मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी पित्यामध्ये आहे व पिता मजमध्ये आहे, यावर तुझा विश्वास नाही काय? जी वचने मी तुला सांगतो, ते मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने सांगत नाही. खरेतर, माझ्यामध्ये वसणारा पिताच हे कार्य करीत आहे.

  2. फक्त विश्वास ठेवा की मी पित्यामध्ये आहे आणि पिता मजमध्ये आहे; अथवा प्रत्यक्ष कार्याच्या पुराव्यावर तरी विश्वास ठेवा.

  3. मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी कृत्ये करतो ती मजवर विश्वास ठेवणाराही करेल, किंबहुना त्यापेक्षाही मोठी करेल, कारण मी पित्याकडे जात आहे.

  4. आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.

  5. तुम्ही माझ्या नावाने मजजवळ जे काहीही मागाल, ते मी तुम्हासाठी करेन.

  6. “जर तुमची मजवर प्रीती असेल, तर माझ्या आज्ञा पाळा.

  7. आणि मी पित्याजवळ मागेन, ते तुम्हाला मदत करण्यासाठी दुसरा कैवारी देतील, जो तुम्हाबरोबर सर्वकाळ राहील—

  8. सत्याचा आत्मा. त्याला जग स्वीकारणार नाही, कारण जग त्याला पाहत नाही व ओळखत नाही. परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तुम्हामध्ये राहील.

  9. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही; मी तुमच्याकडे येईन.

  10. आता थोड्याच वेळात, जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.

  11. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी पित्यामध्ये आहे व तुम्ही मजमध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे.

  12. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच मजवर प्रीती करतो. जो मजवर प्रीती करतो त्यावर माझे पिताही प्रीती करतील आणि मी देखील त्याजवर प्रीती करेन व स्वतः त्यांना प्रकट होईन.”

  13. नंतर यहूदाह (यहूदाह इस्कर्योत नव्हे) म्हणाला, “पण प्रभूजी, आपण फक्त आम्हाला प्रकट होणार पण जगाला का प्रकट होणार नाही?”

  14. येशूंनी उत्तर दिले, “कारण जो कोणी मजवर प्रीती करतो तो माझे शिक्षण आचरणात आणेल. माझे पितादेखील त्यांच्यावर प्रीती करतील आणि आम्ही त्यांच्याकडे येऊ व त्यांच्याबरोबर वस्ती करू.

  15. जो कोणी माझ्यावर प्रीती करीत नाही, तो माझे शिक्षण पाळीत नाही. माझी जी वचने तुम्ही ऐकत आहात ती माझी स्वतःची नाहीत; तर ज्याने मला पाठविले त्या पित्याची आहेत.

  16. “मी तुमच्याबरोबर असताना, हे सर्व तुम्हाला सांगितले आहे.

  17. परंतु तो कैवारी, पवित्र आत्मा, ज्याला पिता माझ्या नावाने पाठवतील, तो तुम्हाला सर्वकाही शिकवेल आणि मी सांगितलेल्या सर्व गोष्टींची आठवण करून देईल.

  18. शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.

  19. “मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे की, ‘मी जात आहे, परंतु मी तुम्हाकडे परत येईन.’ जर तुमची मजवर प्रीती असती, तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझे पिता मजपेक्षा थोर आहेत.

  20. आता हे घडून येण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगितले आहे, यासाठी की ते घडून आले म्हणजे, तुम्ही विश्वास ठेवावा.

  21. आता मी तुम्हाला यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण या जगाचा अधिपती येत आहे. त्याचा मजवर काहीही अधिकार नाही,

  22. परंतु तो यासाठी आला की जगाने ओळखावे की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसेच मी तंतोतंत करतो. “आता उठा; आपण येथून जाऊ.”

  23. “मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत.

  24. माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्‍या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी करतात.

  25. जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात.