मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. येशूंनी परत त्यांना दाखला सांगितला:

  2. मग परूशी लोक बाहेर गेले आणि येशूंना त्यांच्या बोलण्यात कसे पकडावे यासंबंधी चर्चा केली.

  3. त्यानुसार परूश्यांनी आपल्या काही शिष्यांना हेरोदी गटाच्या लोकांबरोबर येशूंकडे पाठविले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात, हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता आणि भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाहीत.

  4. तर आता आम्हाला हे सांगा की, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?”

  5. पण त्यांचा हेतू काय आहे हे येशूंनी ओळखले. “अहो, ढोंग्यांनो,” येशू म्हणाले, “मला सापळ्यात पाडू पाहता काय?

  6. कर भरण्यासाठी वापरलेले एक नाणे मला दाखवा.” आणि त्यांनी त्यांना दिनारचे एक नाणे दाखविले.

  7. येशूंनी त्यांना विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?”

  8. “कैसराचे!” त्यांनी उत्तर दिले. “मग,” येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे, ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”

  9. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले.

  10. त्याच दिवशी, पुनरुत्थान नाही असे म्हणणारे सदूकी त्यांच्याकडे आले व प्रश्न करू लागले.

  11. येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत आहात, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, ना परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता.

  12. सभोवार जमलेली गर्दी येशूंच्या उत्तरांनी विलक्षण प्रभावित झाली.

  13. येशूंनी सदूकींना निरुत्तर केले, हे परूश्यांनी ऐकले, तेव्हा ते एकत्र जमले.

  14. कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला:

  15. येशूंनी उत्तर दिले, “ ‘प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने आणि तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने प्रीती करा.’

  16. एकदा परूशी लोक एकत्र गोळा झाले असताना, येशूंनी त्यांना विचारले,

  17. “ख्रिस्ताबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? तो कोणाचा पुत्र आहे?” “तो दावीदाचा पुत्र आहे,” त्यांनी उत्तर दिले.

  18. येशूंनी विचारले, “मग दावीद त्याला आत्म्याद्वारे ‘प्रभू,’ असे कसे म्हणतो?

  19. “ ‘प्रभू माझ्या प्रभूला म्हणाले: “मी तुझ्या शत्रूंना तुझ्या पायाखाली ठेवीपर्यंत तू माझ्या उजव्या हाताला बसून राहा.” ’

  20. जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?”

  21. यावर त्यांना काही उत्तर देता येईना आणि तेव्हापासून कोणी त्यांना आणखी प्रश्न विचारावयास धजले नाहीत.

  22. मग येशू लोकसमुदायाला आणि आपल्या शिष्यांना म्हणाले:

  23. “परंतु तुम्ही स्वतः ‘रब्बी,’ म्हणून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एकच आहे आणि तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात.

  24. आणि या पृथ्वीवर कोणालाही ‘पिता’ म्हणून संबोधू नका, कारण तुम्हाला एकच पिता आहेत व ते स्वर्गात आहेत.

  25. स्वतःला ‘मार्गदर्शक’ म्हणवून घेऊ नका, कारण एकटे ख्रिस्त हे एकच तुमचे ‘मार्गदर्शक’ आहेत.