मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांचे शिष्य एकमेकांकडे रोखून पाहू लागले, येशू नेमके कोणाबद्दल बोलत आहेत हे त्यांना समजेना.

  2. त्यांच्यापैकी ज्या शिष्यावर येशूंची प्रीती होती तो शिष्य, येशूंच्या उराशी टेकलेला होता.

  3. “कोणाविषयी सांगत आहे हे विचारून आम्हास सांग,” असे शिमोन पेत्राने त्या शिष्याला खुणावून विचारले.

  4. तो येशूंच्या उराशी टेकलेला असता, म्हणाला, “प्रभूजी, तो कोण आहे?”

  5. येशू उत्तरले, “ज्या एकाला मी हा भाकरीचा तुकडा ताटात बुडवून देईल तोच तो आहे.” मग ताटात भाकरीचा तुकडा बुडविल्यानंतर त्यांनी तो शिमोनाचा पुत्र यहूदाह इस्कर्योतला दिला.

  6. यहूदाहने ती भाकर घेतल्याबरोबर सैतान त्याजमध्ये शिरला. येशूंनी त्याला म्हटले, “जे तू करणार आहेस, ते आता त्वरेने कर.”

  7. येशू कशाला तसे म्हणाले हे भोजनास बसलेल्यातील कोणालाही समजले नाही.

  8. काहींना वाटले की यहूदाहच्या हाती पैशाचा कारभार असल्यामुळे सणासाठी काही विकत घ्यावे किंवा गरिबांना काही द्यावे म्हणून येशूने सांगितले असेल.

  9. तो निघून गेल्याबरोबर, येशू म्हणाले, “आता मानवपुत्राचे गौरव झाले आहे आणि परमेश्वराचे त्यामध्ये गौरव झाले आहे;

  10. जर परमेश्वराचे गौरव त्यांच्यामध्ये झाले तर परमेश्वर आपल्यामध्ये पुत्राचे गौरव करतील आणि लवकरच गौरव करतील.

  11. “माझ्या मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुम्हाबरोबर आहे. मग तुम्ही माझा शोध कराल आणि जसे मी यहूदी पुढार्‍यांना सांगितले, तसेच आता तुम्हालाही सांगतो: मी जिथे जाणार, तिथे तुम्हाला येता येणार नाही.

  12. “मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.

  13. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”

  14. शिमोन पेत्राने त्यांना विचारले, “प्रभूजी, आपण कुठे जाणार आहात?” येशूंनी उत्तर दिले, “मी जिथे जातो, तिथे आता तुला माझ्यामागे येता येणार नाही, परंतु नंतर तू माझ्यामागे येशील.”

  15. त्यावर पेत्र म्हणाला, “प्रभू, मला आताच तुम्हाला का अनुसरता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा प्राण देईन.”

  16. येशूंनी उत्तर दिले, “माझ्यासाठी तू खरोखर आपला जीव देशील काय? मी तुला निश्चित सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी, तू मला तीन वेळा नाकारशील!

  17. “तुमची हृदये अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवा; आणि माझ्यावरसुद्धा विश्वास ठेवा.

  18. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या अनेक खोल्या आहेत आणि तसे नसते तर, मी तुमच्यासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे असे तुम्हाला सांगितले असते का?

  19. आणि जर मी गेलो व तुमच्यासाठी जागा तयार केली की, मी पुन्हा येईन व तुम्हाला बरोबर घेऊन जाईन, म्हणजे जिथे मी आहे तिथे तुम्हीही असावे.

  20. मी ज्या ठिकाणी जाणार आहे, तिथे जाण्याचा मार्ग तुम्हाला ठाऊक आहे.”

  21. थोमा त्यांना म्हणाला, “प्रभूजी, आपण कुठे जात आहात हे आम्हास माहीत नाही, तर मार्ग आम्हास कसा माहीत असणार?”

  22. येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.

  23. जर तुम्ही मला खरोखर ओळखले असते, तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आता यापुढे तुम्ही त्यांना ओळखता व त्यांना पाहिलेही आहे.”

  24. फिलिप्प म्हणाला, “प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे पुरे आहे.”

  25. येशूंनी उत्तर दिले: “फिलिप्पा, मी इतका काळ तुम्हाजवळ असूनही तू मला ओळखत नाही काय? ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्यालाही पाहिले आहे. तर मग, ‘पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस’?