मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पिता स्वतःच्या मुलांशी वागतो त्याचप्रमाणे आम्ही तुमच्या प्रत्येकाशी वागलो, हे तुम्हाला माहीत आहे,

  2. तुम्हाला उत्तेजन, सांत्वन आणि विनंती करून सांगतो की ज्या परमेश्वराने तुम्हाला त्यांच्या गौरवी राज्यात बोलाविले आहे, त्यांना शोभेल असे जीवन जगा.

  3. परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.

  4. कारण बंधू आणि भगिनींनो, यहूदीयामध्ये तुम्ही ख्रिस्त येशूंमध्ये असलेल्या परमेश्वराच्या मंडळ्यांचे अनुकरण करणारे झालात म्हणून स्वतःच्या बांधवांकडून तुम्हाला दुःख सहन करावे लागले, त्याच गोष्टी यहूदी लोकांकडूनही या मंडळ्यांना सहन कराव्या लागल्या.

  5. त्यांनी प्रभू येशूंना आणि संदेष्ट्यांना ठार मारले; आणि आम्हालाही हाकलून लावले. त्यांनी परमेश्वराला नाखुश केले आणि सर्वांचे विरोधी झाले,

  6. आम्ही त्यांच्याशी संवाद करू नये, जेणे करून गैरयहूदीयांचे तारण होईल, म्हणून ते आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करीत होते आणि अशा रीतीने त्यांच्या पापांचे माप भरत आले आहे. परंतु आता शेवटी परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आला आहे.

  7. बंधू आणि भगिनींनो, आम्ही थोड्या वेळासाठी तुम्हापासून शरीराने दूर असलो, पण विचाराने नव्हे, आमच्या प्रबळ इच्छेने तुम्हाला भेटण्याचा प्रत्येक प्रकारे प्रयत्न केला.

  8. आम्ही तुमच्याकडे येण्याचा, मी स्वतः पौलाने वारंवार प्रयत्न केला. परंतु सैतानाने आम्हाला अडविले.

  9. आमची आशा, आमचा आनंद, आपल्या प्रभू येशूंच्या पुनरागमनासमयी त्यांच्या सान्निध्यात जो आमचा आशेचा मुकुट तो काय? ते तुम्हीच आहात ना?

  10. कारण तुम्हीच आमचे गौरव आणि आनंद आहात.

  11. जेव्हा आमच्यात त्राण उरले नाही असे वाटले तेव्हा, ॲथेन्स इथे थांबून राहणे उत्तम वाटले.

  12. ख्रिस्ताच्या शुभवार्तेचा प्रसार कार्य करणारा आमचा बंधू आणि परमेश्वराच्या सेवेतील सहकर्मी असलेला तीमथ्य, त्याने तुम्हाला विश्वासात बळकट व प्रोत्साहित करावे म्हणून आम्ही त्याला पाठविले आहे.

  13. यासाठी तुमच्यामधील कोणीही या परीक्षांमुळे अस्थिर होऊ नये, कारण यासाठीच आपण नेमलेले आहोत हे तुम्हाला चांगले ठाऊक आहे.

  14. वास्तविक, आम्ही तुमच्याकडे असतानाच, आम्ही तुम्हाला नेहमीच सांगत आलो की आपला छळ होईल आणि त्याप्रमाणे घडून आले, हे देखील तुम्हाला चांगले माहीत आहे.

  15. कारण, जेव्हा हे माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे झाले, तेव्हा तुमच्या विश्वासाविषयी विचारपूस करण्यास मी त्याला तुमच्याकडे पाठविले. कदाचित कोणत्याही मार्गाने का होईना परीक्षकाने तुम्हाला परीक्षेत पाडले असेल आणि आमचे सर्व श्रम व्यर्थ गेले असतील अशी भीती मला वाटली.

  16. तीमथ्य तुमच्याकडून नुकताच आम्हाकडे परतला असून त्याने तुमचा विश्वास आणि प्रीती याबद्दल चांगली बातमी दिली आहे आणि आमच्याबद्दल तुम्हाला गोड आठवणी आहेत व तुम्हाला भेटण्यासाठी आम्ही जसे उत्कंठित आहोत, तसेच आम्हाला भेटण्यासाठी तुम्हीही उत्कंठित आहात.

  17. त्यामुळे, बंधू आणि भगिनींनो, आमच्या सर्व दुःखात व छळात तुमच्या विश्वासाद्वारे तुमच्याकडून आम्हाला उत्तेजन मिळाले आहे.

  18. तुम्ही प्रभूमध्ये स्थिर उभे आहात म्हणून आम्ही खर्‍या अर्थाने जगतो.

  19. परमेश्वराच्या समक्षतेत जो सर्व आनंद आम्हाला तुमच्यामुळे झाला आहे त्याबद्दल आम्ही तुमच्याबद्दल परमेश्वराचे पुरेसे आभार कसे मानावयाचे?

  20. आम्ही तुमच्यासाठी रात्र आणि दिवस फार आग्रहाने प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला लवकरच भेटावे आणि तुमच्या विश्वासामध्ये जे काही उणे असेल ते पूर्ण करावे.

  21. आता स्वतः आमचे परमेश्वर पिता आणि आपले प्रभू येशू ख्रिस्त यांनी आमचा तुम्हाकडे येण्याचा मार्ग सिद्ध करावा.

  22. प्रभू असे करो की जशी आम्ही तुमच्यावर करतो तशी तुमची प्रीती वाढावी आणि एकमेकांसाठी ओसंडून वाहावी.

  23. आपले प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जणांसह येतील, त्यावेळी आपल्या परमेश्वर पित्याच्या समक्षतेत तुम्ही दोषरहित आणि पवित्र असावे, म्हणून ते तुमची मने बळकट करोत.

  24. प्रिय बंधू आणि भगिनींनो, इतर गोष्टीसंबंधाने आम्ही तुम्हाला आज्ञा केली होती की परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी कसे जीवन जगावे आणि ते तुम्ही जगतच आहात आणि आता आम्ही तुम्हाला सांगतो व प्रभू येशूंमध्ये विनंती करतो की तुम्ही अधिकाधिक वाढ करावी.

  25. आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत.