Jesus
हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ
Jesus चा उल्लेख असलेली वचने
मी या जगात प्रकाश म्हणून आलो आहे, यासाठी की जे मजवर विश्वास ठेवतात त्यांनी अंधारात राहू नये.
“जर कोणी माझी वचने ऐकून ती पाळीत नाही, तर मी त्या व्यक्तीचा न्याय करीत नाही. कारण मी या जगाचा न्याय करण्यासाठी आलो नसून, जगाचे तारण करण्यासाठी आलो आहे.
जे मला नाकारतात व माझ्या वचनांचा स्वीकार करीत नाही; त्यांचा न्याय करणारे एकच आहे; जी वचने मी बोललो होतो तीच त्यांचा न्याय करतील.
कारण मी माझे स्वतःचे बोलत नाही, ज्या पित्याने मला पाठविले, त्यांनी मी काय सांगावे व काय बोलावे याची मला आज्ञा दिली आहे.
त्यांच्या आज्ञा सार्वकालिक जीवनाकडे नेणार्या आहेत. यास्तव जे काही मी बोलतो, ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
वल्हांडण सण सुरू होण्यास थोडा अवधी होता. येशूंना माहीत होते की हे जग सोडून पित्याकडे जाण्याची त्यांची वेळ जवळ आली आहे. जगात जे त्यांचे लोक होते, त्यांच्यावर त्यांनी प्रीती केली व शेवटपर्यंत प्रीती केली.
संध्याकाळचे भोजन चालू असताना, येशूंचा विश्वासघात करावा असा विचार सैतानाने शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतच्या मनात घातला होता.
येशूंना माहीत होते की, पित्याने सर्वगोष्टी त्यांच्या सत्तेखाली ठेवल्या आहेत आणि ते परमेश्वरापासून आले आहेत व त्यांच्याकडे परत जाणार आहेत;
म्हणून येशू भोजनावरून उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला.
त्यानंतर त्यांनी मोठ्या गंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
ते शिमोन पेत्राकडे आले, तो त्यांना म्हणाला, “प्रभू, तुम्ही माझे पाय धुणार आहात काय?”
येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, पण नंतर कळेल.”
पेत्र म्हणाला, “नाही, मी तुम्हाला माझे पाय कधीही धुऊ देणार नाही.” येशू म्हणाले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
शिमोन पेत्राने म्हटले, “प्रभू, केवळ माझे पायच नव्हे तर हात व डोके देखील धुवा!”
यावर येशू म्हणाले, “ज्यांची आंघोळ झाली आहे त्याला फक्त पाय धुण्याची गरज असते, कारण त्यांचे पूर्ण शरीर स्वच्छ असते. आता तू शुद्ध झाला आहेस, परंतु तुम्ही सर्वच शुद्ध नाहीत.”
आपला विश्वासघात करणारा कोण आहे ते येशूंना माहीत होते आणि म्हणूनच ते म्हणाले, तुम्ही सर्वच शुद्ध नाही.
त्यांचे पाय धुतल्यावर त्यांनी कपडे पुन्हा अंगावर घातले आणि आपल्या जागी परत आले व आपल्या शिष्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी काय केले हे तुम्हाला समजले का?
तुम्ही मला ‘गुरुजी’ आणि ‘प्रभूजी’ असे संबोधता आणि ते खरे आहे, यासाठी की तो मी आहे.
आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.
जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे.
मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही.
“मी तुम्हा सर्वांबद्दल बोलत नाही; मी ज्यांची निवड केली आहे ते मला माहीत आहेत. परंतु यासाठी की, ‘ज्याने माझ्याबरोबर भाकर खाल्ली तो माझ्यावर उलटला आहे.’ हा शास्त्रलेखाचा भाग पूर्ण होण्यासाठी असे झाले आहे.
“मी तुम्हाला हे आताच, घडून येण्यापूर्वी सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा तसे घडून येईल, तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की मी तो आहे.
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जे कोणी ज्याला मी पाठविले त्याला स्वीकारतात, ते मला स्वीकारतात आणि जे कोणी मला स्वीकारतात ते ज्याने मला पाठविले त्याला स्वीकारतात.”
असे बोलल्यानंतर, येशू आपल्या आत्म्यामध्ये व्याकूळ होऊन उत्तरले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्हातील एकजण मला विश्वासघाताने धरून देईल.”