मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कलस्सैकरांस २:१२सुमारे इ.स. ६४

    कारण तुम्ही बाप्तिस्म्यामध्ये त्यांच्यासह पुरला गेलात व ज्यांना त्यांनी मरणातून उठविले यांच्याबरोबर तुम्हीही परमेश्वराच्या कृतीवरील विश्वासाद्वारे उठविण्यात आले आहात.

  2. कलस्सैकरांस २:१३सुमारे इ.स. ६४

    जेव्हा तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व शारीरिक असुंतेमध्ये मृत होता, त्यावेळी परमेश्वराने ख्रिस्तामध्ये तुम्हाला जिवंत केले आणि आपल्या सर्व पातकांची क्षमा केली.

  3. कलस्सैकरांस २:१४सुमारे इ.स. ६४

    आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले,

  4. कलस्सैकरांस २:१५सुमारे इ.स. ६४

    आणि सत्तांना आणि अधिकारांना हाणून पाडले व त्यांचे उघड प्रदर्शन करून क्रूसाद्वारे त्यांच्यावर विजय संपादन केला.

  5. कलस्सैकरांस २:१६सुमारे इ.स. ६४

    तेव्हा खाणेपिणे, किंवा धार्मिक सण, किंवा नवा चंद्रोत्सव किंवा शब्बाथ, याविषयी कोणालाही तुमचा न्याय करू देऊ नका.

  6. कलस्सैकरांस २:१७सुमारे इ.स. ६४

    हे सर्व केवळ येणार्‍या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते.

  7. कलस्सैकरांस २:१८सुमारे इ.स. ६४

    जो कोणी व्यर्थ नम्रतेचा देखावा करण्यात संतोष पावतो आणि देवदूतांची उपासना करतो, त्यांनी तुम्हाला अपात्र ठरवू नये. असा मनुष्य पाहिलेल्या गोष्टींचे विस्तारपूर्वक वर्णन करतो आणि दैहिक विचारांनी, आत्मिक नसलेल्या हृदयाने उगीचच फुगून जातो.

  8. कलस्सैकरांस २:१९सुमारे इ.स. ६४

    त्या लोकांचा त्यांच्या मस्तकाशी संबंध तुटला आहे, ज्या मस्तकाला संपूर्ण शरीर बळकटपणे एकत्रित जोडले जाते, सांधे व बंधने त्यांच्यापासून पुरवठा पावते व त्याची परमेश्वरामध्ये वाढ होते.

  9. कलस्सैकरांस २:२०सुमारे इ.स. ६४

    तुम्ही ख्रिस्ताबरोबर जगाच्या प्राथमिक तत्वज्ञानास मरण पावलेले आहात, तरी देखील तुम्ही जणू काय जगाशी जोडलेले आहात व त्याच्या नियमांच्या अधीन आहात.

  10. कलस्सैकरांस २:२१सुमारे इ.स. ६४

    “हात लावू नको! चव घेऊ नको! स्पर्श करू नको!”

  11. कलस्सैकरांस २:२२सुमारे इ.स. ६४

    हे नियम मानवी शिकवण व आज्ञा यावर आधारित आहेत, ते वारंवार उपयोगात आणल्यामुळे नष्ट होणे स्वाभाविक आहे.

  12. कलस्सैकरांस २:२३सुमारे इ.स. ६४

    खरोखर या नियमांना ज्ञानाचा देखावा आहे, स्वनियमाने नेमलेली उपासना, खोटी नम्रता आणि देहाला कठोर कष्ट देणे या गोष्टी आहेत. परंतु दैहिक वासना नियंत्रणात ठेवण्यासाठी या नियमांचा काडी इतकाही उपयोग होत नाही.

  13. कलस्सैकरांस ३:१सुमारे इ.स. ६४

    यास्तव, ख्रिस्ताबरोबर तुम्ही उठविले गेला आहात, तर जिथे ख्रिस्त परमेश्वराच्या उजवीकडे बसले आहे, तेथील वरील गोष्टींकडे आपली मने लावा.

  14. कलस्सैकरांस ३:२सुमारे इ.स. ६४

    तुम्ही आपली अंतःकरणे स्वर्गीय गोष्टींकडे लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.

  15. कलस्सैकरांस ३:३सुमारे इ.स. ६४

    कारण तुम्ही मृत असून, आता तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर परमेश्वरामध्ये गुप्त ठेवलेले आहे.

  16. कलस्सैकरांस ३:४सुमारे इ.स. ६४

    ख्रिस्त जे आपले जीवन आहेत, ते प्रकट होतील, तेव्हा तुम्हीही त्यांच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.

  17. कलस्सैकरांस ३:५सुमारे इ.स. ६४

    म्हणून आपल्यातील ऐहिक स्वभाव कायमचा ठार करा: जसे लैंगिक अनैतिकता, अशुद्धता, कामवासना, दुष्ट इच्छा आणि लोभ जी मूर्तिपूजा आहे.

  18. कलस्सैकरांस ३:६सुमारे इ.स. ६४

    यामुळे परमेश्वराचा क्रोध येणार आहे.

  19. कलस्सैकरांस ३:७सुमारे इ.स. ६४

    पूर्वी तुम्हीही याप्रकारे चालत होता व असेच जीवन जगत होता.

  20. कलस्सैकरांस ३:८सुमारे इ.स. ६४

    परंतु आता तुम्ही संताप आणि राग, दुष्टभाव, निंदा, मुखातून शिवीगाळी करणे हे सर्व आपल्यापासून दूर करा.

  21. कलस्सैकरांस ३:९सुमारे इ.स. ६४

    एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुमचा जुना मनुष्य त्याच्या कृतींसह तुम्ही काढून टाकला आहे.

  22. कलस्सैकरांस ३:१०सुमारे इ.स. ६४

    तुम्ही आता नवा मनुष्य धारण केला आहे, जो आपल्या उत्पन्न करणार्‍याच्या प्रतिमेमध्ये, ज्ञानामध्ये नवा होत आहे.

  23. कलस्सैकरांस ३:११सुमारे इ.स. ६४

    यामध्ये गैरयहूदी किंवा यहूदी, सुंती किंवा असुंती, बर्बर व स्कुथी, गुलाम किंवा स्वतंत्र असा फरक नाही, परंतु ख्रिस्तच सर्व आणि सर्वात आहेत.

  24. कलस्सैकरांस ३:१२सुमारे इ.स. ६४

    यास्तव, परमेश्वराचे निवडलेले लोक, पवित्र आणि अतिप्रिय या नात्याने करुणा, दया, लीनता, सौम्यता आणि सहनशीलता ही परिधान करा.

  25. कलस्सैकरांस ३:१३सुमारे इ.स. ६४

    एकमेकांचे सहन करा, जर कोणाची एखाद्याविरुद्ध काही तक्रार असेल तर जशी प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.