God
God चा उल्लेख असलेली वचने
याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.
पण एफ्राईमने त्यांचा कोप भयंकर चेतविला आहे; त्याचे प्रभू त्याच्या रक्ताचा दोष त्याच्यावरच राहू देतील आणि त्याला त्याच्या अपमानाची भरपाई देतील.
“तू इजिप्तमधून बाहेर आल्यापासून मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; माझ्याशिवाय इतर कोणत्याही परमेश्वराला तू स्वीकारणार नाहीस, माझ्याशिवाय इतर कोणीही तारणारा नाही.
मी रानात, त्या तप्त उष्णतेच्या प्रदेशात, तुझी काळजी वाहिली.
जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले; जेव्हा ते तृप्त झाले तेव्हा ते गर्विष्ठ झाले; नंतर ते मला विसरले.
म्हणून मी त्यांच्यासाठी सिंहासारखा होईन, चित्त्यासारखा त्यांच्या वाटेवर दबा धरून बसेन.
जिची पिल्ले हरण केली आहेत, अशा अस्वलीप्रमाणे मी त्यांच्यावर हल्ला करेन आणि त्यांचे तुकडे तुकडे करेन; मी त्यांना सिंहाप्रमाणे फाडून टाकेन— वनपशू त्यांना फाडून टाकतील.
“हे इस्राएला, तुझा नाश झाला आहे, कारण तू माझ्याविरुद्ध, तुझ्या साहाय्यकर्त्यांच्या विरुद्ध आहेस.
तुला वाचविणारा तुझा राजा कुठे आहे? ‘मला राजा व राजपुत्र द्या’ ज्यांच्याबद्दल तू असे म्हटले होते, ते तुझे सर्व नगरांचे अधिकारी कुठे आहेत?
म्हणून माझ्या रागात मी तुला राजा दिला आणि माझ्या क्रोधात त्याला मी काढून टाकले आहे.
“मी या लोकांना कबरेच्या सामर्थ्यापासून सुटका देईन; मी त्यांना मृत्यूपासून वाचवेन. अरे मरणा, तुझ्या पीडा कुठे आहे? हे कबरे, तुझा नाश कुठे आहे? “मला काहीही कळवळा येणार नाही,
जरी तो त्याच्या भावांमध्ये अत्यंत फलद्रूप होता, परंतु याहवेहकडून पूर्वेकडील वारा येईल, तो वाळवंटातून येईल; त्याचे झरे सुकून जातील आणि त्याची विहीर कोरडी पडेल. त्याच्या भांडारातील सर्व खजिना लुटला जाईल.
शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”
हे इस्राएला, याहवेह तुमच्या परमेश्वराकडे परत ये. कारण तुझे पापच तुझ्या पतनाचे कारण झाले आहे!
परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.
अश्शूर आमचे तारण करू शकणार नाही; आम्ही युद्धाच्या घोड्यावर स्वार होणार नाही. हातांनी बनविलेल्या मूर्तीना आम्ही ‘आमची दैवते’ असे इतःपर म्हणणार नाही. कारण अनाथांना तुमच्याठायीच दया मिळते.”
“मी त्यांचा स्वच्छंदीपणा दूर करेन आणि त्यांच्यावर मुक्तपणे प्रीती करेन, कारण माझा राग त्यांच्यापासून दूर झाला आहे.
मी इस्राएलला दहिवराप्रमाणे होईन. तो कुमुदिनीप्रमाणे फुलेल आणि त्याची मुळे लबानोनातील गंधसरूंच्या मुळांप्रमाणे जातील;
हे एफ्राईमा, आता माझा या मूर्तीशी काय संबंध आहे? मी त्याला उत्तर देईन आणि त्याची काळजी घेईन. मी सदाहरित गंधसरू वृक्षासारखा आहे; तुमचे फलवंत होणे माझ्यामुळे येते.”
कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.
पेथूएलचा पुत्र योएलकडे याहवेहचे वचन आले.
एक राष्ट्र माझ्या देशावर चालून आले आहे, ते सैन्य बलाढ्य आणि असंख्य आहे; त्यांचे दात हे सिंहाचे दात आहे, त्यांचे सुळे हे सिंहिणीचे सुळे आहेत.
त्या राष्ट्रांनी माझ्या द्राक्षवेलींची नासधूस केली आहेत आणि अंजिराच्या झाडांचा नाश केला आहे. त्यांनी त्याचे खोड सोलून साल दूर फेकली आहे, त्यांच्या फांद्या पांढर्या केल्या आहेत.
याहवेहच्या मंदिरात वाहण्याची अन्नार्पणे व पेयार्पणे बंद झाली आहेत; याहवेहसमोर सेवा करणारे याजक विलाप करीत आहे.
अहो याजकांनो, गोणपाट परिधान करा आणि शोक करा; वेदीची सेवा करणार्यांनो, विलाप करा. तुम्ही जी परमेश्वराची सेवा करता, या, गोणपाट परिधान करीत रात्र घालावा; कारण अन्नार्पणे व पेयार्पणे तुमच्या परमेश्वराच्या भवनात येणे बंद झाले आहेत.