- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
circa AD 48–96
Letters to the Churches
Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.
या कालखंडातील वचने
- रोमकरांस १०:१८सुमारे इ.स. ६०
परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले: “पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे, कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.”
- रोमकरांस १०:१९सुमारे इ.स. ६०
मी पुन्हा विचारतो: हे इस्राएली लोकांना कळलेच नाही का? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नाही त्यांच्याद्वारे मी तुम्हाला ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी तुम्हाला क्रोधास आणेन.”
- रोमकरांस १०:२०सुमारे इ.स. ६०
यशायाह धिटाईने म्हणाला, “ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे; ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.”
- रोमकरांस १०:२१सुमारे इ.स. ६०
इस्राएलाबद्दल तो म्हणतो, “आज्ञा न पाळणार्या आणि हट्टी लोकांसाठी मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”
- रोमकरांस ११:१सुमारे इ.स. ६०
मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे.
- रोमकरांस ११:२सुमारे इ.स. ६०
ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली:
- रोमकरांस ११:३सुमारे इ.स. ६०
“प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”
- रोमकरांस ११:४सुमारे इ.स. ६०
यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.”
- रोमकरांस ११:५सुमारे इ.स. ६०
वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत,
- रोमकरांस ११:६सुमारे इ.स. ६०
आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.
- रोमकरांस ११:७सुमारे इ.स. ६०
मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले,
- रोमकरांस ११:८सुमारे इ.स. ६०
जसे लिहिले आहे: “परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे, त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत व कान ऐकू शकत नाहीत, आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”
- रोमकरांस ११:९सुमारे इ.स. ६०
दावीद राजा म्हणाला: “त्यांचा मेज सापळा व पाश, त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो.
- रोमकरांस ११:१०सुमारे इ.स. ६०
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.”
- रोमकरांस ११:११सुमारे इ.स. ६०
मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील.
- रोमकरांस ११:१२सुमारे इ.स. ६०
त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल!
- रोमकरांस ११:१३सुमारे इ.स. ६०
मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो.
- रोमकरांस ११:१४सुमारे इ.स. ६०
या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे.
- रोमकरांस ११:१५सुमारे इ.स. ६०
त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का?
- रोमकरांस ११:१६सुमारे इ.स. ६०
आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार.
- रोमकरांस ११:१७सुमारे इ.स. ६०
जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात.
- रोमकरांस ११:१८सुमारे इ.स. ६०
परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मुळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते.
- रोमकरांस ११:१९सुमारे इ.स. ६०
तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.”
- रोमकरांस ११:२०सुमारे इ.स. ६०
ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा.
- रोमकरांस ११:२१सुमारे इ.स. ६०
कारण जर परमेश्वराने स्वाभाविक फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुम्हालाही राखणार नाही.