मुख्य मजकुरावर जा

Jerusalem

753 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Jerusalem's

31.7700, 35.2300 गूगल नकाशावर पाहा

Jerusalem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजक हिल्कियाह, अहीकाम, अकबोर, शाफान आणि असायाह हे हरहसाचा पुत्र, तिकवाहचा पुत्र शल्लूम जो पोशाख भांडाराचा अधिकारी होता, याची पत्नी हुल्दाह जी संदेष्टी होती, तिच्याकडे बोलण्यास गेले. ती यरुशलेमच्या नव्या पेठेत राहत होती.

  2. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले.

  3. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.

  4. राजाने मुख्य याजक हिल्कियाह, इतर याजक आणि मंदिराचे द्वारपाल यांना सूचना दिली की याहवेहच्या मंदिरातील, बआल व अशेरा, सूर्य, चंद्र आणि तारे यांची उपासना करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या सर्व वस्तू नष्ट कराव्या. राजाने त्या सर्व वस्तू यरुशलेमा बाहेर किद्रोनच्या खोऱ्यातील एक शेतात जाळून टाकल्या आणि त्यांची राख बेथेलास नेली.

  5. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  6. त्याने याहवेहच्या मंदिरातून अमंगळ अशेरामूर्ती काढून टाकली आणि ती यरुशलेमबाहेर किद्रोनच्या खोऱ्याजवळ नेली. तिथे त्याने ती पूर्ण जाळली आणि तिची राख केली आणि ती राख सामान्य लोकांच्या कबरांवर फेकून दिली.

  7. जरी उच्च स्थानांच्या मंदिराचे याजक यरुशलेमातील याहवेहच्या वेदीवर सेवा करीत नसत, तरीही ते इतर याजकांच्या बेखमीर भाकरीचे भोजन करावयास बसत असत.

  8. पुढे शलोमोनाने यरुशलेमच्या पूर्वेकडील आणि विध्वंसगिरीच्या दक्षिणेकडील टेकड्यांवरील मंदिरे काढून टाकली. ही मंदिरे इस्राएलचा राजा शलोमोनाने सीदोन्यांच्या अष्टारोथ, मोआबाच्या कमोश आणि अम्मोन्यांच्या मिलकाम या अमंगळ दैवतांसाठी बांधली होती.

  9. योशीयाहने जे याजक वेदीवर उच्चस्थानी होते त्यांना त्या वेद्यांवरच जिवे मारले. नंतर त्या वेद्यांवर लोकांची हाडे जाळून त्याने त्या भ्रष्ट केल्या. मग तो यरुशलेमात परतला.

  10. हा वल्हांडण सण योशीयाह राजाच्या अठराव्या वर्षी यरुशलेममध्ये याहवेहसाठी साजरा करण्यात आला.

  11. योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले.

  12. म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’ त्यांचा त्याग करेन.”

  13. योशीयाहच्या सेवकांनी त्याचे प्रेत रथात घालून मगिद्दोहून यरुशलेमास आणले आणि त्याला त्याच्या कबरेत पुरण्यात आले. आणि त्या देशातील लोकांनी योशीयाहचा पुत्र यहोआहाजचा अभिषेक करून त्याच्या पित्याच्या जागेवर राजा केले.

  14. वयाच्या तेविसाव्या वर्षी यहोआहाज राजा झाला आणि त्याने तीन महिने यरुशलेमात राज्य केले, त्याच्या आईचे नाव हमूटल असे होते; ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

  15. त्याने यरुशलेमात राज्य करू नये म्हणून फारोह नखोने त्याला हमाथातील रिब्लाह येथे बेड्या घालून ठेवले. फारोह नखोने यहूदीयावर शंभर तालांत चांदी आणि एक तालांत सोने असा कर लादला.

  16. वयाच्या पंचविसाव्या वर्षी यहोयाकीम राजा झाला आणि त्याने यरुशलेममध्ये अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदाह होते; ती रुमाह येथील पदायाहची कन्या होती.

  17. त्यासोबत निर्दोषाचे रक्त सांडणे हे सम्मिलीत होते. त्याने यरुशलेम निर्दोषांच्या रक्ताने भरून टाकले, त्यामुळे याहवेहने त्यांना क्षमा करण्याचे नाकारले.

  18. वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला, आणि त्याने यरुशलेमात तीन महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नेहूष्टा होते. ती एलनाथानची कन्या असून यरुशलेमची होती.

  19. त्याच्याच कारकिर्दीत बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या सैन्याने यरुशलेमावर स्वारी करून शहरास वेढा दिला,

  20. यरुशलेम येथील लोक त्याने बंदिवासात नेले: सर्व अधिकारी आणि लढाऊ पुरुष आणि सर्व कुशल कामगार आणि कारागीर—एकूण दहा हजार. देशात फक्त सर्वात गरीब लोक उरले.

  21. नबुखद्नेस्सर यहोयाखीनला बंदी करून बाबेलला घेऊन गेला. त्याने राजाची आई, त्याच्या पत्नी, त्याचे अधिकारी आणि देशातील प्रतिष्ठित लोकांना देखील यरुशलेमहून बाबेलला नेले.

  22. सिद्कीयाह एकवीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने यरुशलेमात अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमूटल असून ती लिब्नाह येथील यिर्मयाहची कन्या होती.

  23. यरुशलेम व यहूदीयामध्ये हे सर्व याहवेहच्या क्रोधामुळे घडले आणि शेवटी त्यांनी या लोकांना स्वतःच्या समक्षतेतून काढून टाकले. आता सिद्कीयाहने बाबेलच्या राजाविरुद्ध बंड केले.

  24. म्हणून सिद्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर आक्रमण केले व त्याच्या सभोवार वेढा घालून मोर्चे बांधले.

  25. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या एकोणविसाव्या वर्षाच्या पाचव्या महिन्याच्या सातव्या दिवशी बाबेलच्या राजाच्या रक्षक दलाचा अधिकारी नबुजरदान यरुशलेमास आला.