Skip to content

Abraham बद्दल बायबलमधील वचने

314 वचने · 39 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेह त्याला म्हणाले, “तू तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, तसेच एक होला आणि पारव्याचे एक पिल्लू घेऊन ये.”

  2. अब्रामाने हे सर्व आणले आणि त्या प्राण्यांचा वध करून ते त्याने मधोमध कापले; व त्यांचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवले; पण पक्षी मात्र विभागले नाही.

  3. त्या प्राण्यांच्या मृतशरीरांवर गिधाडांनी झडप घातली, तेव्हा अब्रामाने गिधाडांना हुसकावून लावले.

  4. सूर्यास्ताच्या वेळी अब्रामाला गाढ निद्रा लागली आणि त्याच्यावर दाट आणि भयानक गडद अंधार पडला.

  5. मग याहवेहने अब्रामाला म्हटले, “हे निश्चितपणे जाणून घे की, तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.

  6. परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन. त्यानंतर तुझे वंशज त्या देशातून पुष्कळ धन घेऊन बाहेर पडतील.

  7. पण तू चांगला म्हातारा होऊन मरण पावशील व शांतीने तुझ्या पूर्वजांबरोबर पुरला जाशील.

  8. चार पिढ्यानंतर तुझे वंशज या भूमीत परत येतील, कारण अमोर्‍यांचा अपराध अजून पूर्ण झालेला नाही.”

  9. नंतर सूर्य मावळला आणि अंधार पडला तेव्हा अब्रामाने त्या प्राण्यांच्या मृतशरीराच्या दोन ढिगांमधून धुमसते अग्निपात्र आणि पेटलेली मशाल जाताना पाहिली.

  10. त्या दिवशी याहवेहने अब्रामाशी करार केला; त्यांनी म्हटले, “मी तुझ्या वंशजांना इजिप्त देशाच्या नदीपासून फरात नदीपर्यंतचा जो सर्व प्रदेश—

  11. केनी, कनिज्जी, कदमोनी,

  12. हिथी, परिज्जी, रेफाईम,

  13. अमोरी, कनानी, गिर्गाशी व यबूसी या लोकांचा देश देत आहे.”

  14. अब्राम कनान देशात राहून दहा वर्षे झाली होती. अब्रामाची पत्नी साराय हिने आपली इजिप्तची दासी हागार हिला अब्रामाची पत्नी होण्यासाठी त्याच्याकडे सोपविले.

  15. मग अब्रामाला हागारेपासून एक पुत्र झाला आणि तिच्यापासून झालेल्या पुत्राचे नाव अब्रामाने इश्माएल असे ठेवले.

  16. हागारेला अब्रामापासून इश्माएल झाला त्यावेळी अब्राम शहाऐंशी वर्षांचा होता.

  17. अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.

  18. मग मी माझ्या व तुझ्यामध्ये एक करार करेन आणि तुला बहुगुणित करेन.”

  19. अब्रामाने भूमीपर्यंत लवून नमस्कार केला आणि परमेश्वर त्याला म्हणाले,

  20. “मी तुझ्याशी हा करार करतो: तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील.

  21. आता येथून पुढे तुझे नाव अब्राम असे राहणार नाही, तर ते अब्राहाम असे होईल. कारण मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता केले आहे.

  22. मी तुला फलद्रूप करेन; मी तुझ्यापासून राष्ट्रे उदयास आणेल आणि तुझ्या संततीमधून राजे उत्पन्न होतील.

  23. तुझ्या व तुझ्या येणार्‍या पिढीबरोबर मी असा शाश्वत करार स्थापित करेन की, तुझा व तुझ्यानंतर तुझ्या संतानांचा मी परमेश्वर होईन.

  24. ज्या देशात आज तू परका आहेस, तो संपूर्ण कनान देश मी तुला आणि तुझ्यानंतर तुझ्या वंशजांना कायमचे वतन म्हणून देईन; आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.”

  25. मग परमेश्वराने अब्राहामाला सांगितले, “माझ्याशी केलेल्या कराराचे तू आणि तुझ्या येणार्‍या वंशजांनी पिढ्यान् पिढ्या पर्यंत पालन करावे.