मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्याने मला पाठविले; ते माझ्याबरोबर आहेत, त्यांनी मला एकटे सोडले नाही, कारण त्यांना जे आवडते ते मी नेहमी करत असतो.”

  2. हे ऐकल्यावर अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला.

  3. ज्या यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, त्यांना येशू म्हणाले, “जर तुम्ही माझी शिकवण घट्ट धरून ठेवाल, तर तुम्ही माझे खरे शिष्य व्हाल.

  4. त्यांनी उत्तर दिले, “आम्ही अब्राहामाचे वंशज आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर आम्हाला स्वतंत्र करण्यात येईल, असे तुम्ही कसे म्हणता?”

  5. त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला खरोखर सांगतो की, जो प्रत्येकजण पाप करतो तो पापाचा दास आहे.

  6. आता दासाला कुटुंबात कायम राहता येत नाही, परंतु पुत्र तिथे सदासर्वदा राहतो.

  7. म्हणून पुत्राने तुम्हाला स्वतंत्र केले, तरच तुम्ही खरोखर स्वतंत्र व्हाल.

  8. मला माहीत आहे की तुम्ही अब्राहामाचे वंशज आहात आणि असे असतानाही तुम्ही मला जिवे मारण्याचा मार्ग शोधत आहात, कारण माझ्या वचनांना तुमच्यामध्ये स्थान नाही.

  9. मी पित्याच्या समक्षतेत असताना जे पाहिले, तेच मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही मात्र तुमच्या पित्यापासून जे काही ऐकले त्याप्रमाणे करता.”

  10. त्यांनी उत्तर दिले, “अब्राहाम आमचा पिता आहे.” येशू म्हणाला, “जर तुम्ही अब्राहामाची लेकरे असता तर तुम्ही अब्राहामाची कृत्ये केली असती.

  11. परंतु त्याऐवजी परमेश्वराकडून ऐकलेले सत्य मी तुम्हाला सांगितले, म्हणून तुम्ही मला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहात, अब्राहामाने असे कृत्य कधीही केले नव्हते.

  12. तुम्ही तुमच्या स्वतःच्या पित्याची कामे करीत आहात.” तेव्हा ते विरोध करीत म्हणाले, “आम्ही बेवारस संतती नाही, आमचा खरा पिता प्रत्यक्ष परमेश्वरच आहे.”

  13. येशूंनी त्यांना म्हटले, “परमेश्वर तुमचा पिता असता, तर तुम्ही मजवर प्रीती केली असती, कारण मी परमेश्वरापासून आलो आहे. मी स्वतः होऊन आलो नाही; परमेश्वराने मला पाठविले आहे.

  14. मी म्हणतो ते तुम्हाला समजत नाही कारण ते तुम्ही ऐकू इच्छित नाहीत.

  15. पण मी सत्य सांगतो तर तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही!

  16. मी पापी आहे हे तुमच्यापैकी कोणी सिद्ध करू शकेल का? जर मी सत्य सांगतो, तर मजवर विश्वास का ठेवीत नाही?

  17. यहूदी पुढार्‍यांनी त्यांना उत्तर दिले, “आम्ही खरे सांगत नव्हतो का की तुम्ही शोमरोनी आहात व तुम्हाला भूत लागलेले आहे?”

  18. येशू म्हणाला, “मला भूत लागलेले नाही, कारण मी माझ्या पित्याचा सन्मान करतो आणि तुम्ही माझा अपमान करता.

  19. मी स्वतःचे गौरव करू इच्छित नाही; पण एकजण ते इच्छितो आणि तो न्यायाधीश आहे.

  20. मी तुम्हाला निश्चित सांगतो, जे कोणी माझे वचन पाळतात त्यांना मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”

  21. यावर त्यांनी उद्गार काढले, “आता आमची खात्री झाली की, तुला भूत लागले आहे! प्रत्यक्ष अब्राहाम व संदेष्टेही मरण पावले आणि तरी तू म्हणतो की तुझी वचने पाळणार्‍यांना मृत्यूचा अनुभव कधीही येणार नाही.

  22. आमचा पिता अब्राहाम त्यापेक्षा तू थोर आहेस काय? तो मरण पावला आणि संदेष्टेही. तू कोण आहेस असे तुला वाटते?”

  23. तेव्हा येशूंनी त्यांना सांगितले, “मी स्वतः आपले गौरव केले, तर ते व्यर्थ आहे. परंतु माझा गौरव करणारे माझे पिता आहेत आणि त्यानांच तुम्ही आपला परमेश्वर मानता.

  24. तुम्ही त्यांना ओळखत नाही, मी त्यांना ओळखतो आणि मी त्यांना ओळखत नाही असे म्हटले असते, तर मी तुमच्यासारखाच लबाड ठरलो असतो; परंतु मी त्यांना ओळखतो व त्यांचे वचन पाळतो.

  25. तुमचा पिता अब्राहाम माझा दिवस पाहण्याच्या विचाराने उत्सुक झाला होता; व तो पाहून त्याला आनंद झाला.”