Abraham बद्दल बायबलमधील वचने: Dwells in Canaan
Dwells in Canaan बद्दल वचने
याहवेहने सूचना केल्याप्रमाणे अब्राम निघाला; आणि लोटही त्याच्याबरोबर गेला. अब्राम हारान येथून निघाला त्यावेळी तो पंचाहत्तर वर्षांचा होता.
अब्राम आपल्याबरोबर आपली पत्नी साराय, त्याचा पुतण्या लोट, तसेच आपली धनदौलत म्हणजे हारानात मिळालेली गुरे व लोक घेऊन निघाला आणि कनान देशात पोहोचला.
अब्राम त्या प्रदेशातून प्रवास करीत शेखेम येथील मोरेहच्या मोठ्या एला वृक्षापर्यंत गेला. त्यावेळी कनानी लोक या देशात राहत होते.
“तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले.