मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”

  2. हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!”

  3. लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”

  4. यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला.

  5. परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले.

  6. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे.

  7. जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”

  8. हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत,

  9. हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव.

  10. मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.

  11. यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.

  12. येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?”

  13. इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.

  14. वल्हांडण सण सुरू होण्याच्या सहा दिवसापूर्वी, ज्याला येशूंनी मेलेल्यातून उठविले होते तो लाजर जिथे राहत होता त्या बेथानी गावी येशू आले.

  15. तिथे त्यांनी येशूंच्या सन्मानार्थ संध्याकाळचे भोजन दिले. मार्था जेवण वाढत होती, त्यावेळी लाजर मेजाभोवती येशूंबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी एक होता.

  16. मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल; येशूंच्या पायावर ओतले आणि तिने त्यांचे पाय आपल्या केसांनी पुसले आणि त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले.

  17. परंतु येशूंच्या शिष्यांपैकी एकजण, यहूदाह इस्कर्योत जो येशूंचा विश्वासघात करणार होता, त्याने विरोध केला,

  18. त्यावर येशू म्हणाले, “तिला असू दे, माझ्या उत्तरक्रियेसाठी सुगंधी तेल तिने बचत करून ठेवले होते.

  19. गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर राहतील, परंतु मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.”

  20. तितक्यात येशू तिथे आले आहेत हे कळल्यावर यहूदी लोकांचा समुदाय तिथे आला, तेव्हा केवळ त्यानांच नव्हे तर ज्याला येशूंनी मरणातून उठविले त्या लाजराला पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली.

  21. यासाठी की अनेक यहूदी लोक लाजरामुळे येशूंवर विश्वास ठेवू लागले होते.

  22. दुसर्‍या दिवशी येशू यरुशलेमला येत आहेत ही बातमी वल्हांडण सणासाठी आलेल्या मोठ्या समुदायाने ऐकली.

  23. त्यांनी खजुरीच्या झाडांच्या झावळ्या घेतल्या व त्यांच्या भेटीस गेले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” “इस्राएलचा राजा धन्यवादित असो!”

  24. येशूंना एक गाढवीचे शिंगरू सापडले व ते त्यावर बसले, शास्त्रलेखात असे लिहिले आहे:

  25. “सीयोनकन्ये भिऊ नको; पाहा, तुझा राजा येत आहे गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.”