मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. दावीदाने इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले; सात वर्षे हेब्रोनमध्ये आणि तेहतीस वर्षे यरुशलेममध्ये राज्य केले.

  2. दावीदाने किर्याथ-यआरीमहून परमेश्वराचा कोश आणला, कारण त्याने त्याकरिता यरुशलेम येथे एक मंडप उभारला होता.

  3. नंतर शलोमोन गिबोनाच्या उच्च स्थानावरील सभामंडपावरून निघून यरुशलेमास गेला आणि इस्राएलावर राज्य करू लागला.

  4. शलोमोनजवळ रथ व घोडे यांचा साठा झाला; त्याच्याकडे चौदाशे रथ आणि बारा हजार घोडे, जे त्याने रथांच्या शहरात व काही यरुशलेमात राजाकडे ठेवली होती.

  5. राजाने यरुशलेमात चांदी व सोने धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  6. “म्हणून या कामासाठी सोने, चांदी, कास्य व लोखंड या कामात एक कुशल व हुशार कारागीर, जांभळ्या, किरमिजी व निळ्या रंगांचे कापड विणण्यात आणि उत्तम नक्षीचे कोरीव काम करण्यात तरबेज कारागीर माझ्याकडे पाठवा. माझ्याजवळ यहूदीयात व यरुशलेममध्ये, माझे पिता दावीदाने निवडलेले जे निपुण कारागीर आहेत, त्यांच्याबरोबर तो काम करेल.

  7. आम्ही लबानोन डोंगरावरील सर्व लाकडे कापून ते ओंडके जलमार्गाने याफोला पाठवू, तिथून ते तुम्ही यरुशलेममध्ये घेऊ शकाल.”

  8. मग शलोमोनाने यरुशलेमच्या मोरिया डोंगरावर याहवेहच्या मंदिराचे बांधकाम सुरू केले. याच ठिकाणी याहवेहने शलोमोनचे पिता दावीदाला दर्शन दिले होते. ही आर्णोन यबूसी याच्या खळ्याची जागा होती. मंदिरासाठी दावीदाने ही जागा पुरविली होती.

  9. तेव्हा शलोमोनाने दावीदाचे नगर सीयोन येथून याहवेहच्या कराराचा कोश आणण्यासाठी इस्राएल लोकांच्या पुढाऱ्यांना, सर्व गोत्रप्रमुखांना आणि इस्राएली कुटुंबाच्या सर्व प्रमुखांना यरुशलेमास बोलाविले.

  10. परंतु आता येथे माझे नाव असावे म्हणून मी यरुशलेमला निवडले आहे आणि माझ्या इस्राएल लोकांवर राज्य करण्यासाठी मी दावीदाची निवड केली आहे.’

  11. त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.

  12. जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.

  13. शलोमोनाकडे घोड्यांसाठी आणि रथांसाठी चार हजार तबेले होते आणि बारा हजार घोडे होते, जे त्याने रथाच्या नगरांमध्ये आणि यरुशलेममध्ये राजाने स्वतःजवळ ठेवले होते.

  14. राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.

  15. शलोमोनने यरुशलेमात संपूर्ण इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले.

  16. हदोराम जो मजुरी कामकर्‍यांचा प्रमुख होता त्याला रेहोबोअम राजाने पाठवले, परंतु इस्राएली लोकांनी त्याला धोंडमार करून मारून टाकले. तरीही, रेहोबोअम राजा आपल्या रथात बसून यरुशलेमास निसटून गेला.

  17. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करणारे आणि रेहोबोअमला राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  18. रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली:

  19. लेवीय लोकांनी त्यांची कुरणे आणि मालमत्तासुद्धा सोडली आणि ते यहूदीया आणि यरुशलेमेत आले, कारण यरोबोअम आणि त्याच्या मुलांनी त्यांना याहवेहचे याजक म्हणून नाकारले होते,

  20. इस्रायलच्या प्रत्येक वंशातील ज्या लोकांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहच्या शोधात त्यांचे अंतःकरण लावले होते, ते लेवीय लोकांच्या मागे यरुशलेमकडे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहसाठी यांच्या बलिदानांचे अर्पण करण्यासाठी गेले.

  21. याहवेहबरोबर ते अविश्वासू झाले, म्हणून इजिप्तचा राजा शिशाकने रेहोबोअम राजाच्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षी यरुशलेमवर हल्ला केला.

  22. त्याने यहूदीयाची तटबंदी असलेली शहरे काबीज केली आणि ते यरुशलेमपर्यंत आले.

  23. नंतर शमायाह संदेष्टा रेहोबोअम आणि शिशाकच्या भयाने यरुशलेममध्ये जमलेल्या यहूदीयाच्या पुढाऱ्यांकडे आला आणि त्यांना म्हणाला, “याहवेह असे म्हणतात, तुम्ही मला सोडून दिले आहे; त्यामुळेच मी आता तुम्हाला शिशाककडे सोडून देतो.”

  24. जेव्हा याहवेहनी पाहिले की, त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, तेव्हा याहवेहचे हे शब्द शमायाहकडे आले: “त्यांनी स्वतःला नम्र केले आहे, त्यामुळे मी त्यांचा नाश करणार नाही, परंतु लवकरच त्यांची सुटका करेन. माझा क्रोध शिशाकद्वारे यरुशलेमवर ओतला जाणार नाही.

  25. इजिप्तचा राजा शिशाक याने जेव्हा यरुशलेमवर हल्ला केला, त्याने याहवेहच्या मंदिरातील भांडारे व राजवाड्यातील भांडारे लुटून नेली. शलोमोनने बनविलेल्या सोन्याच्या ढालींसहीत त्याने सर्वकाही घेतले.