मुख्य मजकुरावर जा

Judah

244 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Judas, Juda

Judah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योआबाने राजाला योद्धे पुरुषांच्या संख्येचा अहवाल दिला: इस्राएलमध्ये धनुर्धारी आठ लाख व यहूदीयामध्ये पाच लाख पुरुष होते.

  2. अदोनियाहने एन-रोगेलजवळ जोहेलेथच्या दगडावर मेंढरे, गुरे आणि पुष्ट वासरे यांचा यज्ञ केला. त्याने आपले सर्व भाऊ, राजपुत्र आणि यहूदीयाच्या सर्व राजकीय अधिकार्‍यांना आमंत्रित केले,

  3. नंतर तुम्ही त्याच्यासोबत वर जावे आणि त्याने येऊन माझ्या राजासनावर बसून माझ्या जागेवर राज्य करावे. मी त्याला इस्राएलचा आणि यहूदीयाचा राज्यकर्ता नेमले आहे.”

  4. त्याने केलेल्या रक्तपाताबद्दल याहवेह त्याची परतफेड करतील, कारण माझे पिता दावीदच्या नकळत त्याने दोन माणसांवर हल्ला केला आणि त्यांना तलवारीने ठार केले. ते दोघेजण; इस्राएलच्या सैन्याचा सेनापती नेरचा पुत्र अबनेर आणि यहूदीयाच्या सैन्याचा सेनापती येथेरचा पुत्र अमासा; हे योआबापेक्षा अधिक चांगले आणि सरळ होते.

  5. इस्राएली आणि यहूदीयाच्या लोकांची संख्या समुद्र किनार्‍यावरील वाळू इतकी अगणित होती. ते खाऊन पिऊन मजेत होते.

  6. शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.

  7. परंतु तरीही जे इस्राएली लोक यहूदीयाच्या नगरांमध्ये राहत होते त्यांच्यावर रेहोबोअमने राज्य केले.

  8. यरोबोअम इजिप्त देशातून परत आला आहे हे सर्व इस्राएल लोकांनी ऐकले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्या मंडळीत बोलावून घेतले व त्याला सर्व इस्राएलवर राजा केले. केवळ यहूदाहचे गोत्र दावीदाच्या घराण्याशी विश्वासू राहिले.

  9. जेव्हा रेहोबोअम यरुशलेमास आला, तेव्हा त्याने यहूदाह व बिन्यामीनच्या गोत्रातील सर्व लोकांना जमा केले; इस्राएलशी युद्ध करून शलोमोनचा पुत्र रेहोबोअमसाठी राज्य पुन्हा मिळवून देतील असे एक लाख ऐंशी हजार सक्षम तरुण पुरुष होते.

  10. “शलोमोनचा पुत्र यहूदीयाचा राजा रेहोबोअम, यहूदाह आणि बिन्यामीन व बाकीच्या लोकांना सांग,

  11. जर या लोकांनी यरुशलेमात जाऊन याहवेहच्या मंदिरात यज्ञार्पणे केली व त्यांचा स्वामी यहूदीयाचा राजा रेहोबोअम याच्याप्रीत्यर्थ आपली निष्ठा पुन्हा दाखविली, तर ते मला जिवे मारतील व त्यांचा राजा रेहोबोअम याच्याकडे वळतील.”

  12. आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जसा यहूदीयामध्ये पाळला जात असे तसेच त्याने एका सणाची स्थापना केली. आणि वेदीवर यज्ञार्पणे केली. बेथेलमध्ये बनविलेल्या वासरांसाठी अर्पणे त्याने केली. बेथेलमध्ये यरोबोअमने बनविलेल्या पूजास्थानांवर सुद्धा त्याने याजक नेमले.

  13. याहवेहच्या वचनानुसार परमेश्वराचा एक मनुष्य यहूदीयावरून बेथेलास आला, जेव्हा यरोबोअम अर्पण करण्यासाठी वेदीजवळ उभा होता.

  14. त्यांच्या पित्याने त्यांना विचारले, “तो कोणत्या मार्गाने गेला?” आणि परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आलेला होता तो ज्या मार्गाने गेला होता तो त्यांनी त्याला सांगितला.

  15. आणि परमेश्वराच्या मनुष्याचा पाठलाग करीत गेला. तो त्याला एका एलाच्या वृक्षाखाली बसलेला दिसला. त्याने त्याला विचारले, “परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला तो तूच आहेस काय?” तो म्हणाला, “होय, तो मीच आहे.”

  16. तो परमेश्वराचा मनुष्य जो यहूदीयातून आला होता त्याला ओरडून म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: ‘तू याहवेहच्या वचनाचा अवमान केला आहेस आणि याहवेहने तुला दिलेल्या आज्ञेचे पालन तू केले नाही.

  17. त्यावेळी शलोमोनचा पुत्र रेहोबोअम हा यहूदीयाचा राजा होता. तो राजा झाला त्यावेळी तो एकेचाळीस वर्षांचा होता आणि आपले नाव द्यावे म्हणून याहवेहने सर्व इस्राएलच्या गोत्रांतून ज्या शहराची निवड केली त्या यरुशलेमात त्याने राज्य केले. त्याच्या आईचे नाव नामाह होते; ती अम्मोनी होती.

  18. याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते यहूदीयाच्या लोकांनी केले. आणि जी पापे त्यांनी केली त्यामुळे त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांपेक्षा त्यांनी याहवेहला अधिक क्रोधित केले.

  19. रेहोबोअमच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने केलेली कृत्ये यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहून ठेवल्या आहेत की नाही?

  20. नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी अबीयाह यहूदीयाचा राजा झाला,

  21. अबीयाहच्या राज्याच्या इतर घटना आणि त्याने जे काही केले ते सर्व यहूदीया देशाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? अबीयाह व यरोबोअम यांच्यातील युद्ध सुरूच होते.

  22. इस्राएलचा राजा यरोबोअमच्या कारकिर्दीच्या विसाव्या वर्षी आसा यहूदीयाचा राजा झाला,

  23. यहूदीयाचा राजा आसा याच्या सीमेतून कोणी बाहेर जाऊ नये किंवा आत येऊ नये म्हणून इस्राएलचा राजा बाशाने यहूदीयावर स्वारी केली आणि रामाह शहराची तटे बांधली.

  24. मग आसा राजाने सर्व यहूदीयात एक हुकूम जाहीर केला; त्यातून कोणीही वगळले नाही; आणि जे दगड आणि लाकूड बाशा वापरत होता, ते त्यांनी रामाह येथून नेऊन त्यांच्यापासून त्याने बिन्यामीनातील गेबा आणि मिस्पाह हे बांधले.

  25. आसाच्या कारकिर्दीच्या इतर घटना, त्याचे सर्व पराक्रम, जे सर्वकाही त्याने केले व जी शहरे त्याने बांधली, ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या नाहीत काय? पण त्याच्या वृद्धापकाळात तो पायाच्या आजाराने त्रस्त झाला.