मुख्य मजकुरावर जा

Moses

774 वचने · 7 कुटुंब सदस्य

Moses चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. परंतु परमेश्वराने आजपर्यंत मला साहाय्य केले; म्हणूनच प्रत्येक लहानथोरास या गोष्टींची साक्ष सांगण्यास मी येथे उभा आहे व ज्यागोष्टी घडतील असे संदेष्टे व मोशे यांनी सांगितले होते, त्यापलीकडे मी दुसरे काहीही सांगितले नाही.

  2. तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला.

  3. आदामापासून मोशेपर्यंत मृत्यूचे राज्य होते, कारण आदामासारखा आज्ञेचा भंग त्यांनी स्वतः कधीही केलेला नव्हता. आदाम, जो येणार होता त्याचे प्रतिरूप होता.

  4. कारण ते मोशेला म्हणाले: “ज्याच्यावर मला कृपा करावयाची, त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची, त्याच्यावर मी दया करेन.”

  5. नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”

  6. मी पुन्हा विचारतो: हे इस्राएली लोकांना कळलेच नाही का? प्रथम मोशे म्हणतो, “जे राष्ट्र नाही त्यांच्याद्वारे मी तुम्हाला ईर्षेस आणेन; ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी तुम्हाला क्रोधास आणेन.”

  7. कारण मोशेने नियमशास्त्रात लिहिले आहे: “बैल धान्याची मळणी करीत असताना त्याच्या तोंडाला मुसके बांधू नको.” आता परमेश्वराला बैलाची काळजी आहे एवढाच त्याचा अर्थ आहे काय?

  8. मेघात आणि समुद्रात त्यांचा व मोशेमध्ये बाप्तिस्मा झाला.

  9. आता जे अक्षर दगडावर कोरलेले असून ज्याचा परिणाम मरण होता, ती सेवा एवढी गौरवी होती, की जरी कमी होणार्‍या तेजामुळे इस्राएली लोकांना मोशेच्या चेहर्‍याकडे स्थिर पाहत राहणे अशक्य झाले होते, पण हळूहळू ते तेज कमी होत गेले.

  10. आम्ही मोशेसारखे नाही, ज्याने लोप पावत चाललेले वैभव इस्राएली लोकांनी पाहू नये म्हणून आपल्या मुखावर आच्छादन घातले.

  11. आज या दिवसापर्यंत जेव्हा मोशेचा ग्रंथ वाचला जातो, तेव्हा त्यांच्या हृदयावर आच्छादन राहते.

  12. यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.

  13. कारण जसा मोशे परमेश्वराच्या सर्व घराण्यात विश्वासू होता, तसेच येशूही ज्यांनी त्यांना नेमले त्यांच्याशी विश्वासू होते.

  14. कारण ज्याप्रमाणे एखाद्या घर बांधणार्‍याला, घराला लाभणार्‍या मानापेक्षा अधिक मान प्राप्त होतो, त्याचप्रमाणे येशू हे मोशेच्या सन्मानापेक्षा अधिक सन्मानास पात्र ठरले आहेत.

  15. जे काही पुढे भविष्यात परमेश्वराद्वारे बोलले जाणार होते, त्याची साक्ष देण्याकरिता “मोशे हा परमेश्वराच्या सर्व घराण्यातील एक विश्वासू सेवक होता.”

  16. ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का?

  17. हे स्पष्ट आहे की आपले प्रभू यहूदाहच्या वंशातून आले आणि याजकांबद्दल त्या वंशाविषयी मोशे काही म्हणाला नाही.

  18. जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”

  19. जेव्हा मोशेने सर्व लोकांना नियम जाहीर केले, तेव्हा त्याने पाण्याबरोबर वासरांचे रक्त घेतले आणि किरमिजी लोकर व एजोबाच्या फांद्या त्यात बुडवून ग्रंथावर आणि सर्व लोकांवर ते शिंपडले.

  20. विश्वासाद्वारे मोशेच्या जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनीही त्याला तीन महिने लपवून ठेवले, कारण आपला पुत्र असामान्य आहे, हे पाहिल्यावर त्यांना राजाज्ञेचे भय वाटले नाही.

  21. मोशे मोठा झाल्यावर त्यानेही विश्वासाद्वारे फारोह राजाचा नातू म्हणवून घेण्यास नाकारले,

  22. स्वतः मोशे देखील ते दृश्य पाहून इतका घाबरला की तो म्हणाला, “मी भीतीने थरथर कापत आहे.”

  23. परंतु प्रमुख देवदूत मिखाएल, जेव्हा मोशेच्या शरीरावरून सैतानाशी वादविवाद करीत असताना स्वतः त्याचा निंदासहित न्याय करण्याचे धैर्य त्याने केले नाही परंतु एवढेच म्हणाला, “प्रभू तुला धमकावो!”

  24. ते परमेश्वराचा सेवक मोशेचे आणि कोकर्‍याचे गीत गात होते: “हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा! तुमची कृत्ये थोर आणि अलौकिक आहेत! हे राष्ट्रांच्या राजा, तुमचे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत!