मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रोमकरांस ११:२२सुमारे इ.स. ६०

    परमेश्वराचा दयाळूपणा आणि कठोरपणा लक्षात घ्या: जे पडले त्यांच्याशी कठोरपणा, पण तुमच्यासाठी दयाळूपणा. पण तुम्ही त्यांच्या दयाळूपणात राहिले पाहिजे; नाही तर तुम्हालाही छाटून टाकण्यात येईल.

  2. रोमकरांस ११:२३सुमारे इ.स. ६०

    आणि जर ते अविश्वासात राहणार नाहीत, तर तेही कलम म्हणून लावले जातील, कारण परमेश्वर त्यांचे कलम पुन्हा लावण्यास समर्थ आहेत.

  3. रोमकरांस ११:२४सुमारे इ.स. ६०

    या सर्वानंतर, जर तुम्हाला मूळच्या रानटी जैतुनाच्या झाडातून कापून टाकले, त्या तुम्हाला सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतूनात कलम लावले, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतूनात किती विशेषकरून कलम म्हणून लावल्या जातील!

  4. रोमकरांस ११:२५सुमारे इ.स. ६०

    प्रिय बंधूंनो व भगिनींनो, या रहस्याविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की तुम्ही बढाई मारू नये: गैरयहूदी लोकांची ठरलेली संख्या पूर्ण विश्वासात येईपर्यंत इस्राएली लोक काही प्रमाणात कठोर झाले आहेत,

  5. रोमकरांस ११:२६सुमारे इ.स. ६०

    आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे: “सीयोनातून तारणारा येईल; व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल.

  6. रोमकरांस ११:२७सुमारे इ.स. ६०

    मी त्यांची पापे हरण करेन. आणि त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे.”

  7. रोमकरांस ११:२८सुमारे इ.स. ६०

    शुभवार्तेच्या दृष्टिकोनातून पाहता, ते तुमचे शत्रू आहेत; निवडीच्या दृष्टिकोनातून पाहता पूर्वजांसाठी ते अजूनही परमेश्वराला प्रिय असेच आहेत.

  8. रोमकरांस ११:२९सुमारे इ.स. ६०

    कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात.

  9. रोमकरांस ११:३०सुमारे इ.स. ६०

    एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे,

  10. रोमकरांस ११:३१सुमारे इ.स. ६०

    आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल.

  11. रोमकरांस ११:३२सुमारे इ.स. ६०

    कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्‍यांसोबत बांधले आहे.

  12. रोमकरांस ११:३३सुमारे इ.स. ६०

    अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे! त्यांचे न्याय गहन आहेत, त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!

  13. रोमकरांस ११:३४सुमारे इ.स. ६०

    “कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल? किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?”

  14. रोमकरांस ११:३५सुमारे इ.स. ६०

    “परमेश्वराला कोणी कधी काही दिले की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?”

  15. रोमकरांस ११:३६सुमारे इ.स. ६०

    कारण त्यांच्यापासून आणि त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी सर्वगोष्टी आहेत. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो! आमेन.

  16. रोमकरांस १२:१सुमारे इ.स. ६०

    यास्तव, बंधू आणि भगिनींनो, मी परमेश्वराच्या दयेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला संतोष होईल असा यज्ञ करावा; हीच तुमची खरी आणि योग्य उपासना ठरेल.

  17. रोमकरांस १२:२सुमारे इ.स. ६०

    या जगाशी समरूप होऊ नका; तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा, ती काय आहे, हे तुम्ही समजून घ्यावे.

  18. रोमकरांस १२:३सुमारे इ.स. ६०

    मला दिलेल्या कृपेने मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो: स्वतःला वाजवीपेक्षा अधिक समजू नका, तर आपणास परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने स्वतःला माना.

  19. रोमकरांस १२:४सुमारे इ.स. ६०

    आपल्या प्रत्येकाला एक शरीर असून अनेक अवयव आहेत, आणि हे सर्व अवयव एकच कार्य करीत नाहीत.

  20. रोमकरांस १२:५सुमारे इ.स. ६०

    आपण ख्रिस्तामध्ये अनेक असलो, तरी एक शरीर आहोत व आपण सर्व एकमेकांचे अवयव आहोत.

  21. रोमकरांस १२:६सुमारे इ.स. ६०

    आपल्या सर्वांना जी कृपा दिली आहे, त्यानुसार आपल्याला वेगवेगळी दाने दिली आहेत. जर तुम्हाला परमेश्वराचे संदेश सांगण्याचे कृपादान असेल, तर तो संदेश आपल्या विश्वासानुसार सांगा.

  22. रोमकरांस १२:७सुमारे इ.स. ६०

    जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा.

  23. रोमकरांस १२:८सुमारे इ.स. ६०

    जर उत्तेजनाचे, तर उत्तेजन द्या; जर देण्याचे असेल, तर औदार्याने द्या; जर व्यवस्थापनाचे असेल, तर आस्थेने करा; जर करुणा करण्याचे, तर उल्हासाने करा.

  24. रोमकरांस १२:९सुमारे इ.स. ६०

    प्रीती निष्कपट असावी. जे वाईट त्याचा द्वेष करा. जे चांगले आहे त्याला चिटकून राहा.

  25. रोमकरांस १२:१०सुमारे इ.स. ६०

    एकमेकांवर बंधुभावाने प्रीती करा आणि आपल्यापेक्षा इतरांचा आदर करा.