circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१०सुमारे इ.स. ५४
ते आपल्यासाठी मरण पावले, यासाठी की आपण जागे असलो किंवा झोपेत असलो तरी त्याच्याबरोबर जिवंत राहावे.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:११सुमारे इ.स. ५४
म्हणून तुम्ही आता जे करीत आहात त्याचप्रमाणे एकमेकांना प्रोत्साहन द्या आणि एकमेकांची वुद्धी करण्यासाठी झटा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१२सुमारे इ.स. ५४
बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सांगतो की जे तुम्हामध्ये परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमची काळजी घेतात आणि तुम्हाला बोध करतात त्यांचा मान राखा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१३सुमारे इ.स. ५४
त्यांच्या कार्यामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्या, एकमेकांबरोबर शांतीने राहा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१४सुमारे इ.स. ५४
बंधू आणि भगिनींनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की जे आळशी आणि लुडबुड करणारे आहेत त्यांना ताकीद द्या, जे निराश आहेत त्यांना उत्तेजन द्या, अशक्तांना आधार द्या, प्रत्येकाशी सहनशीलतेने वागा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१५सुमारे इ.स. ५४
कोणी वाईटाची फेड वाईटाने करणार नाही याची काळजी घ्या, परंतु प्रत्येकाचे आणि सर्वांचे सर्वदा चांगले करण्यासाठी झटा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१६सुमारे इ.स. ५४
सर्वदा आनंदित राहा,
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१७सुमारे इ.स. ५४
निरंतर प्रार्थना करा,
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१८सुमारे इ.स. ५४
सर्व परिस्थितीत उपकारस्मरण करा, कारण ख्रिस्त येशूंमध्ये तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा हीच आहे.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:१९सुमारे इ.स. ५४
पवित्र आत्म्याला विझवू नका.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२०सुमारे इ.स. ५४
संदेशाला तुच्छ मानू नका.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२१सुमारे इ.स. ५४
परंतु त्या सर्वांची परीक्षा करा; जे चांगले आहे ते धरून ठेवा,
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२२सुमारे इ.स. ५४
सर्वप्रकारच्या वाईटाचा निषेध करा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२३सुमारे इ.स. ५४
परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२४सुमारे इ.स. ५४
ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२५सुमारे इ.स. ५४
बंधू आणि भगिनींनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२६सुमारे इ.स. ५४
परमेश्वराच्या सर्व लोकांचे पवित्र चुंबनाने अभिवादन करा.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२७सुमारे इ.स. ५४
हे पत्र सर्व बंधू आणि भगिनींना वाचून दाखवावे, अशी मी तुम्हाला प्रभूसमोर आज्ञा करतो.
- 1 थेस्सलनीकाकरांस ५:२८सुमारे इ.स. ५४
आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हावर असो.
- 2 थेस्सलनीकाकरांस १:१सुमारे इ.स. ५४
परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या थेस्सलनीका येथील मंडळीस,
- 2 थेस्सलनीकाकरांस १:२सुमारे इ.स. ५४
परमेश्वर आपले पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो.
- 2 थेस्सलनीकाकरांस १:३सुमारे इ.स. ५४
बंधू आणि भगिनींनो, आम्ही सतत तुमच्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो आणि तसे करणे योग्य आहे, कारण तुमचा विश्वास अधिकाधिक वाढत आहे आणि तुम्हा सर्वांचे जे एकमेकांवरील प्रेम आहे ते देखील वाढत आहे.
- 2 थेस्सलनीकाकरांस १:४सुमारे इ.स. ५४
यास्तव, तुम्ही सर्व छळांमध्ये आणि परीक्षांमध्ये जो धीर दाखविला आणि त्यामध्ये तुम्ही जी चिकाटी आणि विश्वास दाखविला त्याबद्दल आम्ही परमेश्वराच्या मंडळ्यांमध्ये अभिमानाने सांगतो.
- 2 थेस्सलनीकाकरांस १:५सुमारे इ.स. ५४
परमेश्वराचा न्याय योग्य आहे, याचे हे सर्व प्रमाण आहे आणि याचा परिणाम म्हणजे ज्या परमेश्वराच्या राज्यासाठी तुम्ही दुःख सोसत आहात त्यासाठी तुम्ही पात्र ठरावे.
- 2 थेस्सलनीकाकरांस १:६सुमारे इ.स. ५४
परमेश्वर न्यायी आहेत: जे तुम्हाला त्रास देतात त्यांची परतफेड ते त्रासांनी करतील.