मुख्य मजकुरावर जा

circa AD 48–96

Letters to the Churches

Paul and other apostles write to strengthen, correct, and encourage the scattered churches across the Roman world.

2,767 वचने · 21 पुस्तके समाविष्ट

या कालखंडातील वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. रोमकरांस १२:११सुमारे इ.स. ६०

    आस्थेमध्ये कमी पडू नका, तर आपला आध्यात्मिक आवेश कायम राखा व प्रभूची सेवा करा.

  2. रोमकरांस १२:१२सुमारे इ.स. ६०

    आशेमध्ये हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेमध्ये विश्वासू असा.

  3. रोमकरांस १२:१३सुमारे इ.स. ६०

    जे गरजवंत असे प्रभूचे लोक आहेत, त्यांना द्या. आदरातिथ्य करा.

  4. रोमकरांस १२:१४सुमारे इ.स. ६०

    जे तुमचा छळ करतात; त्यांना शाप देऊ नका; उलट आशीर्वाद द्या.

  5. रोमकरांस १२:१५सुमारे इ.स. ६०

    आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा; रडणार्‍यांबरोबर रडा.

  6. रोमकरांस १२:१६सुमारे इ.स. ६०

    एकमेकांशी ऐक्याने राहा. गर्विष्ठ होऊ नका. तर अगदी सामान्य लोकांच्या सहवासात आनंद माना, अहंकार बाळगू नका.

  7. रोमकरांस १२:१७सुमारे इ.स. ६०

    वाईटाने वाईटाची फेड करू नका. सर्वांच्या दृष्टीने जे योग्य आहे ते करा.

  8. रोमकरांस १२:१८सुमारे इ.स. ६०

    साधेल तर, तुम्हाकडून होईल तितके प्रत्येकाशी शांतीने राहा.

  9. रोमकरांस १२:१९सुमारे इ.स. ६०

    माझ्या प्रिय मित्रांनो, सूड उगवू नका. तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, असे लिहिले आहे: “सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन,” असे प्रभू म्हणतात.

  10. रोमकरांस १२:२०सुमारे इ.स. ६०

    त्याउलट: “तुमचा शत्रू भुकेला असेल, तर त्याला खावयास द्या; तो तान्हेला असेल, तर त्याला प्यावयास द्या. असे केल्याने तुम्ही त्याच्या डोक्यावर निखार्‍यांची रास कराल.”

  11. रोमकरांस १२:२१सुमारे इ.स. ६०

    वाईटाने जिंकले जाऊ नका, तर चांगल्याने वाईटाला जिंका.

  12. रोमकरांस १३:१सुमारे इ.स. ६०

    प्रत्येकाने प्रशासकीय अधिकार्‍यांच्या अधीन असावे, कारण परमेश्वराने जो नेमून दिला नाही, असा अधिकारच नाही. जे अधिकारी आहेत, ते स्वतः परमेश्वराने नेमलेले आहेत.

  13. रोमकरांस १३:२सुमारे इ.स. ६०

    यास्तव, जो अधिकारी व्यवस्थेविरुद्ध बंड करतो, तो परमेश्वराने स्थापित केलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करीत असतो आणि जे असे करतात, ते स्वतःवर दंड ओढवून घेतील.

  14. रोमकरांस १३:३सुमारे इ.स. ६०

    जे योग्य गोष्टी करतात, त्यांना राज्यकर्त्यांची भीती वाटत नाही, परंतु जे अयोग्य करतात त्यांनाच त्याची भीती वाटते. जे अधिकारी आहेत त्यांच्या भयापासून मुक्त असावे, अशी तुमची इच्छा आहे काय? तर मग योग्य तेच करा, म्हणजे तो तुमची प्रशंसा करेल.

  15. रोमकरांस १३:४सुमारे इ.स. ६०

    कारण तुमचे हित करण्यासाठी तो परमेश्वराचा नेमलेला सेवक आहे. परंतु तुम्ही अयोग्य केले, तर त्याची भीती बाळगा, कारण तो तलवार व्यर्थ धारण करीत नाही. अयोग्य करणार्‍याला शासन करण्यासाठी तो परमेश्वराचा सेवक, न्यायनीतीचा कारभारी आहे.

  16. रोमकरांस १३:५सुमारे इ.स. ६०

    यास्तव केवळ संभवनीय दंडाकरिताच नव्हे, तर सदसद्विवेकबुद्धीमुळे अधिकार्‍यांच्या अधीन राहणे आवश्यक आहे.

  17. रोमकरांस १३:६सुमारे इ.स. ६०

    याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.

  18. रोमकरांस १३:७सुमारे इ.स. ६०

    प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.

  19. रोमकरांस १३:८सुमारे इ.स. ६०

    इतरांवर प्रीती करण्याशिवाय कोणाचे ॠणी राहू नका, कारण जो कोणी दुसर्‍यांवर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे.

  20. रोमकरांस १३:९सुमारे इ.स. ६०

    या आज्ञा आहेत, “तू व्यभिचार करू नको,” “तू खून करू नको,” “तू चोरी करू नको,” “तू लोभ धरू नको,” आणि इतर दुसर्‍या कोणत्याही आज्ञा असतील तरी, “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा,” या एका आज्ञेत सर्व आज्ञा समाविष्ट आहेत.

  21. रोमकरांस १३:१०सुमारे इ.स. ६०

    प्रीती शेजार्‍याचे काही वाईट करीत नाही, म्हणूनच ती नियमशास्त्राची परिपूर्ती करते.

  22. रोमकरांस १३:११सुमारे इ.स. ६०

    आणखी हे करा, सध्याचा समय ओळखून घ्या: झोपेतून उठण्याची वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या अधिक जवळ आले आहे.

  23. रोमकरांस १३:१२सुमारे इ.स. ६०

    रात्र संपत आली आहे; दिवस लवकरच येऊन ठेपेल, म्हणून अंधाराची कृत्ये सोडून द्या आणि प्रकाशाचे शस्त्रधारण करा.

  24. रोमकरांस १३:१३सुमारे इ.स. ६०

    दिवस आहे तोपर्यंत आपली वागणूक सभ्य असू द्या. दंगलीत, मद्याच्या धुंदीत, लैंगिक अनैतिकतेत, कामासक्तीत, कलहात व मत्सरात आपला वेळ व्यर्थ दवडू नका.

  25. रोमकरांस १३:१४सुमारे इ.स. ६०

    यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.