मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून मी राब्बाहच्या तटांवर अग्नी पाठवेन आणि त्यामुळे त्यांचे किल्ले व राजमहाल भस्म होतील. महान वादळामध्ये वावटळीचा आवाज व्हावा तसा भयानक रणगर्जना होतील;

  2. आणि तिचा राजा आणि राजाचे अधिपती बरोबरच बंदिवासात जातील.” याहवेहने म्हटले.

  3. याहवेह असे म्हणतात, “मोआबच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. कारण त्याने एदोम राजाची हाडे जाळून त्याची राख केली आहे.

  4. मी मोआबावर अग्नी पाठवेन तो करीयोथच्या किल्ल्याला भस्म करेन. युद्धाच्या आक्रोशात आणि रणशिंगाच्या आवाजात मोआब प्रचंड नाशाने खाली जाईल.

  5. मी तिच्या शासकाचा नाश करेन आणि त्याच्यासोबत तिच्या सर्व अधिकार्‍यांना मारून टाकेन.” असे याहवेह म्हणतात.

  6. याहवेह असे म्हणतात: “यहूदीयाच्या तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मागे फिरणार नाही. कारण त्यांनी याहवेहचे नियमशास्त्र धिक्कारले आहे व त्यांचे विधी पाळले नाही. ज्या दैवतांचे अनुसरण त्यांच्या पूर्वजांनी केले होते त्या त्यांच्या खोट्या दैवतांनी त्यांची दिशाभूल केली होती,

  7. म्हणून मी यहूदीयावर अग्नी पाठवेन आणि यरुशलेमचे किल्ले भस्म करेन.”

  8. याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.

  9. ते गरिबांच्या डोक्याला भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही. मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.

  10. “जरी ते गंधसरूंसारखे उंच व एलावृक्षांसारखे मजबूत होते, तरी मी त्यांच्यासमोर अमोरी लोकांचा संहार केला. मी वरून त्यांचे फळ व खालून त्यांचे मूळ नासविले.

  11. अमोर्‍यांचा देश तुम्हाला द्यावा म्हणून मी तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले व चाळीस वर्षे तुम्हाला रानात चालविले.

  12. “तुमच्या मुलांपैकी काहींना संदेष्टे म्हणून आणि तरुणांतील काहींना नाजीर होण्याकरिता वाढवले आहे. अहो इस्राएलच्या लोकांनो, हे खरे नाही काय?” असे याहवेह जाहीर करतात.

  13. “म्हणून धान्याच्या पेंढ्यांखाली गच्च भरलेली गाडी जशी दबते, तसे मी तुम्हाला दाबेन आणि तुम्ही कण्हाल.

  14. वीरांपैकी महाधैर्यवानही त्या दिवशी वस्त्रे टाकून पळतील.” याहवेह असे जाहीर करतात.

  15. इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:

  16. “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.”

  17. नगरात जेव्हा रणशिंगाचा आवाज येतो, तेव्हा लोक घाबरत नाही काय? शहरात विपत्ती आली तर, ती याहवेहने घडवून आणली नाही काय?

  18. सार्वभौम याहवेह आपल्या सेवक संदेष्ट्यांना त्याच्या योजना प्रकट केल्याशिवाय निश्चितच काहीही करणार नाही.

  19. सिंहाने गर्जना केली आहे— कोण भिणार नाही? सार्वभौम याहवेहने बोलले आहेत; तर मग संदेश दिल्यावाचून कोणी राहील काय?

  20. “जे योग्य ते कसे करावे हे त्यांना माहीत नाही,” याहवेह जाहीर करतात, “त्यांनी लुटलेला व चोरी केलेला माल त्यांच्या महालात कोणी साठवून ठेवला आहे.”

  21. यास्तव सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “एक शत्रू जो तुमचा देश व्यापून टाकेल, तो तुमचे किल्ले कोसळून टाकेल आणि तुमचे गड लुटेल.”

  22. याहवेह असे म्हणतात: “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून केवळ दोन तंगड्या आणि कानाचा एक तुकडा सोडवितो, तसे शोमरोनातील इस्राएल लोक जे पलंगाच्या शीरपट्टीने आणि बिछान्यावरील रेशमी कापडाच्या तुकड्याने सोडविले जातील.”

  23. “हे ऐका आणि याकोबाच्या घराण्याविरुद्ध साक्ष द्या,” असे याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतात:

  24. “ज्या दिवशी मी इस्राएलला तिच्या पातकाबद्दल शिक्षा करेन, त्याच दिवशी मी बेथेलमधल्या वेद्यांचा नाश करेन; वेद्यांची शिंगे कापून टाकण्यात येतील आणि ती जमिनीवर पडतील.

  25. मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.