्तव घेतले,” इसहाक म्हणाला, “पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे?”
अब्राहामाने उत्तर दिले, “परमेश्वर होमार्पणासाठी कोकरू पुरवतील, माझ्या मुला.” आणि ते दोघे एकत्र पुढे गेले.
परमेश्वराने ज्या ठिकाणी जाण्यास सांगितले होते त्या जागी आल्यावर अब्राहामाने एक वेदी बांधली आणि त्यावर त्याने लाकडे रचून ठेवली. त्याने आपला पुत्र इसहाकाला बांधले आणि वेदीवरील लाकडांवर ठेवले;
मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्याकरिता आपल्या हातातील सुरा उंचाविला.
त्याच क्षणाला याहवेहचा दूत स्वर्गातून ओरडून म्हणाला, “अब्राहामा, अब्राहामा!” “हा मी इथे आहे,” तो उत्तरला.
“मुलावर आपला हात उगारू नको.” तो म्हणाला, “त्याला काहीही करू नकोस. तुला परमेश्वराचे भय आहे हे मला समजले आहे, कारण तुझा पुत्र, एकुलता एक पुत्र मला अर्पिण्याचे तू नाकारले नाहीस.”
अब्राहामाची नजर झुडूपात शिंगे अडकलेल्या एका एडक्याकडे गेली. त्याने तो एडका धरला आणि आपल्या पुत्राच्या जागी त्याने त्या एडक्याचा होमार्पण म्हणून बळी दिला.
कारण अब्राहामाने माझे आज्ञापालन केले आणि मी सांगितलेला प्रत्येक नियम, विधी व प्रत्येक सूचनेचे पालन केले.”
आमच्या परमेश्वरा, या प्रदेशातील रहिवाशांना तुम्ही तुमच्या इस्राएली लोकांपुढून घालवून दिले आणि तो प्रदेश तुमचे मित्र अब्राहामच्या वंशजांना कायमचा दिला नाही का?
“याहवेह तुम्हीच परमेश्वर आहात, ज्यांनी अब्रामाला निवडले आणि त्याला खाल्डियनांच्या ऊर शहरातून बाहेर काढून अब्राहाम असे नाव दिले.
त्याचे अंतःकरण तुमच्याशी विश्वासू आहे हे तुम्ही बघितले, म्हणून त्याच्या वंशजांना कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, यबूसी व गिर्गाशीचा देश देण्याचा तुम्ही त्याच्याशी करार केला. तुम्ही वचन दिल्याप्रमाणे केले, कारण तुम्ही विश्वासयोग्य आहात.
“परंतु हे इस्राएल, माझे सेवक, याकोब, माझे निवडलेले, कारण तुम्ही माझा मित्र अब्राहामाचे वंशज आहात,
यास्तव, अभिवचन विश्वासाच्याद्वारे कृपा म्हणून अब्राहामाच्या सर्व वंशजाला मिळते. जे केवळ नियमांच्या अधीन आहेत त्यांनाच नव्हे, तर ज्यांचा विश्वास अब्राहामाच्या विश्वासासारखा आहे त्या सर्वांना, कारण अब्राहाम आपल्या सर्वांचा पिता आहे.
असे लिहिले आहे: “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले.” परमेश्वराच्या दृष्टीने अब्राहाम आमचा पिता आहे, ज्यावर त्याने विश्वास ठेवला, जो परमेश्वर मेलेल्यांना जीवन देतो आणि ज्यागोष्टी नाही त्या गोष्टी अस्तित्वात याव्या अशी आज्ञा देतो.