- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Jerusalem
हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's
31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा
Jerusalem चा उल्लेख असलेली वचने
त्याने याहवेहचे मंदिर, राजवाडा व यरुशलेमातील सर्व घरे अग्नीने जाळून टाकली. प्रत्येक महत्त्वाची इमारत जाळून भस्म केली.
रक्षक दलाच्या अधिकाराच्या नेतृत्वाखाली खास्द्यांच्या सर्व सैनिकांनी यरुशलेमची तटबंदी पाडून टाकली.
हेब्रोन येथे जन्मलेले दावीदाचे हे सहा पुत्र होते; तिथे त्याने सात वर्षे सहा महिने राज्य केले.
यरुशलेममध्ये त्याला जे पुत्र झाले ते हे: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन हे चार अम्मीएलाची कन्या बथशेबा हिच्यापासून झाले.
योहानान यास अजर्याह झाला. अजर्याह शलोमोनाने यरुशलेमात बांधलेल्या मंदिरात याजक म्हणून सेवा करीत असे.
याहवेहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सराच्या हस्ते यहूदीया व यरुशलेमचा पाडाव केला, तेव्हा यहोसादाक बंदी झाला.
यरुशलेममध्ये शलोमोन याहवेहचे मंदिर बांधेपर्यंत सभामंडपाच्या निवासमंडपासमोर त्यांनी संगीताची सेवा केली. ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत असत.
हे त्यांच्या पिढीतील कुटुंबप्रमुख असून ते यरुशलेम येथे राहात असत.
आणि मिकलोथ जो शिमिआचा पिता. त्यांनीही त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेम येथे वस्ती केली.
यहूदाह, बिन्यामीन, एफ्राईम व मनश्शेह यांच्यापैकी जे यरुशलेममध्ये राहण्यास आले:
हे सर्व लेवी वंशातील कुटुंबप्रमुख असून त्यांची प्रमुख म्हणून वंशावळीत नोंद झाली होती, ते यरुशलेमात राहात.
मिकलोथ जो शिमिआमचा पिता होता. या सर्वांनी त्यांच्या नातलगांजवळ यरुशलेमेत वस्ती केली.
नंतर दावीद व इस्राएलचे सर्व लोक मिळून यरुशलेमला (म्हणजे यबूसला) गेले.
यरुशलेमात दावीदाने अनेक पत्नी व उपपत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.
यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,
नंतर याहवेहचा कोश नव्या तंबूत आणण्याच्या समारंभासाठी दावीदाने इस्राएलाच्या सर्व लोकांना यरुशलेममध्ये एकत्र केले.
हादादेजरचे अधिकारी वाहत असलेल्या सोन्याच्या ढाली दावीदाने घेतल्या आणि त्या यरुशलेमात आणल्या.
जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.
त्याकाळी वसंतॠतूमध्ये, राजे लोक युद्धावर जात असे, योआबाने इस्राएली सैन्याला युद्धासाठी नेले. त्याने अम्मोन्यांची भूमी उद्ध्वस्त केली व राब्बाह शहराला वेढा घातला, परंतु दावीद यरुशलेमात राहिला. योआबने राब्बाहवर हल्ला करून त्याचा नाश केला.
आणि त्या शहरातील रहिवाशांना त्याने बाहेर आणले व त्यांना करवती, लोखंडी कुदळ आणि कुऱ्हाडीच्या साहाय्याने मजुरी करण्यास लावले आणि त्याने त्यांना वीटभट्टीवर काम करावयाला लावले. दावीदाने अम्मोन्यांच्या सर्व नगरांचे असेच केले. नंतर दावीद व त्याचे सर्व सैन्य यरुशलेमास परतले.
तथापि, राजाच्या शब्दापुढे योआब व सेनापतींचे म्हणणे सफल झाले नाही; आणि योआब सर्व इस्राएलभर प्रवास करून यरुशलेमास परतला.
आणि परमेश्वराने आपले दूत पाठवून यरुशलेमचा नाश केला. परंतु दूत जे करणार होता तेव्हा ते पाहून याहवेहला अरिष्टाविषयी वाईट वाटले आणि नाश करणार्या दूताला याहवेहने म्हटले, “पुरे! आपला हात आवर.” त्यावेळी याहवेहचा दूत यबूसी अरवनाहच्या खळ्याजवळ उभा होता.
दावीदाने वर दृष्टी केली आणि याहवेहच्या दूताला स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या मध्ये यरुशलेमकडे तलवार उगारून उभे असलेले पाहिले, तेव्हा दावीद आणि वडीलजनांनी अंगावर गोणपाटाची वस्त्रे घालून दंडवत घातले.
कारण दावीद म्हणाला होता, “इस्राएलाच्या याहवेह परमेश्वराने आम्हाला विश्रांती दिली आहे आणि यरुशलेमात निरंतर निवास करण्यास ते आले आहेत.
दावीदाने इस्राएलच्या सर्व अधिकार्यांना यरुशलेम येथे एकत्र बोलाविले: त्यात गोत्रावरील अधिकारी, राजकीय सेवेतील विभागीय अधिकारी, हजार सैन्याचे आणि शंभर सैन्याचे सैन्याधिकारी, राजा आणि राजपुत्र यांच्या स्थावर मालमत्तेची आणि पशुधनाची देखरेख करणारे अधिकारी, युद्ध सैनिक व सर्व वीर योद्धे यांचा समावेश होता.