मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”

  2. मोशेने कादेशमधून एदोमाच्या राजाकडे निरोप्यांच्या द्वारे हा संदेश पाठविला: “तुझा भाऊ इस्राएल असे म्हणतो: आमच्यावर आलेल्या सर्व कष्टांविषयी तुला ठाऊक आहे.

  3. एदोमच्या सीमेवर, होर पर्वतावर याहवेह मोशे व अहरोनला म्हणाले,

  4. जसे याहवेहने आज्ञापिले त्यानुसार मोशेने केले: सर्व समुदायादेखत ते होर पर्वतावर गेले.

  5. मोशेने अहरोनाची वस्त्रे उतरविली आणि एलअज़ारावर चढविली आणि अहरोन त्या डोंगराच्या शिखरावर मरण पावला. नंतर मोशे आणि एलअज़ार डोंगरावरून खाली आले,

  6. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”

  7. लोक मोशेकडे आले व म्हणाले, “याहवेहविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलून आम्ही पाप केले आहे. याहवेहने हे साप आमच्यापासून दूर घालवून द्यावे म्हणून प्रार्थना कर.” तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली.

  8. तेव्हा याहवेहने मोशेला म्हटले, “सापाची एक प्रतिमा तयार कर आणि ती एका खांबावर टांग; ज्याला साप चावेल त्या व्यक्तीने खांबावर टांगलेल्या सापाकडे पाहिल्यास तो जगेल.”

  9. तेव्हा मोशेने कास्याचा साप तयार केला व तो खांबावर टांगला, तेव्हा ज्या कोणाला साप चावला व त्यांनी त्या कास्याच्या सापाकडे पाहिले म्हणजे ते जगत असत.

  10. तिथून ते बैर म्हणजे विहीर या ठिकाणाकडे निघाले. ज्या ठिकाणी याहवेह मोशेला म्हणाले होते, “लोकांना बोलव म्हणजे मी त्यांना पाणी देईन.”

  11. मोशेने याजेर नगराकडे हेर पाठवल्यानंतर, इस्राएली लोकांनी तेथील आसपासच्या वसाहती हस्तगत केल्या आणि तिथे असलेल्या अमोरी लोकांना बाहेर घालवून दिले.

  12. याहवेहने मोशेला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, कारण मी त्याला व त्याच्या सर्व सैन्याला तुझ्या हाती दिले आहे. अमोर्‍यांचा राजा सीहोन जो हेशबोनात राज्य करीत होता, याचे तू जसे केले तसेच याला कर.”

  13. याहवेहने मोशेला म्हटले, “या लोकांच्या सर्व पुढार्‍यांना घे, त्यांना फासावर टांग व त्यांना दिवसाच्या प्रकाशात याहवेहसमोर उघडे कर, म्हणजे इस्राएलवर पेटलेला याहवेहचा क्रोध शांत होईल.”

  14. तेव्हा मोशे इस्राएलच्या न्यायाधीशांनी म्हणाला, “तुम्ही स्वतःला बआल-पौराशी जोडले आहे, तुम्हा प्रत्येकाला जिवे मारावे.”

  15. त्यावेळी ते सभामंडपाच्या दारात रडत असताना, एका इस्राएली पुरुषाने मोशे व संपूर्ण इस्राएली मंडळीसमोर एक मिद्यानी स्त्री आणली.

  16. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  17. याहवेह मोशेला म्हणाले,

  18. पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले,

  19. म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले,

  20. “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.”

  21. आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते.

  22. याहवेहने मोशेला म्हटले,

  23. अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला.

  24. मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली.

  25. सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता.