God
God चा उल्लेख असलेली वचने
सोर जसा सुखदायी ठिकाणी लावलेला मी पाहिला, तसाच एफ्राईम आहे, परंतु एफ्राईम आपल्या मुलांना वध करणार्याकडे घेऊन येईल.”
हे याहवेह, त्यांना द्या— तुम्ही त्यांना काय द्याल? त्यांना वांझ गर्भाशये आणि शुष्क स्तने द्या.
“गिलगालात त्यांची सर्व दुष्कृत्ये आहेत, मी त्यांचा तिथेच द्वेष केला. त्यांच्या पापी कृत्यांमुळे, मी त्यांना माझ्या घरातून हाकलून देईन. मी यापुढे त्यांच्यावर प्रीती करणार नाही; त्यांचे सर्व पुढारी बंडखोर आहेत.
एफ्राईम नाश पावला आहे. त्यांची मुळे सुकून गेली आहेत. ते फळ देत नाही. जरी ते मुलांना जन्म देतील, तर मी त्यांचे प्रिय मूल मारून टाकेन.”
माझा परमेश्वर त्यांना नाकारील कारण त्यांनी त्यांची आज्ञा पाळली नाही; ते देशादेशातून भटकत राहतील.
त्यांचे अंतःकरण फसवणूक करणारे आहे, आणि आता त्यांना त्यांचे अपराध भोगावेच लागतील. याहवेह त्यांच्या वेद्या पाडून टाकतील आणि त्यांच्या पवित्र दगडांचे तुकडे करतील.
मग ते म्हणतील, “आम्हाला राजा नाही कारण आम्ही याहवेहचा आदर केला नाही. पण आमचा राजा असला तरी त्याने आमच्यासाठी काय केले असते?”
जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हा मी त्यांना दंड देईन; त्यांनी केलेल्या दोन्ही पापांसाठी त्यांना बेड्या टाकण्यासाठी राष्ट्रे त्यांच्याविरुद्ध एकत्र होतील.
एफ्राईम शिकविलेली कालवड आहे. तिला मळणी करण्याची आवड आहे; म्हणून मी तिच्या नाजूक मानेवर जू ठेवेन. मी एफ्राईमला नांगराला जुंपेन, यहूदाहला नांगरणी करणे व याकोबाला माती फोडणे आवश्यक आहे.
तुम्ही आपल्यासाठी नीतिमत्वाची पेरणी करा, न बदलणार्या प्रीतीचे फळ घ्या, आणि पडीक जमीन नांगरून टाका; जोपर्यंत ते येऊन तुमच्यावर नीतिमत्वाचा वर्षाव करत नाही तोपर्यंत, याहवेहला शोधण्याची हीच वेळ आहे.
“इस्राएल जेव्हा लहान मूल होते तेव्हा मी त्याच्यावर प्रीती केली, आणि इजिप्तमधून माझ्या पुत्राला बोलाविले.
मी तोच होतो ज्याने एफ्राईमला चालण्यास शिकविले, मी त्यांना कडेवर वागवले; तो मीच होतो ज्याने त्यांना आरोग्य दिले, परंतु हे त्यांना समजले नाही.
मी त्यांना मानवी दयाळूपणाच्या दोरीने आणि प्रीतीच्या बंधनाने चालविले. त्यांच्यासाठी मी एखाद्या लहान मुलाला गालापर्यंत उचलल्यासारखा होतो, आणि मी खाली वाकून त्यांना खायला घालत असे.
माझ्या लोकांनी माझा त्याग करून दूर जाण्याचा निश्चय केला आहे. त्यांनी मला परमोच्च परमेश्वर म्हटले तरी मी त्यांना कोणत्याही प्रकारे उन्नत करणार नाही.
“अरे एफ्राईमा, मी तुला कसे सोडू शकतो? अरे इस्राएला, मी तुला दुसऱ्याच्या हाती कसे सोपवून देऊ? मी तुला अदमाहसारखे कसे वागवू शकतो? मी तुला सबोईमसारखा कसे बनवू शकतो? माझे हृदय आतल्याआत आक्रोश करीत आहे; माझी सर्व करुणा जागृत झाली आहे.
मी माझ्या तीव्र रागाप्रमाणे वागणार नाही, मी एफ्राईमचा पुन्हा नाश करणार नाही. कारण मी तुमच्यामध्ये एक पवित्र परमेश्वर आहे. मनुष्य नाही. मी त्यांच्या शहरांविरुद्ध येणार नाही.
ते याहवेहला अनुसरतील; ते सिंहासारखी गर्जना करतील. जेव्हा ते गर्जना करतील, तेव्हा त्यांची मुले थरथर कापत पश्चिमेकडून परत येतील.
पक्ष्यांच्या थरथरणाऱ्या थव्याप्रमाणे ते इजिप्तकडून येतील, पारव्यांप्रमाणे पंख फडफडत अश्शूरहून येतील. आणि मी त्यांना त्यांच्या घरी स्थायिक करेन,” असे याहवेह घोषणा करतात.
एफ्राईमने मला खोटेपणाने, इस्राएलने फसवेगिरीने वेढून टाकले आहे. आणि यहूदाह उद्धटपणाने परमेश्वराच्या विरोधात आहे, शिवाय जे परमेश्वर विश्वासू व पवित्र आहेत, त्यांच्याविरुद्ध आहे.
याहवेह यहूदीयाच्या विरुद्ध वाद आणत आहेत; याकोबाला त्याच्या मार्गाप्रमाणे ते शासन करतील आणि त्याच्या कार्यानुसार त्याला प्रतिफळ देतील.
त्याने गर्भात असता आपल्या भावाची टाच धरली; एका मनुष्य असून त्याने परमेश्वराशी झुंज केली.
याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, याहवेह हे त्यांचे नाव!
पण तू आपल्या परमेश्वराकडे परत आलेच पाहिजे; प्रीती आणि न्यायाचे पालन कर आणि सतत आपल्या परमेश्वराची प्रतीक्षा कर.
“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; तुझ्या नेमलेल्या उत्सवाच्या दिवसात मी तुला पुन्हा तंबूंमध्ये राहवयास लावेन.
मी संदेष्ट्यांबरोबर बोललो, त्यांना अनेक दृष्टान्त दिले आणि त्यांच्याद्वारे दाखले सांगितले.”