मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही.

  2. ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे; कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही.

  3. मी आणि माझे पिता एक आहोत.”

  4. तेव्हा यहूदी विरोधकांनी त्यांना दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले,

  5. परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?”

  6. ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”

  7. त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही ‘दैवते’ आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमात लिहिले नाही काय?

  8. ज्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने ‘दैवते’ म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही

  9. तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता?

  10. मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका;

  11. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर मी करत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. म्हणजे तुमची खात्री होईल की पिता मजमध्ये आहे व मी पित्यामध्ये आहे.”

  12. त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले.

  13. मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जिथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्या ठिकाणी जाऊन राहिले.

  14. आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.”

  15. तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला.

  16. ही मरीया, जिचा भाऊ लाजर आजारी होता, तीच ही मरीया जिने प्रभूच्या मस्तकावर बहुमोल सुगंधी तेल ओतले आणि त्यांचे चरण आपल्या केसांनी पुसले होते.

  17. तेव्हा या बहिणींनी येशूंना निरोप पाठविला, “प्रभू, ज्यावर तुमची प्रीती आहे तो आजारी आहे.”

  18. येशूंनी हा निरोप ऐकला, तेव्हा ते म्हणाले, “या आजाराचा शेवट मृत्यूत होणार नाही. तर परमेश्वराच्या गौरवासाठी होईल आणि त्याद्वारे परमेश्वराच्या पुत्राचेही गौरव होईल.”

  19. मार्था आणि तिची बहीण मरीया व लाजर यांच्यावर येशूंची प्रीती होती,

  20. तरी लाजर आजारी आहे हे ऐकूनही येशू ज्या ठिकाणी राहत होते, तिथेच अधिक दोन दिवस राहिले.

  21. यानंतर ते आपल्या शिष्यांना म्हणाले, “चला आपण परत यहूदीयात जाऊ.”

  22. परंतु शिष्य म्हणाले, “गुरुजी, थोड्याच दिवसांपूर्वी यहूदी आपल्याला धोंडमार करण्याचा प्रयत्न करीत होते आणि तरी आपण पुन्हा तिथे जाता काय?”

  23. येशूंनी त्यांना उत्तर दिले, “दिवसात बारा तास प्रकाश असतो की नाही? जर कोणी दिवसा चालतो तर अडखळत नाही, कारण या पृथ्वीवरील प्रकाशामुळे त्याला दिसते.

  24. असे म्हटल्यानंतर, मग येशू त्यांना सांगू लागले, “आपला मित्र लाजर झोपी गेला आहे, परंतु मी जाऊन त्याला झोपेतून जागे करतो.”

  25. त्यांचे शिष्य म्हणाले, “प्रभूजी तो झोपला असेल, तर बरा होईल.”