मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कलस्सैकरांस ३:१४सुमारे इ.स. ६४

    आणि या सर्व सद्गुणांपेक्षा प्रीती धारण करा कारण त्यामुळे तुम्ही सर्वजण प्रीतीमध्ये एकत्र बांधले जाल.

  2. कलस्सैकरांस ३:१५सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्ताची शांती, तुमच्या अंतःकरणात राज्य करो; कारण एकाच शरीराचे अवयव म्हणून तुम्हीही या शांतीसाठी बोलावलेले आहात. तुम्ही कृतज्ञ राहा.

  3. कलस्सैकरांस ३:१६सुमारे इ.स. ६४

    स्तोत्रे, गाणी आणि आत्मिक गीते, यांच्याद्वारे कृतज्ञ अंतःकरणातून परमेश्वराला गाणी गाऊन एकमेकांना पूर्ण सज्ञानाने शिकविताना आणि बोध देताना ख्रिस्ताचा संदेश तुम्हामध्ये विपुलतेने राहो.

  4. कलस्सैकरांस ३:१७सुमारे इ.स. ६४

    आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.

  5. कलस्सैकरांस ३:१८सुमारे इ.स. ६४

    पत्नींनो, जसे प्रभूला योग्य तसे तुम्ही तुमच्या पतीच्या अधीन असा.

  6. कलस्सैकरांस ३:१९सुमारे इ.स. ६४

    पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीवर प्रीती करा, व तिच्याशी कठोरतेने वागू नका.

  7. कलस्सैकरांस ३:२०सुमारे इ.स. ६४

    लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा, कारण त्यामुळे प्रभूला संतोष होतो.

  8. कलस्सैकरांस ३:२१सुमारे इ.स. ६४

    वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना प्रकोपित करू नका, नाही तर त्यांचे धैर्य खचेल.

  9. कलस्सैकरांस ३:२२सुमारे इ.स. ६४

    दासांनो, तुम्ही पृथ्वीवरील आपल्या धन्यांचे प्रत्येक गोष्टीत आज्ञापालन करा, केवळ त्यांची नजर तुमच्यावर असतानाच त्यांची कृपादृष्टी व्हावी म्हणून नाही, तर सत्य मनाने प्रभूचे भय बाळगून करा.

  10. कलस्सैकरांस ३:२३सुमारे इ.स. ६४

    जे काही तुम्ही करता, ते पूर्ण मनाने करा, मनुष्यांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी म्हणून करा.

  11. कलस्सैकरांस ३:२४सुमारे इ.स. ६४

    हे तुम्हाला माहीत आहे की, प्रभूपासून तुम्हाला वारसा हे प्रतिफळ म्हणून मिळेल. तुम्ही प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत आहात.

  12. कलस्सैकरांस ३:२५सुमारे इ.स. ६४

    अन्याय करणार्‍यास त्याच्या अन्यायाचे प्रतिफळ मिळेल, पक्षपात होणार नाही.

  13. कलस्सैकरांस ४:१सुमारे इ.स. ६४

    धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.

  14. कलस्सैकरांस ४:२सुमारे इ.स. ६४

    जागृत राहून आणि उपकारस्तुतीसह प्रार्थनेत तत्पर राहा.

  15. कलस्सैकरांस ४:३सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्ताच्या रहस्याची घोषणा आम्हाला करता यावी याकरिता परमेश्वराने आमच्या संदेशासाठी दार उघडावे म्हणूनही प्रार्थना करा. त्याचकरिता मी या बंधनात आहे.

  16. कलस्सैकरांस ४:४सुमारे इ.स. ६४

    ती जशी स्पष्टपणे सांगितली पाहिजे, तशी मला सांगता यावी, म्हणून प्रार्थना करा.

  17. कलस्सैकरांस ४:५सुमारे इ.स. ६४

    बाहेरील लोकांबरोबर सुज्ञतेने वागा; आणि प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.

  18. कलस्सैकरांस ४:६सुमारे इ.स. ६४

    तुमचे संभाषण सर्वदा कृपेने भरलेले, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला कळेल.

  19. कलस्सैकरांस ४:७सुमारे इ.स. ६४

    तुखिक माझे सर्व वर्तमान तुम्हाला सांगेल. तो माझा प्रिय बंधू आणि प्रभूच्या कार्यातील प्रामाणिक सहकारी आहे.

  20. कलस्सैकरांस ४:८सुमारे इ.स. ६४

    मी त्याला याच हेतूने पाठवित आहे की त्याद्वारे तुम्हाला आमची खुशाली तुम्हाला समजावी व त्याने तुमच्या हृदयास प्रोत्साहित करावे.

  21. कलस्सैकरांस ४:९सुमारे इ.स. ६४

    विश्वासू व अतिप्रिय बंधू अनेसिम, तुम्हामधील एक, यालाही मी तुम्हाकडे पाठवित आहे. तो व तुखिक तुम्हाला येथील सर्व अद्यावत बातम्या देतील.

  22. कलस्सैकरांस ४:१०सुमारे इ.स. ६४

    माझ्याबरोबर येथे बंदिवान असलेला अरिस्तार्ख, तसेच बर्णबाचा नातेवाईक मार्कही तुम्हाला आपली शुभेच्छा पाठवितात. मी पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे मार्क कधी तुमच्याकडे आला, तर त्याचे मनापासून स्वागत करा.

  23. कलस्सैकरांस ४:११सुमारे इ.स. ६४

    येशू म्हटलेला यूस्त देखील आपली शुभेच्छा पाठवित आहे. परमेश्वराच्या राज्यासाठी हेच तेवढे यहूदी येथे माझे सहकारी आहेत आणि ते माझ्या सांत्वनाचे कारण झाले आहेत.

  24. कलस्सैकरांस ४:१२सुमारे इ.स. ६४

    जो तुमच्यातील एक आणि ख्रिस्त येशूंचा दास, एपफ्रास, तुम्हाला शुभेच्छा पाठवितो. तो तुमच्यासाठी नेहमी झटून प्रार्थना करून परमेश्वराजवळ मागतो, की परमेश्वराच्या इच्छेमध्ये तुम्ही परिपक्व व पूर्ण खात्री झालेले असे स्थिर उभे राहावे.

  25. कलस्सैकरांस ४:१३सुमारे इ.स. ६४

    मी साक्ष देतो की, त्याने तुमच्यासाठी आणि लावदिकीया व हिरापोलिस येथील लोकांसाठी फार श्रम केले आहेत.