मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. म्हणून मी तुम्हाला, दिमिष्कच्या पलीकडे बंदिवासात पाठवेन,” असे याहवेह म्हणतात, ज्यांचे नाव सर्वसमर्थ परमेश्वर आहे.

  2. सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”

  3. आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”

  4. कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे आणि लहान घरांना चक्काचूर करतील.

  5. याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात, “हे इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध एक राष्ट्र उठवेन, लेबो हमाथपासून अराबाच्या ओहोळापर्यंत ते तुझ्यावर जुलूम करेल.”

  6. सार्वभौम याहवेहने मला जे दाखविले, ते हे आहे: जेव्हा राजाच्या पिकांची कापणी झाली आणि पुढचे पीक येणार होते, तेव्हा याहवेह टोळांची एक प्रचंड झुंड तयार करीत होते.

  7. जेव्हा त्यांनी जमीन साफ केली, तेव्हा मी मोठ्याने ओरडलो, “सार्वभौम याहवेह, क्षमा करा! याकोब कसा टिकू शकेल? तो फार लहान आहे!”

  8. तेव्हा याहवेहचे मन द्रवले, “पुन्हा हे घडणार नाही,” याहवेह असे म्हणाले.

  9. सार्वभौम याहवेहने हे मला दाखविले: सार्वभौम याहवेहने अग्नीला न्याय करण्यास बोलाविले; त्यांनी खोल समुद्र कोरडा केला आहे आणि त्यांनी भूमी गिळंकृत केली आहे.

  10. तेव्हा मी म्हणालो, “अहो सार्वभौम याहवेह, मी तुम्हाला विनंती करतो, थांबा! याकोब कसा वाचेल? तो फार लहान आहे!”

  11. मग याहवेहचे मन द्रवले. आणि सार्वभौम याहवेह म्हणाले, “हे देखील घडणार नाही.”

  12. त्यांनी मला हे दाखविले: ओळंबा लावून बांधलेल्या एका भिंतीच्या जवळ, प्रभू हातात ओळंबा घेऊन उभे होते.

  13. आणि याहवेहने मला विचारले, “आमोस, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “ओळंबा!” नंतर प्रभू म्हणाले, “पाहा मी माझे लोक इस्राएल यांच्यामध्ये ओळंबा धरणार आहे; यापुढे मी त्यांची गय करणार नाही.

  14. “इसहाकाचे उच्च पूजास्थाने नाश करण्यात येतील आणि इस्राएलची पवित्रस्थाने पाडण्यात येतील; मी माझ्या तलवारीने यरोबोअमाच्या विरुद्ध उठेन.”

  15. परंतु मी गुरांची राखण करीत असताना याहवेहने मला दूर नेले आणि मला म्हणाले, ‘जा, आणि माझ्या इस्राएली लोकांना संदेश सांग.’

  16. म्हणून आता तुम्ही याहवेहचे वचन ऐका, व तुम्ही म्हणतात, “ ‘इस्राएलविरुद्ध भविष्यवाणी करू नकोस, आणि इसहाकाच्या घराण्याविरुद्ध प्रचार करणे थांबव.’

  17. “म्हणून याहवेह असे म्हणतात: “ ‘तुझी पत्नी शहरात वेश्या होईल, तुझे पुत्र व कन्या तलवारीने मरतील, तुझी जमीन मोजण्यात येईल आणि सूत्राने विभागली जाईल, आणि तू स्वत: अपवित्र देशात मरशील. इस्राएलचे लोक निश्चितच आपल्या देशातून दूर बंदिवासात गुलाम म्हणून जातील.’ ”

  18. सार्वभौम याहवेहने मला हे दाखविले: पिकलेल्या फळांनी भरलेली एक टोपली दाखविली.

  19. “आमोसा, तुला काय दिसते?” त्यांनी विचारले. मी उत्तर दिले, “मला पिकलेल्या फळांची एक टोपली दिसते.” मग याहवेह मला म्हणाले, “माझ्या इस्राएली लोकांचा समय परिपक्व झाला आहे; मी त्यांची गय करणार नाही.”

  20. सार्वभौम याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी, मंदिरातील त्यांचे गीत मी आकांतात बदलेन. सर्वत्र अनेक मृतदेह मौन धरून पडलेली असतील!”

  21. याकोबाचे वैभव असलेले याहवेह यांनी स्वतःची शपथ घेऊन सांगितले आहेः “मी त्यांनी जे केले ते कधीही विसरणार नाही!

  22. “त्या दिवशी,” सार्वभौम याहवेह घोषणा करतात, “दुपारच्या वेळी मी सूर्यास्त करेन आणि भरदिवसा पृथ्वीला अंधकारमय करेन.

  23. मी तुमचे धार्मिक उत्सव शोकामध्ये उलटवेन आणि तुमची सर्व गीते विलापात बदलून टाकीन. मी तुम्हा सर्वांना गोणपाट घालेन आणि तुमचे मुंडण करेन. मी तो काळ एकुलत्या एक मुलासाठी विलाप करण्यासारखा आणि त्याचा शेवट कडू दिवसासारखा करेन.

  24. “असे दिवस येत आहेत,” सार्वभौम याहवेह घोषित करतात, “मी देशावर दुष्काळ आणेन— तो अन्नाचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान नव्हे, तर याहवेहचे वचन ऐकण्याचा दुष्काळ पाडेन—

  25. आणि लोक याहवेहच्या वचनाच्या शोधात समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि उत्तरेपासून पूर्वेकडे भटकतील, पण त्यांना ते सापडणार नाही.