मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. यरुशलेममध्ये राहणारे काही लोक एकमेकास विचारू लागले, “ज्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत तो हाच मनुष्य नाही काय?

  2. हा तर येथे जाहीरपणे बोलत आहे आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. तर मग हाच ख्रिस्त आहे अशी आपल्या पुढार्‍यांना खात्री पटली आहे का?

  3. परंतु हा मनुष्य कुठून आला आहे हे आपणास माहीत आहे; जेव्हा ख्रिस्त येईल, तेव्हा तो कुठून येईल हे कोणालाही कळणार नाही.”

  4. हे ऐकून मंदिराच्या आवारात, शिकवीत असताना, येशू मोठ्याने म्हणाले, “होय, मी कोण, कुठला हे सर्व तुम्हाला ठाऊक आहे. तरी मी माझ्या स्वतःच्या अधिकाराने येथे आलो नाही, परंतु ज्याने मला पाठविले तो खरा आहे; त्यांना तुम्ही ओळखीत नाही,

  5. पण मी त्यांना ओळखतो, कारण मी त्यांच्यापासून आहे आणि त्यांनीच मला पाठविले आहे.”

  6. त्यांनी येशूंना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणी त्यांच्यावर हात टाकू शकले नाही, कारण त्यांची वेळ अद्यापि आली नव्हती.

  7. तरी, लोकसमुदायामधील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. ते म्हणाले, “जेव्हा ख्रिस्त मसिहा येईल, तेव्हा तो या मनुष्यापेक्षा अधिक चिन्हे करेल काय?”

  8. जेव्हा परूश्यांनी लोकांची त्यांच्याबद्दल चाललेली कुजबुज ऐकली. तेव्हा त्यांनी आणि महायाजकांनी येशूंना अटक करण्यासाठी मंदिराचे शिपाई पाठविले.

  9. येशू त्यांना म्हणाले, “मी तुमच्याजवळ आणखी थोडा वेळ राहणार आहे, मग ज्याने मला पाठविले, त्यांच्याकडे परत जाईन.

  10. तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही.”

  11. यहूदी पुढारी एकमेकास विचारू लागले, “या मनुष्याचा कुठे जाण्याचा विचार आहे की तो आपणास सापडणार नाही? कदाचित हा आपले लोक जे ग्रीक लोकांमध्ये पांगलेले आहेत, त्या लोकांना शिक्षण देण्यासाठी जात असेल काय?

  12. ‘तुम्ही माझा शोध कराल, परंतु मी तुम्हाला सापडणार नाही आणि मी जिथे असेन, तिथे तुम्हाला येता येणार नाही,’ असे तो बोलला याचा अर्थ तरी काय असावा?”

  13. मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तहानलेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे.

  14. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

  15. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.

  16. इतर काही म्हणाले, “हेच ख्रिस्त आहेत.” पण इतर काहीजण म्हणाले, “ख्रिस्त गालीलातून येऊ शकेल काय?

  17. शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?”

  18. अशा रीतीने लोकसमुदायात येशूंमुळे फूट पडली.

  19. काहींना त्यांना पकडावेसे वाटले, परंतु कोणीही त्यांच्यावर हात टाकला नाही.

  20. शेवटी मंदिराचे शिपाई महायाजक व परूशी यांच्याकडे परत आले. त्यांनी विचारले, “तुम्ही त्याला आत का आणले नाही?”

  21. शिपाई उत्तर देत म्हणाले, “या मनुष्यासारखे आतापर्यंत कोणीही बोलले नाही.”

  22. अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणीतरी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय?

  23. निकदेम, हा त्यांच्यापैकी एक असून, जो पूर्वी येशूंकडे गेला होता, म्हणाला,

  24. नंतर येशू जैतुनाच्या डोंगराकडे परतले.

  25. अगदी पहाटेच येशू पुन्हा मंदिराच्या अंगणात आले, त्यांच्याभोवती सर्व लोक जमले आणि ते बसून त्यांना शिकवू लागले.