मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?”

  2. तो म्हणाला, “प्रभू, ते कोण हे मला सांगा म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन.”

  3. येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.”

  4. “होय प्रभूजी,” तो म्हणाला, “मी विश्वास धरतो!” आणि त्याने त्यांची उपासना केली.

  5. मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.”

  6. जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?”

  7. येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”

  8. “परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे.

  9. येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही.

  10. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.

  11. जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही.

  12. मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील.

  13. चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे.

  14. “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.

  15. “मी उत्तम मेंढपाळ आहे; मला माझी मेंढरे माहीत आहेत व माझ्या मेंढरांना मी माहीत आहे

  16. तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो.

  17. माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

  18. पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो;

  19. तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”

  20. त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?”

  21. आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते.

  22. यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.”

  23. येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात,

  24. परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत.

  25. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.