- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
Moses
Moses चा उल्लेख असलेली वचने
जेव्हा मोशेने गीताचे हे सर्व शब्द सर्व इस्राएलींसमोर बोलून संपविले,
त्याच दिवशी याहवेह मोशेला म्हणाले,
परमेश्वराचा मनुष्य मोशेने आपल्या मरणापूर्वी इस्राएली लोकांना आशीर्वाद जाहीर केले.
मोशेने आम्हाला जे नियम दिले, ते नियम याकोबाच्या सभेचे अमोल वतन आहे.
नंतर मोशे मोआबाच्या सपाट मैदानातून यरीहोच्या समोरील नबो पर्वताच्या पिसगा नामक शिखरावर चढून गेला. तिथून सभोवार—गिलआदापासून दानपर्यंतचा—सर्व प्रदेश याहवेहने त्याला दाखविला,
आणि याहवेहने सांगितल्याप्रमाणे, याहवेहचा सेवक मोशे मोआब देशात मरण पावला.
मृत्युसमयी मोशे एकशेवीस वर्षांचा होता तरीही त्याची दृष्टी कमी झाली नव्हती, की त्याची शक्ती कमी झाली नव्हती.
इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला.
नूनाचा पुत्र यहोशुआ हा ज्ञानाच्या आत्म्याने परिपूर्ण होता, कारण मोशेने त्याजवर आपले हात ठेवले होते. म्हणून इस्राएली लोकांनी त्याचे ऐकले आणि याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञा ते पाळीत असत.
मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत,
मोशेने इस्राएलसमोर जे महान सामर्थ्यशाली किंवा भयावह चमत्कार केले ते चमत्कार इतर कोणीही केले नाही.
याहवेहचा सेवक मोशेच्या मृत्यूनंतर, मोशेचा मदतनीस, नूनाचा पुत्र यहोशुआला याहवेह म्हणाले:
“माझा सेवक मोशे मरण पावला आहे, तर आता तू आणि हे सर्व लोक यार्देन नदी ओलांडून त्या देशात जाण्यास तयार व्हा, जो मी त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना देत आहे.
मी मोशेला दिलेल्या वचनानुसार जिथे तुम्ही तुमचे पाऊल ठेवाल ते प्रत्येक ठिकाण मी तुम्हाला देईन.
तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस तुम्हाला कोणीही विरोध करू शकणार नाही, कारण मी जसा मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबरही असेन; मी तुला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही.
“मात्र तू खंबीर हो आणि फार धैर्यवान हो. माझा सेवक मोशेने तुम्हाला दिलेले सर्व नियम पाळण्याची काळजी घे; त्यापासून उजवीकडे किंवा डावीकडे वळू नको, म्हणजे जिथे तू जाशील तिथे तू यशस्वी होशील.
“याहवेहचा सेवक मोशेने दिलेल्या आज्ञेची आठवण ठेवा, नंतर तो म्हणाला, ‘तुम्हाला विश्रांती मिळावी म्हणून याहवेह तुमचे परमेश्वर हा प्रदेश तुम्हाला देतील.’
तुमच्या स्त्रिया, तुमची लेकरे आणि गुरे मोशेने तुम्हाला यार्देनेच्या पूर्वेकडे दिलेल्या प्रदेशात राहू शकतील, परंतु युद्धासाठी तयार असलेले तुमचे सर्व योद्धे इस्राएली लोकांच्या पुढे नदी पार करून जातील. तुम्ही त्यांना मदत करावी.
याहवेहने जशी तुम्हाला विश्रांती दिली आहे तशीच त्यांनाही देईपर्यंत आणि याहवेह तुमचे परमेश्वर त्यांना जो प्रदेश देत आहेत, त्याचा ताबा घेईपर्यंत तुम्ही त्यांची मदत करावी. त्यानंतर तुम्ही परत जाऊ शकता आणि जो यार्देनेच्या पूर्वेकडील प्रदेश याहवेहचा सेवक मोशेने तुम्हास दिला आहे, त्या स्वतःच्या प्रदेशात तुम्ही वास्तव्य करू शकता.”
जसे आम्ही मोशेच्या आज्ञांचे पूर्णपणे पालन केले, तसेच आम्ही तुझ्या आज्ञांचे पालन करू. फक्त एवढेच की तुझे परमेश्वर याहवेह तुझ्याबरोबर असावे जसे ते मोशेबरोबर होते.
मग याहवेह यहोशुआस म्हणाले, “आज मी तुला मोठा सन्मान बहाल करणार आहे, म्हणजे सर्व इस्राएली लोकांना कळून येईल की, मी जसा मोशेबरोबर होतो, अगदी तसाच तुझ्याबरोबर देखील आहे.
मोशेने यहोशुआला सुचविल्याप्रमाणे, याहवेहने यहोशुआला ज्या आज्ञा होत्या, त्या पूर्ण होईपर्यंत कोश वाहणारे याजक यार्देन नदीच्या मध्यभागी उभे राहिले, तेव्हा लोकांनी घाईने नदी ओलांडली.
मग मोशेने त्यांना सांगितल्याप्रमाणे रऊबेन, गाद आणि मनश्शेहचे अर्धे गोत्र इस्राएली लोकांपुढे युद्धासाठी सुसज्ज होऊन पुढे निघाले.
त्या दिवशी याहवेहने यहोशुआला सर्व इस्राएली लोकांच्या दृष्टीत सन्मानित केले आणि जसे त्यांनी मोशेच्या संपूर्ण आयुष्यभर त्याचा आदर केला, तसाच त्यांनी यहोशुआचाही केला.
जी आज्ञा याहवेहचा सेवक मोशेने इस्राएली लोकांना दिली होती. मोशेच्या नियमशास्त्रात जसे लिहिले होते त्याप्रमाणे ज्या दगडांवर कोणतेही लोखंडी अवजार वापरलेले नाही, अशा न घडविलेल्या दगडांची त्याने वेदी बांधली. त्या वेदीवर त्यांनी याहवेहसाठी होमार्पणे व शांत्यर्पणे केली.