मुख्य मजकुरावर जा

Judah

244 वचने · 20 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Judas, Juda

Judah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “यहूदीयाचा राजा मनश्शेह यानेही अमंगळ कृत्ये केली आहेत. एवढेच नाही, त्याने त्याच्या आधीच्या अमोरी लोकांपेक्षाही अधिक दुष्ट कर्मे केली आहेत आणि त्याने यहूदी लोकांना आपल्या मूर्तींसाठी तेच पाप करण्यास लावले.

  2. म्हणून याहवेह इस्राएलांचे परमेश्वर म्हणतात: पाहा, मी यरुशलेम व यहूदीया यांच्यावर असे भयंकर संकट आणेन की, त्याबद्दल जे लोक ऐकतील, त्यांचे कान भणभणतील.

  3. शिवाय, मनश्शेहने इतके निष्पाप रक्त सांडले की यरुशलेम पूर्ण रक्ताने भरून गेले—त्याने यहूदाहला जे पाप करावयाला लावले होते त्या शिवाय त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.

  4. मनश्शेहच्या कारकिर्दीतील इतर घटना आणि त्याने जे सर्व केले आणि त्याने जे पाप केले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिल्या नाहीत काय?

  5. आमोनाच्या कारकिर्दीतील इतर घटना, आणि त्याने जे सर्व केले, हे यहूदीयाच्या राजांचा इतिहासग्रंथात नमूद केलेले नाही काय?

  6. “जा आणि माझ्यासाठी आणि लोकांसाठी आणि सर्व यहूदीयासाठी, त्यांच्याबद्दल या पुस्तकात लिहिलेले जे काही सापडले आहे, त्याबद्दल याहवेहकडे चौकशी करा. याहवेहचा फार मोठा क्रोध आपल्यावर पेटला आहे, कारण आपल्या पूर्वजांनी याहवेहच्या वचनाचे पालन केले नाही; या पुस्तकात जे सर्वकाही लिहिलेले आहे त्याप्रमाणे ते वागले नाहीत.”

  7. ‘याहवेह असे म्हणतात: यहूदीयाच्या राजाने वाचलेल्या ग्रंथात जे सर्व लिहिले आहे त्यानुसार मी या ठिकाणावर आणि येथील लोकांवर संकट आणेन.

  8. ज्याने तुम्हाला याहवेहची चौकशी करण्यासाठी पाठविले आहे त्या यहूदीयाच्या राजाला हे जाऊन सांगा, ‘जे वचन तुम्ही ऐकले त्याबद्दल याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:

  9. नंतर राजाने यहूदीया आणि यरुशलेममधील सर्व वडीलजनांना एकत्र बोलाविले.

  10. यहूदीयाचे लोक, यरुशलेम येथील रहिवासी, याजक आणि संदेष्टे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांबरोबर राजा याहवेहच्या मंदिरात गेला. याहवेहच्या मंदिरात सापडलेल्या कराराच्या ग्रंथातील सर्व शब्द त्याने त्यांना ऐकू जातील असे वाचून दाखविले.

  11. यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी नेमलेल्या मूर्तिपूजक याजकांना त्याने ठार मारले. कारण त्यांनी यहूदीया आणि यरुशलेमच्या नगरातील टेकड्यांवरील मंदिरात धूप जाळलेला होता. त्यांनी बआल, सूर्य, चंद्र, तारे व ग्रह यांनाही धूप जाळला होता.

  12. यहूदीयाच्या इतर शहरांमध्ये राहणार्‍या याजकांना योशीयाह राजाने यरुशलेमास परत आणले. पर्वतांवरील सर्व मंदिरे तसेच गेबापासून बेअर-शेबा पर्यंतची सर्व मंदिरे त्याने पाडून भ्रष्ट केली. यरुशलेम नगरवेशीजवळील डाव्या बाजूला नगराध्यक्ष यहोशुआच्या वाड्याच्या प्रवेशद्वाराशी असलेली मंदिरेही त्याने नष्ट केली.

  13. त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ यहूदीयाच्या पूर्वीच्या राजांनी सूर्याला समर्पित केलेल्या घोड्यांचे पुतळे पाडून टाकले. ते नाथान-मेलेक या खोजाच्या कोठडीजवळ होते. योशीयाहने सूर्याला समर्पित रथही अग्नीने जाळून टाकले.

  14. यहूदीयाच्या राजांनी राजवाड्यात आहाज राजाच्या खोलीच्या छतावर उभारलेल्या वेद्याही त्याने पाडून टाकल्या. याहवेहच्या मंदिराच्या दोन्ही अंगणात मनश्शेहने बांधलेल्या वेद्या सुद्धा त्याने नष्ट केल्या. त्यांचा चुराडा करून त्यांची धूळ त्याने किद्रोनच्या खोऱ्यात फेकून दिली.

  15. राजाने विचारले, “पलीकडे जे कबरेचे स्मारक दिसते ते कोणाचे आहे?” तेव्हा शहरातील लोकांनी त्याला सांगितले, “हे परमेश्वराच्या संदेष्ट्याचे स्मारक आहे, जो यहूदीयातून आला होता आणि बेथेलच्या वेदीची नुकतीच जी पाडापाड केली, त्यासंबंधीचे भाकीत ज्या संदेष्ट्याने केले होते, त्याची ती कबर आहे.”

  16. इस्राएलच्या शास्त्यांच्या काळापासून आणि इस्राएलचे राजे आणि यहूदीयातील राजांच्या दिवसात सुद्धा असा वल्हांडण सण साजरा केला नव्हता.

  17. योशीयाहने यहूदीया व यरुशलेममधील प्रेत साधक, भूतविद्या करणारे, कुलदैवते व मूर्ती, आणि सर्वप्रकारच्या घृणास्पद वस्तू काढून टाकल्या. हिल्कियाह याजकाला याहवेहच्या मंदिरात आढळलेल्या नियमांच्या पुस्तकात जे लिहिले होते ते पूर्ण करण्यासाठी त्याने असे केले.

  18. यावेळी बाबेलच्या राजाच्या सैन्याने यरुशलेमला वेढा घातलेला होता, व यिर्मयाह संदेष्टा यहूदीयाच्या राजवाड्याच्या तळघरातील कोठडीत कैदेत होता.

  19. तुमच्या यहूदीयाच्या राजाच्या राजवाड्यात उरलेल्या सर्व स्त्रियांना बाहेर आणून बाबिलोनच्या सरदारांच्या स्वाधीन केले जाईल, तेव्हा त्या स्त्रिया तुम्हाला म्हणतील: “ ‘त्यांनी तुला चुकीच्या मार्गावर नेले व तुझ्यावर मात केली— ते तुझे विश्वसनीय मित्र. तुझी पावले आता गाळात रुतली आहेत; त्यांनी टाकून दिले आहे.’