मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मी सर्व राष्ट्रांना एकत्र करेन आणि त्यांना खाली यहोशाफाट च्या खोऱ्यात आणेन. त्यांनी माझ्या वतनास, माझ्या इस्राएली लोकांशी जे केले त्याबद्दल मी त्यांची परीक्षा घेईन. कारण त्यांनी माझ्या लोकांना राष्ट्रांमध्ये विखुरले आहे आणि माझ्या देशाचे विभाजन केले आहे.

  2. त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्ठ्या टाकल्या आणि वेश्यांसाठी मुलांचा व्यापार केला; मद्द्याकरिता आपल्या मुलींना विकले.

  3. “अहो सोर आणि सीदोन, पलेशेथच्या शहरांनो, आता तुमच्याजवळ माझ्याविरुद्ध काय आहे? मी जे काही केले आहे त्याची परतफेड मला करीत आहात काय? तुम्ही मजवर सूड उगविण्याचा प्रयत्न करीत आहात काय? कारण मी त्वरेने उलट प्रहार करेन आणि तुमचेच कृत्य तुमच्या माथ्यावर उलटवेन.

  4. तुम्ही माझे रूप आणि सोने हरण केले आहे आणि माझी सर्व मोलवान भांडारे घेऊन ती तुमच्या मंदिरात ठेवली आहेत.

  5. “परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन.

  6. मी तुमचे पुत्र व तुमच्या कन्या यहूदीयातील लोकांना विकून टाकेन आणि ते त्यांना दूरच्या शबाई लोकांस विकतील.” याहवेहने हे म्हटले आहे.

  7. सभोवतालच्या राष्ट्रांनो, तुम्ही लवकर या, आणि तिथे एकत्र व्हा. हे याहवेह, तुमचे योद्धे खाली आणा!

  8. “राष्ट्रे जागृत व्हावी; त्यांनी यहोशाफाटाच्या खोर्‍यात यावे, कारण तिथे मी न्यायासनावर बसून चारही बाजूंच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे.

  9. निर्णयाच्या खोर्‍यात लोकांची गर्दीच गर्दी आहे! कारण निर्णयाच्या खोऱ्यात याहवेहचा दिवस येऊन ठेपला आहे.

  10. याहवेह सीयोनातून गर्जना करतील आणि यरुशलेमातून गडगडाट होईल; पृथ्वी व आकाश थरथर कापतील. परंतु याहवेह त्याच्या लोकांसाठी आश्रयस्थान आणि इस्राएल लोकांसाठी दुर्ग असतील.

  11. “तेव्हा तुम्हाला कळून येईल की सीयोनात, माझ्या पवित्र पर्वतावर, राहणारा मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे. यरुशलेम पवित्र होईल; परकीय लोक तिच्यावर पुन्हा कधीही आक्रमण करणार नाहीत.

  12. “त्या दिवशी नवीन द्राक्षारस पर्वतांवरून पाझरेल, आणि टेकड्यांवरून दूध वाहील; यहूदीयातील ओहोळांची कोरडी पात्रे पाण्याने भरून वाहतील आणि याहवेहच्या मंदिरातून एक झरा निघेल व तो शिट्टीमच्या खोर्‍यात पाणी पुरवेल.

  13. त्यांच्या निर्दोष रक्ताचा सूड न घेता मी जाईन काय? नाही, मुळीच नाही.”

  14. त्याने म्हटले: “याहवेह सीयोनातून गर्जना करतात आणि यरुशलेमातून गडगडाट करतात; मेंढपाळांची कुरणे सुकून जातात, आणि कर्मेलचा माथा कोमेजून जाईल.”

  15. याहवेह असे म्हणतात: “दिमिष्कच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने गिलआदला मळणी करण्याच्या लोखंडी काट्यांनी मळले आहे,

  16. म्हणून मी हजाएलच्या घरावर अग्नी पाठवेन व बेन-हदादच्या किल्ल्याला भस्म करेन.

  17. दिमिष्कचे प्रवेशद्वार तोडून टाकेन; आणि आवेन खोर्‍यातील राजा आणि बेथ-एदेनचा राजदंड धरणाऱ्यांना मी नष्ट करेन. अरामाचे लोक कीर येथे गुलाम म्हणून जातील.” याहवेह असे म्हणतात.

  18. याहवेह असे म्हणतात: “गाझाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण तिने सर्व लोकांना बंदिवासात घेतले आणि त्यांना एदोमला विकले,

  19. म्हणून मी गाझाच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्याला भस्म करेन.

  20. मी अश्दोदच्या राजाचा आणि अष्कलोनचा राजदंड धरणार्‍याचा नाश करेन. शेवटच्या पलिष्टीचा नाश होत नाही तोपर्यंत मी आपला हात एक्रोनावर चालवेन,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.

  21. याहवेह असे म्हणतात: “सोरच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण बंदिवासातील सर्वांना एदोमास विकले आणि बंधुत्वाच्या कराराची अवहेलना केली आहे.

  22. म्हणून मी सोरच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि तिच्या किल्ल्यांना भस्म करेन.”

  23. याहवेह असे म्हणतात: “एदोमच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून अनुताप करणार नाही. कारण त्याने तलवार घेऊन आपल्या भावाचा पाठलाग केला आणि देशातील स्त्रियांचा वध केला, कारण त्याचा क्रोध निरंतर वाढत होता, आणि त्याच्या क्रोध अनियंत्रित वाढत गेला,

  24. म्हणून मी तेमानवर अग्नी पाठवेन आणि ती आग बस्राचे किल्ले भस्म करून टाकील.”

  25. याहवेह असे म्हणतात, “अम्मोनच्या तीन नाही तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण आपल्या सीमा वाढविण्यासाठी गिलआदाच्या गरोदर स्त्रियांना चिरले,