मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. युद्धास गेलेल्या सैनिकांशिवाय इस्राएली लोकांना जो वाटा मोशेने वेगळा केला—

  2. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.

  3. नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले

  4. आणि मोशेला म्हणाले, “तुझ्या सेवकांनी आमच्या हाताखाली असलेल्या सैनिकांची मोजणी केली आणि त्यातून एकही व्यक्ती कमी झालेला नाही.

  5. मोशे व एलअज़ार याजक यांनी ते सोने; घडीव दागिने त्यांच्यापासून स्वीकारले.

  6. मोशे आणि एलअज़ार याजकाने हजारांच्या व शंभरांच्या सरदारांकडून जे सोने स्वीकारले, ते त्यांनी इस्राएली लोकांसाठी याहवेहसमोर स्मारक म्हणून सभामंडपात आणले.

  7. म्हणून गाद गोत्राचे व रऊबेन गोत्राचे लोक मोशे, एलअज़ार याजक व समाजाच्या पुढाऱ्यांकडे आले आणि म्हणाले,

  8. मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?

  9. तेव्हा मोशे त्यांना म्हणाला, “जर तुम्ही हे कराल, म्हणजे जर तुम्ही याहवेहसमोर युद्धासाठी स्वतःला हत्यारबंद कराल

  10. गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी मोशेला म्हटले, “आम्ही तुझे सेवक, आमच्या प्रभूच्या आज्ञेप्रमाणे करू.

  11. नंतर मोशेने एलअज़ार याजकाला व नूनाचा पुत्र यहोशुआ आणि इस्राएली गोत्राच्या कुटुंबप्रमुखांना आज्ञा दिली.

  12. मोशे त्यांना म्हणाला, “जर गाद आणि रऊबेन गोत्राचे लोक, त्यांच्यातील प्रत्येक पुरुष जो युद्धासाठी हत्यारबंद झालेला, याहवेहसमोर तुमच्याबरोबर यार्देन पार करतील, जेव्हा तुमच्यापुढे देश ताब्यात घेतला जाईल, तेव्हा तुम्ही गिलआदाचा प्रांत त्यांना त्यांचे वतन म्हणून द्यावा.

  13. तेव्हा मोशेने गाद गोत्राचे लोक, रऊबेन गोत्राचे लोक आणि योसेफाचा पुत्र मनश्शेहचे अर्ध्या गोत्रांना अमोर्‍यांचा राजा सीहोनाचे राज्य आणि बाशानचा राजा ओगच्या राज्याचा सर्व प्रदेश, शहरे व चहूकडील नगरे दिली.

  14. म्हणून मोशेने मनश्शेहचे वंशज माखीरी लोकांना गिलआद प्रांत देऊ केला आणि ते तिथे स्थायिक झाले.

  15. मोशे आणि अहरोन यांच्या नेतृत्वाखाली इस्राएली लोक आपल्या तुकडीनुसार इजिप्तमधून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या प्रवासाचे टप्पे असे होते.

  16. याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता:

  17. मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  18. याहवेह मोशेला म्हणाले,

  19. मोशेने इस्राएली लोकांना ही आज्ञा दिली: “हा देश तुम्ही चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटप करावा. याहवेहने आज्ञा केली आहे की हा देश साडेनऊ गोत्रांना दिला जावा,

  20. याहवेह मोशेला म्हणाले,

  21. यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले,

  22. नंतर याहवेह मोशेला म्हणाले:

  23. योसेफाच्या वंशाच्या कुळातील, मनश्शेहचा पुत्र माखीरचा पुत्र गिलआदच्या कुटुंबाचे कुलप्रमुख मोशे व पुढारी, म्हणजे इस्राएली कुटुंबाच्या पुढाऱ्यांपुढे येऊन बोलले.

  24. नंतर याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “योसेफाच्या गोत्राचे वंशज जे म्हणत आहेत ते बरोबर आहे.

  25. याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेनुसार सलाफहादच्या कन्यांनी केले.